मुजफ्फरपुर, 3 फेब्रुवारी : तीन वर्षांपूर्वी केलेल्या हत्या प्रकरणात जिल्हा न्यायालयाने तरुणाला आजन्म कारावासाची (Life imprisonment) शिक्षा सुनावली आहे. या प्रकरणात न्यायालयाने तरुणाला 8 हजार रुपयांचा दंडही (Crime News) ठोठावला आहे. ही घटना मुजफ्फरपूरमधील जुना बाजार मोतीपूर येथील आहे. येथे राहणारा बालेंद्र साह याने आपल्या मेव्हणीच्या प्रेमात तिचा पती रंजन शाह याची हत्या केली होती. हत्येची ही घटना 9 नोव्हेंबर 2018 मध्ये घडली होती. या प्रकरणात मृत रंजन साहच्या आई चंदा देवीने 12 नोव्हेंबर 2018मध्ये प्राथमिक तक्रार दाखल केली होती. आई चंदा देवीने मारेकऱ्यासह त्याच्या कुटुंबातील सदस्यांविरोधातही गुन्हा दाखल केला आहे. या प्रकरणात 8 साक्षीदारांना हजर करण्यात आले. दोन्ही पक्षांकडून ऐकून घेतल्यानंतर न्यायाधीशांनी गुन्हेगाराला आजन्म कारावासाची शिक्षा सुनावली. हे ही वाचा- पतीनं केली पत्नीची हत्या, मुलानं पाहिलं भयानक दृश्य; म्हणाला, ‘‘पप्पांनी…’’ काय आहे प्रकरण? रंजन साह गावातच किराण्याचं दुकान चालवत होता. तो 9 नोव्हेंबर 2018 मध्ये पारू येथे सासरी गेला होता. येथे त्याची हत्या करण्यात आली होती. यापूर्वी 14 जून 2018 मध्ये रंजनने पोलिसात प्राथमिक तक्रार दाखल केली होती, यात त्याने बालेंंद्र सह अन्य जणांवर मारहाणीचा आरोप केला होता. रंजन हा आपल्या सासरी गेला होता. यावेळी पत्नीच्या मेव्हण्याने त्याची गळा दाबून हत्या केली. याशिवाय मृतदेह पुलाखाली फेकून निघून गेला. पोलिसांना हा मृतदेह मिळाल्यानंतर तपास सुरू झाला. शेवटी आरोपी बालेंद्रला न्यायालयाने आजन्म कारावासाची शिक्षा सुनावली आहे.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.