मुंबई: आंतरराष्ट्रीय बाजारात कच्च्या तेलाच्या किंमतीत गेल्या काही आठवड्यात मोठे चढ-उतार होताना पाहायला मिळत आहेत. सोमवारी उत्तर प्रदेश आणि बिहार या शहरांमध्ये पेट्रोल आणि डिझेल च्या दरात घसरण झाली. सरकारी तेल कंपन्यांनी सोमवारी सकाळी देशांतर्गत बाजारात पेट्रोल आणि डिझेलचे नवे जाहीर केले. अनेक शहरांमध्ये मोठा बदल पाहायला मिळाले. दिवाळीआधी तुमच्या शहरातील पेट्रोल डिझेलच्या दरात किती रुपयांनी बदल झाला आणि तो कसा पाहायचा जाणून घ्या. नव्या दरानुसार (नोएडा-ग्रेटर नोएडा इथे आज सकाळी पेट्रोलचा भाव 28 पैशांनी कमी होऊन 96.64 रुपये प्रति लिटर झाला आहे. मुंबईत डिझेलचे दर 26 पैशांनी कमी होऊन 89.82 रुपये प्रति लीटर झाले आहेत. लखनऊमध्ये पेट्रोल 96.62 रुपये प्रति लीटर आणि डिझेल 89.81 रुपये प्रति लीटर दराने विकले जात आहे. मुंबईत पेट्रोल 107.24 रुपये प्रति लीटर आणि डिझेल 94.04 रुपये प्रति लीटर दराने मिळत आहे. आजही तेल कंपन्यांनी दिल्ली, मुंबईसारख्या महानगरांमध्ये पेट्रोल-डिझेलच्या किरकोळ दरात बदल केला नाही. आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत गेल्या 24 तासात कच्च्या तेलाच्या किंमतीत साधारण एका टक्क्याने घसरण झाली आहे. ब्रेंट क्रूड 24 तासांत सुमारे 1 डॉलरने घसरून 92.54 डॉलर प्रति बॅरल झालं तर गेल्या 24 तासात डब्ल्यूटीआयचा भाव 1 टक्क्याने घसरून 86.43 डॉलर प्रति बॅरल झाले आहे.
रुपयाची घसरण! अर्थमंत्री सीतारामन म्हणतायेत तो मजबूत होतोय? कारणंही सांगितलंशहरांचं नाव | पेट्रोल प्रति लिटर दर | डिझेल प्रति लिटर दर |
---|---|---|
मुंबई | 106.31 | 94.27 |
कोलकाता | 106.03 | 92.76 |
दिल्ली | 96.72 | 89.62 |
चेन्नई | 102.63 | 94.24 |
नोएडा | 96.64 | 89.82 |
लखनऊ | 96.62 | 89.81 |
तुम्ही SMSद्वारे पेट्रोल डिझेलचे रोजचे दर तपासू शकता. इंडियन ऑइलचे ग्राहक RSP आणि त्यांचा शहर कोड 9224992249 या क्रमांकावर पाठवून माहिती मिळवू शकतात. BPCL ग्राहक RSP आणि त्यांचा शहर कोड 9223112222 या क्रमांकावर पाठवला तर माहिती मिळू शकते. त्याच वेळी, HPCL ग्राहक HPPprice आणि त्यांचा शहर कोड लिहून आणि 9222201122 या क्रमांकावर मेसेज पाठवून तुमच्या शहरातील दर चेक करू शकता.
रोज सकाळी 6 वाजता पेट्रोल आणि डिझेलचे दर बदलतात. त्यावर टॅक्स आणि एक्साइज ड्यूटी, डीलर कमीशन वॅट अशा अनेक गोष्टी लागून त्याचे भाव जास्त होत असतात. त्यामुळे पेट्रोल आणि डिझेलचे दर वाढतात. तुम्हाला घसबसल्याही तुमच्या शहरातील दर तपासता येऊ शकतात.