जाहिरात
मराठी बातम्या / मनी / पेट्रोल डिझेल 2 रुपयांनी स्वस्त होणार? लवकरच गुडन्यूज मिळण्याची शक्यता

पेट्रोल डिझेल 2 रुपयांनी स्वस्त होणार? लवकरच गुडन्यूज मिळण्याची शक्यता

पेट्रोल डिझेल 2 रुपयांनी स्वस्त होणार? लवकरच गुडन्यूज मिळण्याची शक्यता

पेट्रोल आणि डिझेलच्या किंमती 2 रुपयांनी स्वस्त होऊ शकतात. आंतरराष्ट्रीय बाजारात कच्चा तेलाच्या किंमती घसरल्या आहेत.

  • -MIN READ Mumbai,Maharashtra
  • Last Updated :

मुंबई : वाहन चालकांना आता लवकरच दिलासा मिळण्याची शक्यता आहे . पेट्रोल डिझेलच्या दरात मोठी कपात होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. गेल्या कित्येक महिन्यांपासून मुंबई, दिल्ली, कोलकाता आणि चेन्नई या चार महानगरांमध्ये पेट्रोल डिझेलचे दर स्थिर होते. मात्र आता पेट्रोल डिझेलच्या दरात कपात होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. पेट्रोल आणि डिझेलच्या किंमती 2 रुपयांनी स्वस्त होऊ शकतात. आंतरराष्ट्रीय बाजारात कच्चा तेलाच्या किंमती घसरल्या आहेत. याचा फायदा देशातील इंधन विक्रीवर होण्याची शक्यता आहे. गुजरात आणि हिमाचलच्या निवडणुका तोंडावर आहेत. मुंबई महापालिका निवडणुका देखील येत्या काळात जाहीर होऊ शकतात. याच पार्श्वभूमीवर पेट्रोल डिझेलच्या दरात कपात होऊ शकते. आंतरराष्ट्रीय बाजारात कच्च्या तेलाच्या दरात गेल्या 24 तासांत फारसा चढउतार दिसून आला नाही. बुधवारी सकाळी बहुतांश शहरांमध्ये पेट्रोल आणि डिझेलचे किरकोळ दरही स्थिर आहेत. सरकारी तेल कंपन्यांनी आज जारी केलेल्या दरामध्ये फारसा बदल झालेला नाही. राजस्थाना राज्यातील दोन शहरांमध्ये पेट्रोल डिझेल खूप जास्त महाग झालं आहे. तेल कंपन्यांनी दिल्ली-मुंबईसारख्या देशातील चार महानगरांमध्ये तेलाच्या दरात कोणताही बदल केलेला नाही.

पेट्रोल पंपाबाबत ‘या’ गोष्टी तु्म्हाला माहितीयत? फारच रंजक आहे ही माहिती

सरकारी तेल कंपन्यांनी जाहीर केलेल्या दरांनुसार राजस्थानातील गंगानगर आणि हनुमानगड जिल्ह्यात सर्वात महाग पेट्रोल आणि डिझेलची विक्री होत आहे. गंगानगरमध्ये एक लीटर पेट्रोलचा भाव 113.48 रुपये प्रति लिटरवर पोहोचला आहे, तर डिझेल 98.24 रुपये प्रति लीटर दराने विकले जात आहे. हनुमानगड जिल्ह्यात पेट्रोलचे दर 112.54 रुपये प्रति लीटरवर पोहोचले आहेत, तर डिझेलसाठी 97.39 रुपये मोजावे लागत आहेत. पेट्रोल आणि डिझेलचे दर : दिल्ली- पेट्रोल 101.84 रुपये प्रति लिटर तर डिझेल 89.07 रुपये प्रति लिटर मुंबई- पेट्रोल 106.31 रुपये प्रति लिटर तर डिझेल 94.27 रुपये प्रति लिटर चेन्नई - पेट्रोल 102.63 रुपये प्रति लिटर तर डिझेल 94.24 रुपये प्रति लिटर कोलकाता - पेट्रोल 106.03 रुपये प्रति लिटर तर डिझेल 92.76 रुपये प्रति लिटर

पेट्रोल-डिझेल की सीएनजी? तुमचाही होतोय गोंधळ? कोणताही निर्णय घेण्याआधी ह्या फॅक्ट्स वाचा

इंडियन ऑइलच्या ग्राहकांना आरएसपी आणि त्यांचा सिटी कोड 9224992249 क्रमांकावर लिहून माहिती मिळू शकते आणि बीपीसीएलचे ग्राहक आरएसपी आणि त्यांचा सिटी कोड टाइप करून 9223112222 क्रमांकावर एसएमएस पाठवून माहिती मिळवू शकतात.

News18लोकमत
News18लोकमत

एचपीसीएलचे ग्राहक एचपीपीआरसीएलचे ग्राहक एचपीप्रिस आणि त्यांचा सिटी कोड लिहून 9222201122 क्रमांकावर पाठवून किंमत पाहू शकता. SMS द्वारे तुम्हाला तुमच्या परिसरातील असे दर पाहता येणार आहेत.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
  • First Published :
जाहिरात
जाहिरात