मराठी बातम्या /बातम्या /करिअर /वडिलांच्या आजारपणात उभा केला आयुर्वेदिक उत्पादन निर्मिती व्यवसाय; 'तिची' प्रेरणादायी कथा

वडिलांच्या आजारपणात उभा केला आयुर्वेदिक उत्पादन निर्मिती व्यवसाय; 'तिची' प्रेरणादायी कथा

आपल्यावर आलेल्या संकटाला संधी मानत,तिने 2019 मध्ये आरोग्यदायी उत्पादनांची निर्मिती सुरु केली. वडिलांची आजारपणात सुश्रूषा करताना सुचलेली कल्पना तिच्यासाठीनवी संधी घेऊन आली. या संधीचा फायदा घेत तिनं उद्योग व्यवसायात भरारी घेतली.

आपल्यावर आलेल्या संकटाला संधी मानत,तिने 2019 मध्ये आरोग्यदायी उत्पादनांची निर्मिती सुरु केली. वडिलांची आजारपणात सुश्रूषा करताना सुचलेली कल्पना तिच्यासाठीनवी संधी घेऊन आली. या संधीचा फायदा घेत तिनं उद्योग व्यवसायात भरारी घेतली.

आपल्यावर आलेल्या संकटाला संधी मानत,तिने 2019 मध्ये आरोग्यदायी उत्पादनांची निर्मिती सुरु केली. वडिलांची आजारपणात सुश्रूषा करताना सुचलेली कल्पना तिच्यासाठीनवी संधी घेऊन आली. या संधीचा फायदा घेत तिनं उद्योग व्यवसायात भरारी घेतली.

  नवी दिल्ली, 9 मार्च: आपल्यावर आलेल्या संकटाला संधी मानत तिने 2019 मध्ये आरोग्यदायी उत्पादनांची निर्मिती सुरू केली. वडिलांची आजारपणात सुश्रूषा करताना सुचलेली कल्पना तिच्यासाठी नवी संधी घेऊन आली. या संधीचा फायदा घेत तिनं उद्योग व्यवसायात भरारी घेतली. जम्मू येथील रिधीमा अरोरा आज नामह्या फूडसच्या (Namhya Foods) माध्यमातून उत्तमोत्तम आरोग्यदायी पदार्थांची निर्मिती करतात. त्यांचा प्रवास जसा रंजक आहे, तसाच तो प्रेरणादायी देखील. जाणून घेऊया या प्रवासाविषयी...

  जम्मू (Jammu) येथील रिधीमा अरोरा (Riddhima Arora) यांनी 2019 मध्ये Namhya Foods या नावाने व्यवसायाला सुरुवात केली. या माध्यमातून त्या अनेक आरोग्यदायी पदार्थ्यांची (Healthy Foods)निर्मिती करतात. यात प्रामुख्याने लिव्हर आणि हार्टच्या आरोग्यासाठी हर्बल टी,इन्स्टंट ब्रेकफास्ट मिक्सेस, रोगप्रतिकारक शक्ती वाढवणारी कॉफी, हेल्दी स्नॅक्स, पीसीओएस (PCOS)आणि डायबेटिस (Diabetes)आटोक्यात ठेवणाऱ्या चहा यांचा समावेश आहे.

  याबाबत 29 वर्षीय रिधीमा सांगतात की माझे वडील आजारी पडल्यानंतर त्यांची सेवा सुश्रूषा करण्यासाठी मला तीन महिन्यांसाठी जॉबमधून ब्रेक घ्यावा लागला. माझ्या वडिलांना लिव्हर सिरॉसिस (Liver Cirrhosis)  हा आजार असल्याचे निदान झाले. त्यांची तब्येत वेगाने ढासळत असल्याने उपचार करणं शक्य नसल्याचं डॉक्टरांनी सांगितलं. त्यामुळे ते घरीच होते. त्यांना स्वच्छ, पोषक आणि स्थानिक भागातील आहार कसा मिळेल, याकडे मी लक्ष देत होते. त्यानंतर मी वडिलांना आयुर्वेदिक आणि पारंपरिक पदार्थांचा समावेश असलेला हर्बल टी देण्यास सुरुवात केली. माझ्या कुटुंबानं पॅकेजिंग फूडस आणि वस्तूंचा वापर पूर्णतः वर्ज्य केला. आणि आम्ही स्थानिक शेतकऱ्यांनी पिकवलेला शेतीमाल खरेदी करण्यास सुरुवात केली. त्यापैकी माझ्या वडिलांनी आयुर्वेदिक गुणधर्म असलेले हरीदाती (इंडियन हॉग प्लम) आणि हरड यांसारख्या जंतुनाशक म्हणून उपयुक्त असलेल्या औषधी वनस्पतींचं सेवन सुरू केलं. त्यानंतर 3 महिन्यातच त्यांच्या प्रकृतीत सुधारणा दिसून आली. लिव्हर सिरॉसिस हा आजार असाध्य असला तरी माझ्या वडिलांनी योग्य आहार आणि नियमित व्यायामाने या आजारावर मात केली. आता ते दररोज कामावर जातात. त्यांनी ड्राय फ्रुटस, औषधी वनस्पती, सेंद्रिय उत्पादने आणि आयुर्वेदिक औषधे (Ayurvedic medicine) विक्रीच्या आमच्या 80 वर्षे जुन्या कौटुंबिक व्यवसायाची जबाबदारी पुन्हा सांभाळली असल्याचे रिधीमा यांनी सांगितले.

  द बेटर इंडियाच्या वृत्तानुसार,2019 च्या अखेरीस रिधीमा अरोरा यांनी Namhya Foods या उद्योगास सुरुवात केली. या माध्यमातून त्या लिव्हर आणि हार्टच्या आरोग्यासाठी हर्बल टी, इन्स्टंट ब्रेकफास्ट मिक्सेस, रोगप्रतिकारक शक्ती वाढवणारी कॉफी,हेल्दी स्नॅक्स आणि पीसीओएस,डायबेटीस आटोक्यात आणणाऱ्या चहा अशी उत्पादने आणली आहेत. यासाठी रिधीमा यांनी पारंपारिक पाककृती संकलित करण्यास सुरुवात केली. विविध पाककृतींमध्ये घटक पदार्थांचे प्रमाण किती व कसे असावे,हे समजून घेण्यासाठी त्यांनी आयुर्वेदिक तज्ज्ञांची मदत घेतली. तसेच आंतरराष्ट्रीय आयुर्वेद अकादमीच्या सहकार्याने बंगळुरु येथील यूव्हीएएस आयुर्वेद येथे तीन महिन्यांचा आयुर्वेद प्रमाणपत्र अभ्यासक्रमही पूर्ण केला. माझ्या कौटुंबिक पार्श्वभूमीमुळे मला आयुर्वेदिक संकल्पनाचा परिचय असला तरी या कोर्समुळे माझे ज्ञान रिफ्रेश आणि अपग्रेड होण्यास मदत झाल्याचे रिधीमा सांगतात.

  रगॅनिक प्रोड्युस

  माझ्याकुटुंबांतील व्यक्तींचा स्थानिक शेतकऱ्यांशी(Local Farmers)चांगला संपर्क असल्यानेमीकच्च्या मालासाठी पुरवठादार शेतकऱ्यांची साखळी तयारकेली. यासाठी मला काही महिने लागले कारण औषधी वनस्पतींचे उत्पादन घेणारे शेतकरी मिळणे हे खूप कठीण काम होते. उत्पादन हे सेंद्रियच आहे हे तपासण्यासाठी रिधीमा उत्पादक शेतकऱ्यांकडे जात उत्पादन प्रक्रियेचा आढावा घेत.

  रिधीमा यांनी कुटुंबाच्या मालकीच्या जागेत उत्पादन युनिट उभारले. त्यानंतर ग्राईंडर,कटींग आणि पॅकेजिंगसाठी आवश्यक मशीनरी खरेदी केली. उत्पादने तयार करण्यासाठी तसेच पदार्थ शिजवण्याच्या कामासाठी स्थानिक मजुरांचा वापर केला.

  काही महिन्यांच्या संशोधन आणि विकासानंतर जानेवारी 2020 मध्ये रिधीमा यांनी 3 प्रकारच्या हर्बल टीचे (Herbal Tea) उत्पादन सुरु केले.

  20 वर्षीय आर्यन मेहरा हे त्यांच्या आजोबांसह पंजाबमधील अमृतसर येथे राहतात. रिधीमा अरोरा यांची उत्पादने आम्हाला फायदेशीर ठरल्याचे ते सांगतात. आर्यन यांच्या आजोबांना तीन ब्लॉक असल्याचे निदान झाल्यानंतर डॉक्टरांनी त्यांना आरोग्यदायी आहार घेण्याचा सल्ला दिला होता. एप्रिल 2020 मध्ये इन्स्टाग्रामवरुन मलाNamhya Foods ची माहिती मिळाली आणि मी आजोबांसाठी हार्ट टी खरेदी केला. तीन महिने या टी चे सेवन आणि आहारात योग्य बदलांमुळे माझ्या आजोबांची प्रकृती आता सुधारली आहे. डॉक्टरांनाही ही सुधारणा जाणवल्याचे आर्यन सांगतात.

  आता एक वर्षाच्या प्रवासानंतर Namhya Foods आता तब्बल 26 विविध उत्पादनांची निर्मिती करते. त्यात टर्मरिक लेट्टी पावडर, डायबेटिस-हार्ट-लिव्हर केअर टी, रागी-मिलेट बेस ब्रेकफास्ट मिक्स, पीसीओएस रेग्युलेटींग ड्रिंक, लहानमुलांसाठी कोको फ्लेवर्ड दालचिनी कॉफी यांचा समावेश आहे.

  (हे पाहा:खूशखबर! ठाकरे सरकारच्या अर्थसंकल्पात महिलांसाठी पाच मोठ्या घोषणा; जाणून घ्या)

  खाताना सावधगिरी बाळगा

  अनेक लोक कोणत्या घटकांचा समावेश आहे न पाहता हेल्दीच्या नावाखाली पॅकेजिंग फूडसला प्राधान्य देतात. शुगर फ्री, डाएट सप्लिमेंटस आणि अन्य पदार्थ हेल्दीच्या नावाखाली विक्री केले जातात. या पदार्थांमध्ये मैदा, प्रिझरव्हेटिव्हज फ्रॅक्टोज सारखे आरोग्याला घातक पदार्थ असतात. त्यामुळे घरगुती पारंपारिक रेसिपीज वापरुन मी आयुर्वेदिक, हर्बल आणि आरोग्यदायी पदार्थांची निर्मिती करण्याचा निर्णय घेतला. त्यामुळे मी 2019 मध्ये जॉब सोडून उद्योग सुरू करु शकले. माझ्या कंपनीने नुकतीच 1 कोटींची उलाढाल पूर्ण केली असून, आमची उत्पादन संपूर्ण भारतासह कॅनडा आणि युएईमध्येही उपलब्ध असल्याचे रिधीमा अरोरा यांनी सांगितले.

  First published:

  Tags: Business News