जाहिरात
मराठी बातम्या / मनी / ट्विटरचं ब्लू टिक की SIP? कशासाठी पैसे मोजायचे समजून घ्या फायद्या तोट्याचं गणित

ट्विटरचं ब्लू टिक की SIP? कशासाठी पैसे मोजायचे समजून घ्या फायद्या तोट्याचं गणित

ट्विटरचं ब्लू टिक की SIP? कशासाठी पैसे मोजायचे समजून घ्या फायद्या तोट्याचं गणित

ठराविक रक्कम एसआयपीमध्ये गुंतवली तर दीर्घ काळासाठी मिळणारा फायदा चांगला असतो.

  • -MIN READ Trending Desk Mumbai,Maharashtra
  • Last Updated :

    मुंबई: बाजारात गुंतवणुकीचे असंख्य पर्याय उपलब्ध आहेत. अनेक जण एसआयपी, आरडी आणि बँकेच्या विविध योजनांमध्ये पैसे गुंतवून नफा मिळवण्याच्या दृष्टीनं विचार करत असतात. सध्या SIP म्हणजेच सिस्टिमॅटिक इन्व्हेस्टमेंट प्लॅनमध्ये गुंतवणूक करण्यालाही प्राधान्य दिलं जात आहे. ठराविक रक्कम एसआयपीमध्ये गुंतवली तर दीर्घ काळासाठी मिळणारा फायदा चांगला असतो. एका छोट्या उदाहरणावरून हे समजून घेता येईल. ट्विटर ची सूत्रं सध्या इलॉन मस्क यांच्याकडे आली आहेत. त्यानंतर त्यांनी कंपनीच्या धोरणात अनेक बदल केले. व्हेरिफाइड युझरसाठी आतापर्यंत मोफत असलेल्या ‘ब्लू टिक’साठी आता प्रति महिना आठ डॉलर म्हणजे जवळपास 650 रुपये आकारले जाणार आहेत. तसं पाहायला गेलं, तर ब्लू टिकमुळे कोणत्याही प्रकारचा नफा होणार नाही; मात्र ब्लू टिकवर खर्च होणार असलेल्या रकमेएवढी गुंतवणूक एसआयपीत केली तर 10 वर्षांत 78,000 रुपये गुंतवून त्यावर 73,000 रुपयांचा परतावा मिळवता येऊ शकतो. अर्थात ब्लू टिक ही विश्वासार्हतेची निदर्शक आहे. त्याची उपयुक्तता वेगळी आहे. त्यामुळे ब्लू टिक आणि एसआयपी यांची तुलना करणं योग्य नाही; मात्र तरीही आर्थिकदृष्ट्या तुलना करायची झाल्यास, एसआयपी उपयुक्त ठरू शकते. त्याबद्दल थोडं जाणून घेऊ या. स्पेसएक्सचे फाउंडर आणि सीईओ इलॉन मस्क यांच्याकडे ट्विटरची मालकी आल्यानंतर त्यांनी अनेक बदल केले. यात अकाउंट व्हेरिफाय करणाऱ्या ब्लू टिकबाबतचा निर्णय सर्वांसाठी आश्चर्यकारक होता.

    गर्भवती असताना ट्विटर कंपनीसाठी घेतले अहोरात्र कष्ट; आता कामावरून काढून टाकल्यामुळे सुजाताला देश सोडावा लागणार?

    या निर्णयावरून मस्क यांच्यावर टीकाही केली जात आहे. आधी मोफत असलेल्या या सेवेसाठी आता महिन्याला अंदाजे 650 रुपये द्यावे लागणार आहेत. हीच रक्कम आता एसआयपीत गुंतवली तर यापासून मिळणार फायदा निश्चितच चांगला असणार आहे. एसआयपीतली गुंतवणूक कशी फायद्याची ट्विटरच्या ब्लू टिकसाठी आता दर महिन्याला अंदाजे 650 रुपये खर्च करावे लागणार आहेत. 10 वर्षांत ही रक्कम 78,000 रुपयांवर जाते. दुसरीकडे एसआयपीत आपण दर महिन्याला 650 रुपये जमा केल्यास आपली निव्वळ बचत 78,000 इतकी होईल. ही रक्कम नेहमीसाठी सुरक्षित असणार आहे. शिवाय मॅच्युरिटीनंतर यावर मिळणारा परतावा आकर्षक असणार आहे. महिन्याला 650 गुंतवून किती मिळेल फायदा ट्विटरच्या ब्लू टिकवरचा खर्च आणि एसआयपीतली प्रत्यक्ष गुंतवणूक यांची तुलना केल्यास एसआयपी फायद्याचा व्यवहार ठरू शकतो. कारण एसआयपीत दर महिन्याला गुंतवल्या जाणाऱ्या 650 रुपयांवर दर महिन्याला 12 टक्क्यांचा रिटर्न जोडला गेल्यास 10 वर्षांत ही रक्कम जवळपास दुप्पट होते. एसआयपी कॅलक्युलेटरच्या माध्यमातून हे समजून घेऊ या.

    भारतात Blue Tick साठी ट्विटर कधीपासून पैसे आकारणार? इलॉन मस्कने दिलं उत्तर
    News18लोकमत
    News18लोकमत

    650 रुपये दर महिन्याला जमा केल्यास 10 वर्षांत 78,000 रुपये जमा होतील. यावर 12 टक्के जोडल्यास 73,000 रुपये रिटर्न मिळेल. याचाच अर्थ 10 वर्ष जितकी रक्कम गुंतवाल तेवढीच रक्कम तुमच्या खात्यात जमा होईल.

    मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
    • First Published :
    जाहिरात
    जाहिरात