क्रेडिट कार्ड विचार करून वापरावं लागतं, आपत्कालीन परिस्थितीमध्ये तुम्ही वापरू शकता. पण काहीवेळा आपल्या खर्चावर नियंत्रण नसल्याने क्रेडिट कार्डचा वापर अति होतो आणि त्यामुळे बिल भरण्याचा लोड आपल्यावर येतो. सतत क्रेडिट कार्डने पेमेंट करणाऱ्यांवर हॅकर्सची नजर असते. त्यामुळे क्रेडिट कार्ड वापरताना जर तुम्हाला जपूनच वापरणं गरजेचं आहे.
हॅकर्सपासून क्रेडिट कार्डची सुरक्षा कशी अबाधित ठेवायची आणि ते वापरायचं याबाबत काही सोप्या ट्रिक्स आणि टेक्निक्स जाणून घेऊया. त्यामुळे तुमचं क्रेडिट कार्ड हॅकर्सच्या नजरेतून वाचेल आणि सुरक्षित पेमेंटही होईल.
क्रेडिट कार्डचे डिटेल्स कुठेही शेअर करू नका. कोणत्याही सोशल मीडियावर, चॅटबॉक्समध्ये कोणासोबतही अगदी फोनवर देखील तुमच्या क्रेडिट कार्डचे डिटेल्स, OTP, कार्ड नंबर, बँक खात्याचा नंबर शेअर करू नका.
तुम्ही क्रेडिट कार्डचं लिमिट मॅन्युअली सेट करू शकता. याशिवाय क्रेडिट कार्डच्या विशेष सुविधा तुम्ही बंद ठेवू शकता. जसं की वायफाय बिल पेमेंट असेल किंवा इतर. याशिवाय कोणत्याही साईटवर पासवर्ड सेव्ह करू नका.
तुमच्याकडे एकापेक्षा जास्त क्रेडिट कार्ड असतील तर फोन बिल, मासिक सब्सक्रिप्शन, ईएमआय आदी ऑटो पेमेंटसाठी तुम्ही एकच कार्ड वापरू शकता. हे कार्ड इतर कोणत्याही खर्चासाठी वापरू नका. आपण दररोजच्या वापरासाठी दुसरे कार्ड वापरू शकता.
आपल्या क्रेडिट कार्डचे बिल तपासणे ही चांगली सवय आहे. एचडीएफसी बँकेच्या वेबसाइटनुसार, संशयास्पद फी किंवा व्यवहारांची बिले तपासून आपल्या क्रेडिट कार्ड कंपनीला कळवा. चोरी किंवा फसवणूक झाल्यास तत्काळ घटनेची माहिती द्या, जेणेकरून कार्डवर केलेल्या व्यवहारांचे पेमेंट होऊ नये.
स्कॅमर्स सहसा क्रेडिट कार्ड वापरकर्त्यांना मोठ्या प्रमाणात कॅशबॅक आणि बिले किंवा फी भरण्याची विनंती करतात. असा फोन किंवा मेसेज आल्यास घाबरून जाऊ नका आणि लगेच पैसे भरण्याची घाई करू नका. कोणत्याही आकर्षक ऑफर्स किंवा डीलला बळी पडू नका.