नवी दिल्ली, 29 मे: पैसे कमावण्याची संधी तुम्ही देखील शोधत असाल तर ही सरकारी कंपनी एक खास ऑफर तुमच्यासाठी घेऊन आली आहे. इंडियन ऑइल (Indian Oil) ही सरकारी कंपनी 2 कोटीं रुपयांपर्यंत रक्कम जिंकण्याची संधी देत आहे. कंपनीने ट्वीट करत याबाबत माहिती दिली आहे. कंपनीने ‘डिझेल भरो, इनाम जीतो’ (Diesel Bharo, Inaam jeeto) अशी ऑफर सुरू केली आहे. या ऑफरमध्ये तुम्हाला कोणत्याही इंडियन ऑइलच्या पेट्रोल पंपावर डिझेल भरायचे आहे. असे केल्यानंतर तुमचे नाव त्या लिस्टमध्ये समाविष्ट होईल ज्यांना दोन कोटी जिंकण्याची संधी मिळेल. हे वाचा- केंद्र सरकार देत आहे 5 लाख रुपये जिंकण्याची संधी, 25 जूनआधी करावं लागेल हे काम डिझेल भरुन मिळवा बक्षीस इंडियन ऑइलच्या रिटेल आउटलेट्सवर डिझेल भरुन तुम्ही 2 कोटी पर्यंत रक्कम जिंकू शकता. ही ऑफर जिंकण्यासाठी ऑफर अशी आहे की सिंगल बिलमध्ये कमीत कमी 25 लीटर डिझेल भरावं लागेल. या ऑफरचा फायदा 18 वर्षांपेक्षा जास्त वय असणारा कोणताही नागरिक घेऊ शकतो. इंडियन ऑइलने ट्वीट करत याबाबत माहिती दिली आहे, कंपनीची ही ऑफर 31 जुलैपर्यंत मर्यादित आहे.
#IndianOil पेट्रोल पंप पर एक बिल में 25 लीटर या उससे अधिक डीज़ल भरें और 2 करोड़ रुपये तक के इनाम जीतने का मौका पाएँ। TnC apply https://t.co/Qkd3Eo5Spd#DieselBharoInaamJeeto pic.twitter.com/LI9drTqrkU
— Indian Oil Corp Ltd (@IndianOilcl) April 23, 2021
हे वाचा- दोन दिवसात LPG ते चेक पेमेंटबाबत हे नियम बदलणार, तुमच्यावर होणार थेट परिणाम कसे जिंकाल दोन कोटी? इंडियन ऑइलच्या पेट्रोल पंपावरुन 25 लीटर किंवा त्यापेक्षा जास्त डिझेल खरेदी केल्यानंतर तुम्हाला एक बिल मिळेल. त्या बिलवर बिल क्रमांक आणि डीलर कोड लिहिलेला असेल. 7799033333 या क्रमांकावर डीलर कोड एसएमएस करा. याकरता पहिल्यांदा डीलर कोड टाइप करुन त्यानंतर स्पेस देऊन बिल क्रमांक टाइप करा. यानंतर स्पेस देऊन तुम्ही किती लीटर डिझेल खरेदी केलं आहे ती संख्या टाइप करा. हा मेसेज तुम्हाला 7799033333 या क्रमांकावर पाठवावा लागेल.