Home /News /money /

कमी गुंतवणुकीसह डबल फायदा, LIC ची खास योजना; मॅच्युरिटीवर मिळेल 110 टक्के रिटर्न

कमी गुंतवणुकीसह डबल फायदा, LIC ची खास योजना; मॅच्युरिटीवर मिळेल 110 टक्के रिटर्न

LIC s Bhagya Lakshmi ही योजना घेण्यासाठी व्यक्तीचे वय किमान 19 वर्षे आणि कमाल 55 वर्षे असावे. प्रीमियम भरण्याची मुदत किमान 5 वर्षे आणि जास्तीत जास्त 13 वर्षे आहे.

    मुंबई, 17 जानेवारी : LIC च्या सर्वात लहान योजनेचे (LIC Small Scheme) नाव भाग्य लक्ष्मी योजना (Bhagya Lakshmi Plan) आहे. आर्थिकदृष्ट्या दुर्बल असलेल्या लोकांसाठी ही योजना खूप उपयुक्त ठरू शकते. भाग्य लक्ष्मी योजना खास अल्प उत्पन्न गटातील (Low Income Group) लोकांसाठी आणली आहे. या योजनेसाठी विमा कमी आहे, ज्यामध्ये कोणताही GST लागू नाही. या योजनेशी संबंधित फायद्यांविषयी जाणून घेऊया. जर कोणाला ही पॉलिसी घ्यायची असेल, तर त्याला एक प्रकारची वैद्यकीय चाचणी करावी लागेल. ही योजना 'रिटर्न प्रीमियमसह (Return Premium) टर्म प्लॅन (Term Plan) देखील आहे. याचा अर्थ असा आहे की प्लॅन दरम्यान भरलेल्या प्रीमियमच्या 110 टक्के रक्कम मॅच्युरिटीनंतर परत केली जाते. ही काही कालावधीची प्रीमियम योजना आहे, ज्यामध्ये पॉलिसीच्या कालावधीपेक्षा कमी कालावधीसाठी प्रीमियम भरावा लागतो. ही योजना घेण्यासाठी व्यक्तीचे वय किमान 19 वर्षे आणि कमाल 55 वर्षे असावे. प्रीमियम भरण्याची मुदत किमान 5 वर्षे आणि जास्तीत जास्त 13 वर्षे आहे. जीवन विमाची सुविधा ज्या वर्षांसाठी प्रीमियम भरण्यात आली आहे त्या वर्षापासून 2 वर्षांपेक्षा जास्त काळ उपलब्ध आहे. चहा, कॉफी प्या आणि बिल Cryptocurrency मध्ये भरा; कुठे सुरु झालीय ही सुविधा? मॅच्युरिटीवर तुम्हाला इतका फायदा मिळेल या पॉलिसीमध्ये किमान विमा रक्कम 20,000 रुपये आहे आणि कमाल विमा रक्कम 50,000 रुपये आहे. प्रीमियम भरण्यासाठी तुम्ही वार्षिक, अर्धवार्षिक, त्रैमासिक आणि मासिक कालावधीमधून निवडू शकता. ठेवीदाराला मॅच्युरिटी लाभ म्हणून भरीव रक्कम मिळते. प्रीमियम टर्म दरम्यान भरलेल्या रकमेच्या 110 टक्के रक्कम मॅच्युरिटीवर परत केली जाते. जर ठेवीदाराने पॉलिसी घेतल्याच्या 1 वर्षाच्या आत आत्महत्या केली तर त्याला कव्हरेजचा लाभ मिळणार नाही. त्याच बरोबर आत्महत्येची घटना 1 वर्षानंतर घडल्यास भाग्य लक्ष्मी पॉलिसी अंतर्गत कव्हरेजचा लाभ दिला जातो. Electric Vehicle संबंधित शेअर तुमचा पोर्टफोलियो चमकवू शकतात, 'या' शेअर्सवर नजर ठेवा एलआयसी भाग्य लक्ष्मी योजनेअंतर्गत ठेवीदाराला कर्ज घेण्याची सुविधा मिळत नाही. पॉलिसी सरेंडर करण्याची सुविधा देण्यात आली आहे. जर ठेवीदाराने पॉलिसी सरेंडर केली, तर त्याला जमा केलेल्या पैशांपैकी 30-90 टक्के रक्कम दिली जाईल. पॉलिसी जितकी जास्त काळ टिकेल तितके त्याचे सरेंडर मूल्य जास्त असेल.
    Published by:Pravin Wakchoure
    First published:

    Tags: Investment, LIC

    पुढील बातम्या