मराठी बातम्या /बातम्या /मनी /ट्विटरच्या भारतातील दोन ऑफिसला कुलूप! आता कर्मचाऱ्यांचं काय होणार?

ट्विटरच्या भारतातील दोन ऑफिसला कुलूप! आता कर्मचाऱ्यांचं काय होणार?

ट्विटरचे भारतातील दोन ऑफिस बंद

ट्विटरचे भारतातील दोन ऑफिस बंद

ट्विटरने भारतात कार्यरत असलेल्या 3 पैकी 2 कार्यालये बंद केली आहेत. गेल्या वर्षी कंपनीने भारतातील 90 टक्के कर्मचाऱ्यांना काढून टाकले होते.

  • News18 Lokmat
  • Last Updated :
  • Mumbai, India

नवी दिल्ली, 17 फेब्रुवारी: मायक्रोब्लॉगिंग साइट ट्विटरने भारतातील तीनपैकी दोन कार्यालये बंद केली आहेत. यासोबतच कंपनीने आपल्या सर्व कर्मचाऱ्यांना घरून काम करण्यास सांगितले आहे. खर्च कमी करण्यासाठी ट्विटरने हे पाऊल उचलले आहे. विशेष म्हणजे, गेल्या वर्षी ट्विटरने आपल्या भारतातील कार्यालयातील सुमारे 90 टक्के कर्मचाऱ्यांना कामावरून काढून टाकले होते. 200 हून अधिक लोकांना याचा फटका बसला. या निर्णयानंतर आता कंपनीने मुंबई आणि नवी दिल्लीतील ऑफिसर बंद करण्याचा निर्णय घेतला होता, जे ऑफिस आता बंद करण्यात आले आहेत. त्याचबरोबर कंपनीचे बंगळुरूमधील कार्यालय पूर्वीप्रमाणेच सुरू राहणार आहे.

Post Office देतेय कमाई करण्याची संधी! आता घरबसल्या कमवा पैसे

कंपनीने दोन कार्यालये का बंद केली

एलोन मस्क यांनी कंपनी ताब्यात घेतल्यानंतरच 50 टक्के कर्मचाऱ्यांना कामावरून काढून टाकण्यात आले. मस्क यांनी ट्विटर 44 अब्ज डॉलर्समध्ये विकत घेतले. तेव्हापासून त्यांची रक्कम वसूल करण्यासाठी ते कंपनीचा खर्च कमी करण्याचा सातत्याने प्रयत्न करत आहेत. मस्क यांनी सर्वप्रथम कंपनीचे तत्कालीन सीईओ पराग अग्रवाल यांना काढून टाकले. याशिवाय त्यांनी कंपनीतील इतरही अनेक टॉप अधिकाऱ्यांना कामावरून काढून टाकले होते.

काय सांगता! स्वतःच्याच केसांद्वारे करता येते कमाई, दरमहा मिळतील 25 हजार रुपये

वर्षाच्या अखेरीस परिस्थिती सुधारेल

कामावरून काढण्यात आलेल्या कर्मचाऱ्यांना पाठवलेल्या ईमेलमध्ये मस्क म्हणाले होते की, 'हा एक कठीण निर्णय होता, परंतु कंपनीची परिस्थिती सुधारणे आवश्यक होते. यासोबतच जानेवारी 2023 मध्ये मस्क यांनी 2023 च्या अखेरीस ट्विटरच्या स्थितीत काही सुधारणा होण्याची शक्यता व्यक्त केली होती. मस्क कंपनीची कमाई वाढवण्यासाठी सतत नवीन मार्ग शोधत आहे. त्यांनी ब्लू टिक मिळवण्यासाठी 'पेड ब्लू सबस्क्रिप्शन' सारखी नवीन वैशिष्ट्ये देखील सुरू केली आहेत.

First published:
top videos

    Tags: Elon musk, Twitter