मुंबई : क्रेडिट कार्ड वापरू नये असं म्हटलं जातं. मात्र क्रेडिट कार्ड चा योग्य वापर केला तर आपल्याला अनेक फायदे देखील मिळतात. शिवाय क्रेडिट कार्डच्या योग्य वापरामुळे तुमचा सिबिल स्कोअर देखील चांगला होण्यास मदत होते. लोन पटकन मिळू शकतं, अनेक फायदे आहेत जे माहितीच नाही. क्रेडिट कार्ड घेताना आपण बऱ्याचदा सरसकट अर्ज करतो. त्याचेही काही प्रकार आहेत. ज्याची माहिती आपल्याला असं आवश्यक आहे. सध्या क्रेडिट कार्ड हा पेमेंट हा पर्याय हळूहळू लोकप्रिय होत आहे. क्रेडिट कार्ड तुम्हाला अनेक प्रकारच्या सुविधा देतं. ग्राहकांना 45 दिवसांपर्यंत पैसे क्रेडिट बेसिसवर वापरता येतात. ग्राहकांना खरेदी करण्यासाठी बँका प्रोत्साहन देतात. क्रेडिट कार्डची मर्यादा क्रेडिट कार्डच्या इश्यूद्वारे निश्चित केली जाते. एकापेक्षा जास्त क्रेडिट कार्ड? क्रेडिट कार्डसाठी ग्राहकाचं उत्पन्न, क्रेडिट स्कोअर यांचा विचार केला जातो. तुम्ही तुमच्या गरजेनुसार नेहमी क्रेडिट कार्ड निवडणं आवश्यक आहे. बँक किंवा ब्रॅण्ड आवडला किंवा मनाला वाटलं म्हणून घेतलं असं केल्यास नुकसान होऊ शकतं. एकापेक्षा जास्त क्रेडिट कार्ड वापरणं देखील धोक्याचं ठरू शकतं.
क्रेडिट कार्ड वापरता सावधान! तुमच्यासोबतही हे घडू शकतंक्रेडिट कार्डसाठी शुल्क? काही बँका क्रेडिट कार्डसाठी वार्षिक शुल्क देखील आकारतात. ते बँकेवर अवलंबून असतं, तर काही बँका तुम्हाला ठराविक रकमेपर्यंत खर्च दरवर्षी केला तर तुम्हाला क्रेडिट कार्डसाठी वार्षिक शुल्कातून सूट देतात. मात्र यामुळे तुम्ही विनाकारण दरवर्षी खर्च वाढवत राहता हे देखील तेवढंच खरं आहे. किती प्रकारचे असतं क्रेडिट कार्ड बँका अनेक प्रकारचे क्रेडिट कार्ड देतात. आपण आपल्या गरजेनुसार त्यांची निवड करू शकता. क्रेडिट कार्डचे साधारणत: सात प्रकार असतात. यामध्ये शॉपिंग क्रेडिट कार्ड, ट्रॅव्हल क्रेडिट कार्ड, फ्युअल क्रेडिट कार्ड, रिवॉर्ड क्रेडिट कार्ड, एंटरटेनमेंट क्रेडिट कार्ड, लाइफटाइम फ्री क्रेडिट कार्ड आणि को-ब्रँडेड क्रेडिट कार्ड असे प्रकार आहेत.
SBI कडून अलर्ट! नव्या वर्षात बदलणार क्रेडिट कार्डचे नियमक्रेडिट कार्ड कोण घेऊ शकतं? क्रेडिट कार्ड घेण्याचे किमान वय 18 वर्षे आहे. वयाच्या 18 वर्षांपासून ते 60 वर्षांपर्यंत कोणतीही व्यक्ती यासाठी अर्ज करू शकते. त्यासाठी तुमचा पगार दरमहा किमान 20 हजार रुपये असायला हवा. व्यवसाय करणाऱ्या किंवा कर्मचारी वर्गासाठी व्यक्तीचे उत्पन्न वार्षिक 3 लाख रुपये असावं.
Credit Card: क्रेडिट कार्डची ड्यू डेट निघून गेली? पेनल्टीपासून वाचण्यासाठी काय करायचं?क्रेडिट कार्डसाठी कागदपत्र यासोबतच तुमचा क्रेडिट स्कोअर 700 किंवा त्याहून अधिक असणे आवश्यक आहे. क्रेडिट कार्ड बनवण्यासाठी तुमच्याकडे पासपोर्ट, पॅन कार्ड, ड्रायव्हिंग लायसन्स, मतदार ओळखपत्र, आधार कार्ड ओळखपत्र आणि सिग्नेचर प्रूफ म्हणून कागदपत्र असणं आवश्यक आहे.
अॅड्रेस प्रुफसाठी बँक स्टेटमेंट, भाडे करार, मतदार ओळखपत्र, रेशनकार्ड, पासपोर्ट आणि टेलिफोन, वीज किंवा पाणी बिलाचे कागदपत्र असणे आवश्यक आहे. उत्पन्नाच्या पुराव्यासाठी तुम्ही सॅलरी स्लिप किंवा तुमचे 6 महिन्यांचे बँक स्टेटमेंट देऊ शकता.