मुंबई 1 नोव्हेंबर : वाहन हे इंधनावरती चालते, परंतू आता इलेक्ट्रिकवर चालनाऱ्या गाड्या देखील बाजारात आल्या आहेत. परंतू असं असलं तरी अजूनही बऱ्याच गाड्या या इंधन भरण्यासाठी पेट्रोलपंपावर जातात. अनेक लोक पेट्रोल, डिजेल किंवा सिएनजी भरण्यासाठी पेट्रोल पंपावर गेलं असेल, पण तुम्हाला कधी असा प्रश्न पडलाय का की हे येणारं इंधन नक्की कुठून येतं किंवा ते कुठे स्टोर करुन ठेवलं जातं? आपण पेट्रोल पंपावर गेल्यावर काय करतो, तर तेथील कर्मचाऱ्याला आपल्याला किती लिटर किंवा किती रुपयाचं इंधन हवंय हे सांगतो आणि ती व्यक्ती देखील त्या प्रमाणे बटण दाबून आपल्याला इंधन देते. हे बटण दाबल्यानंतर एका पाईपद्वारे इंधन किंवा पेट्रोल आपल्या गाडीत येतं. इथपर्यंत तर आपल्याला सगळं माहित आहे. हे ही पाहा : ट्रकपाहून अचानक युटर्न… स्कूटी चालवणाऱ्या तरुणीच्या अजब ड्रायविंगचा Video Viral परंतु या मशीनमध्ये किंवा त्या पाईपमध्ये पेट्रेल येतं कुठुन? हा खरा प्रश्न आहे, तर आज आम्ही तुम्हाला हिच माहिती जाणून घेण्यात मदत करणार आहोत. जेणेकरून तुम्हाला पेट्रोल पंपामध्ये इंधन कसं साठवून ठेवलं जातं आणि ते कसं आपल्यापर्यंत पोहोचतं हे कळेल. पेट्रोल पंपावरील टाक्या या पेट्रोल पंपाच्या खाली म्हणजे जमीनीत असतात. तुम्ही पेट्रोल पंपावर लोखंडी किंवा धातूचे झाकण पाहिले असेल, जे जमिनीवर ठेवलेले असते. खरंतर तेथेच या इंधन साठवण्याच्या टाक्या असतात. ट्रकमधून येणारे तेल पेट्रोल पंपावर बांधलेल्या भूमिगत टाकीमध्ये साठवले जाते आणि तेथून ते मशीनच्या सहाय्याने ते वर खेचले जाते. खरंतर ही मशीन एक प्रकारे हातपंपाचे काम करते, ज्यामुळे आपण त्या टाकीवर योग्य तो आकडा टाकला की, तेथून तेल निघते. या मशीनमधील इंधन थेट टाकीतून येते. तसेच पेट्रोल आणि डिझेलसाठी स्वतंत्र टाक्या असतात. या इंधन टाक्या घरातील सामान्य टाक्यांप्रमाणे बनवल्या जात नाहीत, तर त्या विशेष तंत्रज्ञानाने तयार केल्या जातात. या टाक्या स्टीलच्या फॅब्रिकेटेड टाक्या असतात. हे घरगुती टाक्यांपेक्षा बरेच वेगळे असतात.
या टाक्यांचा आकार काय, त्या किती मोठ्या असतात? या इंधन टाक्या खूपच मोठ्या असतात, परंतु प्रत्येक पेट्रोल पंपानुसार त्यांची क्षमता बदलते. प्रत्येक पेट्रोल पंपावर वेगवेगळ्या आकाराच्या टाक्या बनवल्या जातात आणि या टाक्या बनवण्यासाठी आगाऊ परवानगी घ्यावी लागते आणि त्यांच्या क्षमतेच्या आधारेच त्यामध्ये पेट्रोल किंवा इंधन भरले जाते.

)







