मुंबई, 03 सप्टेंबर : आज सोन्या-चांदीच्या भावात तेजी आलीय. आज 24 कॅरेट सोन्याची किंमत 538 रुपयांनी वाढून सोनं 38,987 रुपये प्रति ग्रॅम झालंय. चांदीच्या किमतीतही वाढ झालीय. चांदीची किंमत 1,080 रुपयांनी वाढून 47,960 रुपये प्रति किलो ग्रॅम झालीय. औद्योगिक क्षेत्रात आणि सिक्का व्यापाऱ्यांमध्ये मागणी वाढलीय, म्हणून चांदी वाढलीय. आंतरराष्ट्रीय स्तरावर न्यूयाॅर्कमध्ये सोनं 1,530 डाॅलर प्रति औंस आणि चांदी 18.50 डाॅलर प्रति औंस राहिलीय. सोन्याचा दर वाढण्याचं कारण एचडीएफसी सिक्युरिटीचे सीनियर अनॅलिस्ट तपन पटेल म्हणाले, अमेरिका-चीनमधल्या वाढत्या ट्रेड वाॅरमुळे सोन्याची किंमत वाढलीय. अमेरिकानं चीनवर नवा टॅरिफ लावलाय. तो 1 सप्टेंबरपासून लागू झालाय. याचा परिणाम सोन्याच्या किमतींवर झालाय.डाॅलरच्या तुलनेत रुपया कमी आहे. रुपया 72.40 प्रति डाॅलरवर बंद झालाय. शेअर बाजार आपटला, गुंतवणूकदारांचं 2.79 लाख कोटींचं नुकसान आंतरराष्ट्रीय बाजारात जून महिन्यामध्ये सोन्याच्या भावाने 5 वर्षांतला उच्चांक गाठला होता. गुंतवणूकदारांनी सोन्यामधल्या गुंतवणुकीला पसंती दिल्यामुळे ही स्थिती होती. आता मात्र घटलेल्या दरांमुळे दिलासा मिळाला आहे. आता विम्याची चिंता मिटली, SBI घेऊन येतेय नवी योजना भारतात दरवर्षी सुमारे 500 ते 600 टन इतक्या सोन्याची आयात होते. सोन्याचे भाव सर्वसामान्यांच्या आवाक्याबाहेर गेले तर खरेदीतही घट होते. पण आता सोन्याबरोबरच चांदीचेही भाव घटल्यामुळे विक्रीमध्ये तेजी येईल, असं तज्ज्ञांचं म्हणणं आहे. त्याचबरोबर सोन्याचे दर आणखी खाली येऊ शकतात, असाही त्यांचा अंदाज आहे. मुंबई मेट्रो रेल्वेत मोठी व्हेकन्सी, ‘या’ उमेदवारांनी करा अर्ज मात्र असंही बोललं जातंय की, पुढील काही महिन्यात म्हणजेच दिवाळीपर्यंत आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत सोन्याचा दर 1 हजार 500 डॉलरवर पोहोचण्याची शक्यता आहे. त्याचा थेट परिणाम भारतीय बाजारपेठेतील दरांवर होऊ शकतो. त्यामुळे देशातील सोन्याचा दर दिवाळीपर्यंत 36 हजारच्या पुढे जाण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. तर चांदीचे दर 42 हजारपर्यंत जाण्याची शक्यता आहे. आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत सोन्याच्या दरावर फेडरल रिझर्व्ह बँकेचे व्याज दर, अमेरिका आणि इराणमध्ये सुरू असलेला तणाव या सर्व गोष्टींचा परिणाम होऊ शकतो असं जाणकारांचं मत आहे.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.