अबुधाबी, 3 फेब्रुवारी: संयुक्त अरब अमिरातीमधील (UAE) कामगार कायद्यांमध्ये (Labor Law) आमुलाग्र बदल (Basic Changes) करण्यात आले असून 2 फेब्रुवारीपासून हे नवे कायदे देशात लागू झाले (Implemented) आहेत. जुन्या कायद्यांमधील अनेक क्लिष्ट तरतुदी (Complex provisions) वगळून कंपन्या आणि कर्मचारी या दोघांसाठी सोयीचे ठरतील, असे बदल नव्या कायद्यामध्ये करण्यात आले आहेत. गेल्या वर्षीच्या नोव्हेंबर महिन्यात नव्या कायद्यांचा प्रस्ताव युएई सरकारने मांडला होता, जो मंजूर होऊन आता लागू झाला आहे. जागतिक दर्जाचे कामगार कायदे सध्या युएईमध्ये लागू असणारे कायदे हे कित्येक वर्षांपूर्वी तयार करण्यात आलेले होते. या कायद्यांमध्ये कामगारांना असणारे अधिकार आणि पर्याय या दोन्हींवर मर्यादा होत्या. मात्र आता नवे कायदे हे जागतिक कामगार कायद्यांचं स्वरूप लक्षात घेऊन तयार करण्यात आले आहेत. नोकरीचं स्वरूप, काम सुरू करण्याची तारीख, कामाचे ठिकाण, वीकेंड, कामाचे तास, प्रोबेशनचा कालावधी, कराराचा कालावधी, पगार, भत्ते, वार्षिक लाभ, नोटीस पिरीयड आणि कॉन्ट्रॅक्ट संपण्याची प्रक्रिया या सगळ्या बाबींचा उल्लेख करारात करणं बंधनकारक करण्यात आलं आहे. तीन वर्षांचा करार कंपनी आणि कर्मचारी यांच्यात आता जास्तीत जास्त तीन वर्षांचा करार होणार आहे. पूर्वीच्या नियमांनुसार या कराराला कालावधीचं बंधन नव्हतं. मात्र तीन वर्षांनंतर करार रिन्यू होणार असल्यामुळे कंपनी आणि कर्मचारी या दोघांनाही प्रत्येक वेळी निर्णयाचं स्वातंत्र्य मिळणार आहे. कमीत कमी एक सुट्टी प्रत्येक कंपनीला आपल्या कार्यालयातील कर्मचाऱ्यांना किमान एक साप्ताहिक सुट्टी देणं बंधनकारक असणार आहे. त्याशिवाय काही सरकारी सुट्ट्यांचाही लाभ कर्मचाऱ्यांना मिळणार आहे. यापेक्षा अधिक सुट्ट्या देण्याचं स्वातंत्र्य कंपन्यांना असणार आहे, मात्र किमान एका सुट्टीच्या अटीचं उल्लंघन मात्र करता येणार नाही. हे वाचा -
भारतीयांना फायदा संयुक्त अरब आमिरातीमधील एकूण लोकसंख्येचा 40 टक्के भारतीय नागरिक आहेत. युएई्च्या अर्थव्यवस्थेत भारतीयांचं मोठं योगदान आहे. यापूर्वीच्या क्लिष्ट कायद्यांच्या काळातही भारतीयांचं या भागातलं प्रमाण वाढतच गेलेलं आहे. आता नव्या कायद्यांमुळे भारतीयांना युएईत काम करणं अधिक सोयीचं होईल, असं या क्षेत्रातील तज्ज्ञ सांगत आहेत.