जाहिरात
मराठी बातम्या / मनी / Credit Card: क्रेडिट कार्डची ड्यू डेट निघून गेली? पेनल्टीपासून वाचण्यासाठी काय करायचं?

Credit Card: क्रेडिट कार्डची ड्यू डेट निघून गेली? पेनल्टीपासून वाचण्यासाठी काय करायचं?

Credit Card: क्रेडिट कार्डची ड्यू डेट निघून गेली? पेनल्टीपासून वाचण्यासाठी करा ‘हे’ काम

Credit Card: क्रेडिट कार्डची ड्यू डेट निघून गेली? पेनल्टीपासून वाचण्यासाठी करा ‘हे’ काम

Credit Card: क्रेडिट कार्डचं बिल ड्यू डेट पूर्वी न भरल्यास बँका तुमच्यावर दंड आकारतात. तथापि एप्रिल 2022 मध्ये आरबीआयनं दिलेल्या आदेशानंतर हे बदललं आहे.

  • -MIN READ Mumbai,Maharashtra
  • Last Updated :

मुंबई, 12 डिसेंबर: एकापेक्षा जास्त क्रेडिट कार्ड वापरणारे लोक अनेकदा देय तारखेपर्यंत बिल भरण्यास विसरतात किंवा त्यांच्यासाठी क्रेडिट कार्ड भरणं कठीण होतं. अशा स्थितीत प्रत्येक वेळी कोणत्या कार्डाची देय तारीख कधी आली, हे त्यांच्या लक्षात राहत नाही आणि यामुळे त्यांना दंड भरावा लागतो. जर तुम्ही एकापेक्षा जास्त क्रेडिट कार्ड वापरत असाल आणि अनेकदा देय तारखेपर्यंत पैसे भरायला विसरलात तर तुम्हाला घाबरण्याची गरज नाही वास्तविक, आरबीआयच्या आदेशानुसार, देय तारखेनंतर 3 दिवसांपर्यंत बँक तुमच्यावर दंड आकारू शकत नाही. जर तुमची देय तारीख 15 डिसेंबर असेल तर तुम्हाला 18 तारखेपर्यंत कोणताही दंड आकारला जाणार नाही. आरबीआयनं क्रेडिट कार्ड ग्राहकांना बिल भरण्यासाठी अतिरिक्त 3 दिवसांची मुदत दिली आहे. RBI ने 21 एप्रिल 2022 रोजी या संदर्भात आदेश जारी केला होता. आता जर तुम्ही देय तारखेच्या 3 दिवसांनंतरही पेमेंट भरलं तर तुमच्या क्रेडिट स्कोअरमध्ये कोणताही फरक पडणार नाही. हेही वाचा:  PM Kisan Yojana: पुढील महिन्यात येऊ शकतो 13वा हप्ता, लाभ घेण्यासाठी त्वरित करा हे महत्त्वाचं काम क्रेडिट कार्ड बिलिंग सायकल समजून घ्या- क्रेडिट कार्डधारक क्रेडिट कार्डचे बिलिंग सायकल स्वतःच्या इच्छेनुसार ठरवतो. मात्र, ते किती दिवसांसाठी असेल ते बँक ठरवते. म्हणजे ही बिलिंग सायकल 27 दिवसांची असेल की 31 दिवसांची ही बँक तुम्हाला सांगेल. त्यानुसार तुम्ही तुमचे मासिक सायकल सेट करू शकता. तुमच्या 2 बिलिंग स्टेटमेंट्समधील कालावधीला बिलिंग सायकल म्हणतात. समजा तुमचे क्रेडिट कार्ड स्टेटमेंट 28 नोव्हेंबर रोजी तयार झालं आहे. म्हणजेच तुमचे नवीन बिलिंग सायकल 29 तारखेपासून सुरू होईल. आता देय तारीख 28 तारखेनंतर 15 दिवस असेल. म्हणजेच, बँक तुम्हाला पेमेंटसाठी अतिरिक्त 15 दिवस देते. त्याच वेळी, आता आरबीआयच्या आदेशानंतर, तुम्हाला आणखी 3 दिवस मिळतील.

News18लोकमत
News18लोकमत

पेमेंट वेळेवर न केल्यास काय होईल? जर तुम्ही क्रेडिट कार्डचे बिल वेळेवर भरले नाही तर त्याचा तुमच्या क्रेडिट स्कोअरवर परिणाम होतो. तुमचा क्रेडिट स्कोअर कमी होईल ज्यामुळे तुम्हाला कर्ज घेणे किंवा भविष्यात पुन्हा क्रेडिट कार्ड मिळवणे कठीण होईल. दुसरीकडे, तुम्ही तुमचे क्रेडिट कार्ड बिल वेळेवर भरल्यास, तुम्हाला कर्ज सहज आणि परवडणाऱ्या दरात मिळेल.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
  • First Published :
जाहिरात
जाहिरात