जाहिरात
मराठी बातम्या / टेक्नोलाॅजी / ट्विटरचा चेहरामोहरा बदलणार; एलॉन मस्क यांनी केली नवी घोषणा

ट्विटरचा चेहरामोहरा बदलणार; एलॉन मस्क यांनी केली नवी घोषणा

ट्विटरचा चेहरामोहरा बदलणार; एलॉन मस्क यांनी केली नवी घोषणा

मुंबई, 10 जानेवारी : गेल्या काही महिन्यांपासून ट्विटर आणि त्या कंपनीचे मालक प्रसिद्ध अब्जाधीश एलॉन मस्क जोरदार चर्चेत आहेत. ट्विटरची मालकी मस्क यांच्याकडे आल्यानंतर त्यांनी नवनवीन निर्णयांचा धडाका लावला आहे. त्यांचे बहुतेकसे सर्वच निर्णय चर्चेत आले आहेत. यात आता आणखी एका निर्णयाची भर पडणार आहे. लवकरच ट्विटरच्या युझर इंटरफेसमध्ये एक मोठा बदल होईल, अशी घोषणा मस्क यांनी केली आहे. या नव्या फीचरविषयी खुद्द मस्क यांनी माहिती दिली आहे. नवीन फीचरमुळे युझर्सना अधिक चांगला अनुभव मिळेल, असं बोललं जात आहे.

  • -MIN READ Trending Desk Mumbai,Maharashtra
  • Last Updated :

    मुंबई, 10 जानेवारी : गेल्या काही महिन्यांपासून ट्विटर आणि त्या कंपनीचे मालक प्रसिद्ध अब्जाधीश एलॉन मस्क जोरदार चर्चेत आहेत. ट्विटरची मालकी मस्क यांच्याकडे आल्यानंतर त्यांनी नवनवीन निर्णयांचा धडाका लावला आहे. त्यांचे बहुतेकसे सर्वच निर्णय चर्चेत आले आहेत. यात आता आणखी एका निर्णयाची भर पडणार आहे. लवकरच ट्विटरच्या युझर इंटरफेसमध्ये एक मोठा बदल होईल, अशी घोषणा मस्क यांनी केली आहे. या नव्या फीचरविषयी खुद्द मस्क यांनी माहिती दिली आहे. नवीन फीचरमुळे युझर्सना अधिक चांगला अनुभव मिळेल, असं बोललं जात आहे. अब्जाधीश एलॉन मस्क त्यांची नवी कंपनी असलेल्या ट्विटरमध्ये लवकरच एक नवीन आणि मोठा बदल करणार आहेत. त्यांनी ट्विटरच्या युझर इंटरफेसमध्ये अर्थात यूआयमध्ये बदल करण्याचा निर्णय घेतला आहे. यामुळे युझर्सना अ‍ॅपचा अधिक चांगला अनुभव मिळेल, असं सांगितलं जात आहे. हा नवीन बदल युझर्सना येत्या काही दिवसांत अनुभवायला मिळेल. कंपनी युझर्सना रेकमंडेड आणि फॉलो ट्विटमध्ये स्वाइप करण्याचा ऑप्शनदेखील उपलब्ध करून देणार आहे. यामुळे युझर्सना सिंपल लेफ्ट किंवा राइट स्वाइप जेस्चरच्या मदतीने रेकमंडेड आणि फॉलो ट्विट पाहता येणार आहे. हे डिझाइन या आठवड्याच्या अखेरीस जारी केलं जाणार आहे. हेही वाचा :  गुगलचा युजर्सना झटका; `ही` सुविधा लवकरच होणार बंद सध्या युझर्सना ट्विट दोन वेगवेगळ्या प्रकारात पाहता येतं. एखाद्या युझरने होमपेजच्या उजवीकडच्या वरील बाजूला असलेल्या स्टार बटणावर क्लिक केलं तर प्लॅटफॉर्म for you आणि लेटेस्टचा ऑप्शन दाखवतं. यात for you या ऑप्शनमध्ये युझर्सना रेकमंडेड ट्विट्स पाहायला मिळतात. लेटेस्ट ऑप्शनमध्ये युझर फॉलो करत असलेल्या अकाउंट्सची नवीन ट्विट्स पाहता येतात. आता नवीन फीचरमुळे युझर्सना सिंपल जेस्चरच्या मदतीने फॉलो अकाउंट्स किंवा रेकमंडेड ट्विट्स पाहता येणार आहेत. याचा अर्थ या दोन्हीकरता युझर्सना केवळ स्वाइप जेस्चरचा वापर करावा लागेल.

    News18लोकमत
    News18लोकमत

    याशिवाय, कंपनी आता बुकमार्क फीचरमध्ये सुधारणा करणार असल्याची घोषणा मस्क यांनी केली आहे. यामुळे युझर्स एखादं ट्विट सेव्ह करू शकतील, हे फीचरच्या नावावरूनच स्पष्ट होतं. सेव्ह केलेली ट्विट्स युझरला नंतर पाहता येऊ शकतील. सध्या हे फीचर अ‍ॅक्सेस करण्यासाठी युजरला एखाद्या ट्विटच्या शेअर बटणावर क्लिक करावं लागतं. हे फीचर निवडक युझर्ससाठी असेल की सर्व युझर्सना ते वापरता येईल, हे अद्याप स्पष्ट झालेलं नाही. याशिवाय मस्क यांनी लाँग फॉर्म ट्विटबाबतही घोषणा केली आहे. `हे फीचर फेब्रुवारी महिन्याच्या सुरुवातीला जारी केलं जाईल,` असं मस्क यांनी सांगितलं आहे.

    मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
    Tags: twitter
    • First Published :
    जाहिरात
    जाहिरात