मराठी बातम्या /बातम्या /मनी /एलन मस्क यांचा अजब विश्वविक्रम, आता श्रीमंती नाही तर या कारणासाठी चर्चेत

एलन मस्क यांचा अजब विश्वविक्रम, आता श्रीमंती नाही तर या कारणासाठी चर्चेत

मोठ्या प्रमाणात कर्मचाऱ्यांची कपात केली. तरी देखील एलन मस्क यांचं नुकसान होणं काही केल्या थांबेना अशी अवस्था आताच्या घडीला झाली आहे.

मोठ्या प्रमाणात कर्मचाऱ्यांची कपात केली. तरी देखील एलन मस्क यांचं नुकसान होणं काही केल्या थांबेना अशी अवस्था आताच्या घडीला झाली आहे.

मोठ्या प्रमाणात कर्मचाऱ्यांची कपात केली. तरी देखील एलन मस्क यांचं नुकसान होणं काही केल्या थांबेना अशी अवस्था आताच्या घडीला झाली आहे.

  • News18 Lokmat
  • Last Updated :
  • Mumbai, India

मुंबई : एकेकाळी जगातील सर्वात श्रीमंत व्यक्ती म्हणून एलन मस्क यांच्याकडे पाहिलं जात होतं. त्यांच्या नावाची चर्चा होती मात्र आजच्या घडीला त्यांच्या नावावर अनोख्या आणि नकोशा विश्वविक्रमाची नोंद करण्यात आली आहे. एलन मस्क यांचं ट्विटरसोबत डिल होत असतानाच नुकसान होत होतं. मात्र तरीही त्यांनी ट्विटरचे मालकी हक्क आपल्याकडे घेतले.

मोठ्या प्रमाणात कर्मचाऱ्यांची कपात केली. तरी देखील एलन मस्क यांचं नुकसान होणं काही केल्या थांबेना अशी अवस्था आताच्या घडीला झाली आहे. आधीच आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत मंदीचं सावट आहे. याचा फटका जगातील एकेकाळी सर्वात श्रीमंत असलेल्या एलन मस्क यांनाही बसला आहे. एलन मस्क यांना 2022 अखेरपर्यंत आपल्या संपत्तीमधील 15 लाख कोटी रुपयांचं नुकसान झालं आहे.

एलन मस्क हे जगातील पहिले व्यक्ती ठरले आहेत, ज्यांनी सुमारे 200 अब्ज डॉलर्सचे नुकसान केले आहे. हा किती मोठा विक्रम आहे, यावरून तुम्ही अंदाज लावू शकता की आता यासाठी त्याच्या नावाची गिनीज वर्ल्ड रेकॉर्डमध्येही नोंद झाली आहे. रिपोर्टनुसार, नोव्हेंबर 2021 पासून त्यांनी सुमारे 180 अब्ज डॉलर संपत्ती गमावली आहे.

ट्विटरचा चेहरामोहरा बदलणार; एलॉन मस्क यांनी केली नवी घोषणा

मस्क यांनी मायक्रोब्लॉगिंग प्लॅटफॉर्म ट्विटर विकत घेतल्यापासून त्यांचे ग्रह फिरले आणि वाईट दिवस सुरू झाले असंच सध्याच्या परिस्थितीवरून दिसत आहे. फोर्ब्सच्या मते एलन मस्क यांची संपत्ती आता 143 अब्ज डॉलरवर आली. 4 नोव्हेंबर 2021 रोजी एलन मस्क यांची संपत्ती अचानक 340 अब्ज डॉलरपर्यंत वाढली. डिसेंबर 2022 मध्ये एलन मस्क यांना दररोज सरासरी 2 अब्ज डॉलरचे नुकसान सहन करावे लागले.

टेस्लाच्या कामगिरीमुळे 2022 मध्ये टेस्लाच्या शेअर्सचे मूल्य 65% च्या आसपास घसरले. या फर्मने वर्षभरात फक्त १.३ दशलक्ष वाहने दिली, वॉल स्ट्रीटच्या अपेक्षेपेक्षा कमी पडली. टेस्लाचे शेअर्स विकायला लागले होते.

Tweet एडिट करता येणार; DP बदलला तरी ब्लू टिक होणार गायब, Twitter मध्ये आजपासून हे मोठे बदल

ट्विटर टेकओव्हर केल्यानंतर बराच वादही झाला. कर्मचाऱ्यांना कामावरून काढणं. त्यांचे पगार न देणं या सगळ्यामुळे नवा वाद ओढवला. ट्विटरचे शेअर्स देखील घसरले आहेत. या सगळ्याचा फटका मस्क यांना बसला आहे.

First published:

Tags: Elon musk, Twitter, Twitter account