Home /News /money /

Investment Options : यावर्षी 'या' तीन पद्धतीने चांगले पैसे कमवले जाऊ शकतात; चेक करा गुंतवणुकीचे पर्याय

Investment Options : यावर्षी 'या' तीन पद्धतीने चांगले पैसे कमवले जाऊ शकतात; चेक करा गुंतवणुकीचे पर्याय

चांगल्या क्वालिटीचे ब्लू-चिप किंवा मिड-कॅप आणि स्मॉल-कॅप स्टॉक देखील मजबूत परतावा देऊ शकतात. पण तुमची गुंतवणूक दीर्घकालीन असावी. हा कालावधी किमान 3-5 वर्षांचा असावा.

    मुंबई, 18 जानेवारी : 2021 हे वर्ष कोरोनामध्ये (Coronavirus) संमिश्र वर्ष ठरले. व्यवसाय पुन्हा रुळावर येण्यासाठी संघर्ष करत असताना, आर्थिक बाजार आणि क्रिप्टोकरन्सीसाठी (Cryptocurrency) हे वर्ष चांगले राहिले आहे. रिटेल इक्विटी गुंतवणूकदारांच्या संख्येत विक्रमी वाढ झाली आहे. म्युच्युअल फंडात विक्रमी गुंतवणूक (Mutual Fund Investment) आली. गेल्या वर्षी भारतीय बाजारातील प्रमुख निर्देशांक सेन्सेक्स आणि निफ्टीने (Sensex and Nifty) नवीन उंची गाठली होती. Paytm, Zomato, Nykaa आणि Policybazaar सारख्या 63 कंपन्यांनी 1.2 लाख कोटी रुपये IPO मधून उभे केले आहेत. एका वर्षात आयपीओमधून जमा झालेली ही सर्वाधिक रक्कम आहे. पण फक्त शेअर बाजार (Share Market) आहे, जिथून पैसा कमावता येईल? स्टॉक मार्केटसह 3 उत्तम पर्याय आहेत, ज्यातून तुम्ही 2022 मध्ये पैसे कमवू शकता. शेअर मार्केट चांगल्या क्वालिटीचे ब्लू-चिप किंवा मिड-कॅप आणि स्मॉल-कॅप स्टॉक देखील मजबूत परतावा देऊ शकतात. पण तुमची गुंतवणूक दीर्घकालीन असावी. हा कालावधी किमान 3-5 वर्षांचा असावा. भारतीय अर्थव्यवस्था महामारीतून सावरत आहे आणि विविध क्षेत्रातील अनेक सुधारणा पुढील काही वर्षांत चांगल्या दर्जाच्या कंपन्यांच्या शेअर्सच्या किमती उच्च पातळीवर नेतील. कमी गुंतवणुकीसह डबल फायदा, LIC ची खास योजना; मॅच्युरिटीवर मिळेल 110 टक्के रिटर्न राष्ट्रीय पेन्शन योजना (National Pension Scheme) ही केंद्र सरकारची योजना आहे ज्याचा उद्देश तुम्हाला निवृत्तीनंतर स्थिर उत्पन्न प्रदान करणे हा आहे. हे पेन्शन फंड रेग्युलेटरी अँड डेव्हलपमेंट ऑथरिटी (PFRDA) द्वारे मॅनेज केले जाते, जी भारतातील पेन्शन निधीची नियामक संस्था आहे. NPS ही एक हायब्रिड गुंतवणूक योजना आहे, जी इक्विटी आणि कर्ज दोन्हीमध्ये गुंतवणूक करते. NPS मध्ये गुंतवणूक केल्याने, जिवंत असेपर्यंत तुम्हाला निश्चित मासिक पेन्शन मिळेल आणि सेवानिवृत्तीच्या वेळी एकरकमी रक्कम देखील मिळेल. तुम्ही NPS मधून मॅच्युरिटी रकमेच्या 60 टक्क्यांपर्यंत एकरकमी पैसे काढू शकता आणि उर्वरित रक्कम जीवन विमा कंपनीकडून अॅन्युइटी खरेदी करावी लागेल. चहा, कॉफी प्या आणि बिल Cryptocurrency मध्ये भरा; कुठे सुरु झालीय ही सुविधा? सीनियर सिटीजन सेविंग्स स्कीम (SCSS) SCSS मध्ये 1,000 रुपयांच्या पटीत जास्तीत जास्त 15 लाख रुपये गुंतवले जाऊ शकतात. या योजनेतील व्याज दर तिमाहीत जमा केले जाते जेणेकरून ते नियमित उत्पन्नाची आवश्यकता पूर्ण करू शकेल. SCSS खाते पाच वर्षांत मॅच्युअर होते, त्यानंतर ते तीन वर्षांच्या ब्लॉकसाठी पुन्हा एकदा वाढवले ​​जाऊ शकते. लहान बचत योजनांच्या व्याजदरात कपात करूनही, SCSS चालू तिमाहीसाठी 7.4 टक्के दर देऊ करत आहे.
    Published by:Pravin Wakchoure
    First published:

    Tags: Investment, Money, Share market

    पुढील बातम्या