मुंबई : ट्विटर युजर्ससाठी मोठा धक्का आहे. जर तुम्हीही ट्विटर वापरत असाल आणि तुमच्याकडे ब्लू टिक असेल तर यापुढे तुम्हाला जास्त पैसे खर्च करावे लागतील. एलन मस्क यांच्या मालकीची कंपनी ट्विटरने युजर्ससाठी ब्लू टिकच्या किंमतीत वाढ केली आहे. कंपनीने म्हटले आहे की, यापुढे अँड्रॉइड युजर्सना दरमहा 11 डॉलर म्हणजेच 894 रुपये खर्च करावे लागतील.
पहिल्यांदा ब्लू टिकसाठी 8 डॉलर म्हणजे दर महिन्याला 650 रुपये द्यावे लागणार होते. आता ही किंमत वाढवण्यात आली आहे. आता 84 डॉलर म्हणजे साधारण 6830 रुपये वर्षाला भरावे लागणार आहेत. जे लोक ब्लू टिकसाठी पेमेंट करत आहेत त्याचं अकाउंट व्हेरिफाइड दाखवलं जात असल्याची माहिती मिळाली आहे.
ट्विटरचा चेहरामोहरा बदलणार; एलॉन मस्क यांनी केली नवी घोषणा
अमेरिका, कॅनडा, युनायटेड किंगडम, जपान, न्यूझीलंड आणि ऑस्ट्रेलिया या देशांसाठी लागू होणार आहे. कंपनीच्या म्हणण्यानुसार आहे की जर आपण आमच्या सेवेच्या अटींचे उल्लंघन केले किंवा आपले खाते निलंबित केले गेले असेल तर आपण कोणत्याही परताव्याच्या ऑफरशिवाय कोणत्याही सूचना न देता कोणत्याही वेळी आपला ब्लू टिक काढून टाकण्याचा अधिकार राखून ठेवला आहे.
मायक्रो-ब्लॉगिंग प्लॅटफॉर्मने पुढे सांगितले आहे की ते संस्थांसाठी ट्विटर व्हेरिफिकेशन नावाची एक नवीन सेवा देखील चालवत आहे. संस्थांसाठी गोल्डन टिक असणार आहे. तर निळ्या रंगाचं टिक हे व्हेरिफाइड खात्यासाठी असणार आहे.
एलन मस्क यांचा अजब विश्वविक्रम, आता श्रीमंती नाही तर या कारणासाठी चर्चेत
ब्लू चेकमार्कसोबत ट्विटर ब्लू फीचर ग्राहकांसाठी खास असणार आहे. चांगल्या सुविधा देणार असल्याचं ग्वाही देखील दिली आहे. कस्टम अॅप आयकॉन, कस्टम नेव्हिगेशन, लेख आणि लाँग व्हिडीओ अपलोड करण्याची परवानगी दिली जाणार आहे.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.