मुंबई, 17 जून : एकेकाळी कर्ज घेणं हे फार कठीण असायचं. पण आता तसं राहिलेलं नाही. बँका आणि नाॅन बँकिंग आर्थिक सेवाही तुम्हाला कर्ज देण्यासाठी तयार असतात. शिवाय तुम्हाला आॅनलाइनही कर्ज मिळू शकतं. त्यामुळेच आजचे तरुण उधारीचं आयुष्य जगतात. ते कर्ज घेतात. मग आर्थिक ओझं वाढत जातं. ते कर्ज चुकवण्यासाठी बराच वेळ लागतो. मग काही सेव्हिंग्जही होत नाही. आर्थिक तज्ज्ञांच्या मते तरुणांचं आर्थिक नियोजन बरोबर नसतं. त्याचा परिणाम भविष्यावर होतो. म्हणून योग्य आर्थिक नियोजन गरजेचं आहे. सावधान, मोदी सरकारनं लागू केले इन्कम टॅक्सचे नवे कडक नियम लॉ प्रवेश परीक्षेचा निकाल जाहीर, पाहा info.mahacet.org या वेबसाईटवर बजेट प्लॅन आणि 50-20-30चा फाॅर्म्युला तरुणांना बजेट प्लॅनिंग कटकटीचं वाटू शकतं. पण तुम्ही कमावता आणि खर्चही करता, त्यासाठी तुमच्याकडे एक बजेट प्लॅनिंग हवं. आरामात आणि तणावरहित जगण्यासाठी बजेट प्लॅनिंगची गरज असते. बजेट तयार केलंत तर तुम्हाला खर्च करायला, कर्ज फेडायला आणि सेव्हिंग करायला मदत मिळते. बजेट तयार करताना तुम्ही तुमच्या गरजा आणि इच्छा यांचं योग्य संतुलन राखावं, असं तज्ज्ञ सांगतात. सरकारी बँकांना 30 हजार कोटी मिळावेत म्हणून मोदी सरकारचा ‘हा’ प्लॅन त्यासाठी तुम्हाला 50-20-30 फाॅर्म्युला पाळावा लागेल. यानुसार तुम्हाला कमाईतले 50 टक्के आपल्या गरजांवर खर्च करावे लागतील. म्हणजे घरखर्च. 20 टक्के कर्ज आणि बचत यासाठी आणि 30 टक्के तुमच्या इच्छांवर खर्च. तुमच्या गरजा काय आहेत? आर्थिक जबाबदाऱ्या काय आहेत? यानुसार आर्थिक नियोजन करायला हवं. तुमच्या गरजेप्रमाणे हा फार्म्युला बदलताही येऊ शकतो. तुम्ही 50-40-10 असंही करू शकता. कर्ज जास्त असेल तर तिथे पैसे वळवावे लागतील. कर्ज घेताना करा विचार तज्ज्ञ सांगतात की कर्ज घेऊन लाँग टर्ममध्ये काय फायदा होतोय, याचा विचार करा. तुमची क्षमता आणि पैसे वाढवण्यासाठी कर्ज घेणं योग्य ठरू शकतं. पण गरज नसलेल्या गोष्टींवर खर्च करण्याआधी विचार करावा. VIDEO : पवारांसोबत बैठकीत नेमकं काय घडलं? उदयनराजेंचा संपूर्ण खुलासा
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.

)







