महिलेला स्वतःच्याच हाताने करावी लागली प्रसूती..नागपुरातील धक्कादायक प्रकार

महिलेला स्वतःच्याच हाताने करावी लागली प्रसूती..नागपुरातील धक्कादायक प्रकार

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांचे होमटाऊन असलेल्या नागपुरातील एक धक्कादायक घटना समोर आली आहे.

  • Share this:

प्रवीण मुधोळकर (प्रतिनिधी)

नागपूर, 3 जून- मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांचे होमटाऊन असलेल्या नागपुरातील एक धक्कादायक घटना समोर आली आहे. महिलेला स्वतःच्याच हाताने प्रसूती करावी लागली आहे. ही दुदैवी घटना आशिया खंडातील दुसऱ्या क्रमांकाचे रुग्णालय अर्थात नागपूरच्या शासकीय रुग्णालयात घडली आहे. या घडनेमुळे डॉक्टर आणि परिचरिकांचा निष्काळजीपणा चव्हाट्यावर आला आहे.

बाळ आणि बाळंतीनला झोपवले फरशीवर..

धक्कादायक म्हणजे बाळ आणि बाळंतीनला फरशीवर झोपवण्यात आले. सुदैवाने बाळ आणि बाळंतीन सुखरूप आहे. परंतु या घटनेने मुख्यमंत्री आणि केंद्रीय मंत्र्यांच्या शहरातील आरोग्य सेवेचा ढिसाळ कारभार जगासमोर आणला आहे.

नागपूरच्या शासकीय वैद्यकिय रुग्णालयात हा धक्कादायक प्रकार रविवारी पहाटे घडला. सुकेशनी चतारे असे पीडित महिलेचे नाव आहे. सुकेशनी हिच्या पतीने सांगितले की, सुकेशनीला रविवारी पहाटे प्रसूती वेदना व्हायला लागल्या. पण डॉक्टर झोपेत होते. तिला वेदना असाह्य झाल्याने तिला स्वता:च प्रसूती करावी लागली. त्यानंतरही शासकीय रुग्णालयातील डॉक्टर आणि परिचरिकांचा निष्काळजीपणा थांबला नाही. बाळ आणि बाळंतीनला अक्षरश: फरशीवर झोपवण्यात आले.

पालकमंत्र्यांनी चौकशीचे आदेश..

नागपुरातील या धक्कादायक घटनेची सरकारने गंभीर दखल घेतली आहे. नागपूरचे पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी या सर्व प्रकाराची चौकशीचे आदेश दिले आहेत. दोषी डॉक्टर आणि परिचरिकांवर कारवाई करण्यात येईल, बावनकुळे यांनी सांगितले आहे. या संदर्भात आपण वैद्यकिय शिक्षणमंत्री गिरीश महाजन यांची भेट घेणार असल्याचेही बावनकुळे यांनी सांगितले आहे.

या घटनेची चौकशी करण्यासाठी शासकीय वैद्यकिय महाविद्यालय आणि रुग्णालय प्रशासनाने समिती स्थापन करण्यात आली आहे. उद्या दुपारपर्यंत समिती आपला अहवाल सादर करणार असल्याची माहिती प्रभारी अधिष्ठाता नरेंद्र तिरपुडे यांनी दिली आहे. पेशंटचा संख्या जास्त आहे. त्यामुळे हॉस्पिटलमध्ये बेड शिल्लक नाहीत, असेही तिरपुडे यांनी सांगितले आहे.


SPECIAL REPORT : एकीच्या नशिबी परदेश दुसरीच्या बुधवार पेठ, दोन बहिणींची डोळ पाणवणारी भेट!

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

Tags:
First Published: Jun 3, 2019 12:50 PM IST

ताज्या बातम्या