मुंबई, 03 सप्टेंबर : मुंबई मेट्रो रेल्वे काॅर्पोरेशन लिमिटेड (MMRC)नं डेप्युटी जनरल मॅनेजर, असिस्टंट मॅनेजर आणि इतर पदं मिळून एकूण 6 व्हेकन्सीज आहेत. MMRC च्या या पदांसाठी ऑनलाइन अर्ज करण्यासाठी www.mmrcl.com इथे क्लिक करा. शेवटची तारीख आहे 30 सप्टेंबर 2019. जाणून घेऊ कुठल्या पदांसाठी किती जागा. पद आणि पदसंख्या डेप्युटी जनरल मॅनेजर - 1 असिस्टंट जनरल मॅनेजर - 2 डेप्युटी इंजिनीयर - 1 डेप्युटी इंजिनीयर (TVS/ECS) - 2 SBI मध्ये 56 जागांवर व्हेकन्सी, ‘असा’ करा अर्ज शैक्षणिक पात्रता General Manager/Assist. General Manager (Track) पदासाठी अर्ज करणाऱ्या उमेदवाराकडे मान्यताप्राप्त विद्यापीठाची सिव्हिल इंजिनीयरिंगची पदवी हवी. रेल्वे, मेट्रोमध्ये रुळ तयार करण्याचा अनुभव हवा. आधुनिक शहरांतल्या रेल्वेमध्ये कामाचा अनुभव असलेल्यांना प्राधान्य दिलं जाईल. मध्य रेल्वेत शिक्षक पदांची भरती, ‘असा’ करा अर्ज Deputy Engineer (Track) पदासाठी कुठल्याही मान्यताप्राप्त विद्यापीठाची सिविल इंजिनीयरिंगमध्ये पदवी आणि रेल्वे, मेट्रोचे रुळ बनवण्याचा अनुभव हवा. Deputy Engineer (TVS/ ECS) पदासाठी मान्यताप्राप्त विद्यापीठातून इलेक्ट्रिकल आणि मेकॅनिकल इंडिनियरिंगमध्ये पदवी हवी. उमेदवाराकडे मेट्रो, इतर सार्वजनिक उपक्रम, खासगी क्षेत्राचा अनुभव हवा. DGM/AGM साठी जास्तीत जास्त 40 वर्ष आणि डेप्युटी इंजिनीयरसाठी 35 वर्ष हवेत. BRO मध्ये नोकरीची मोठी संधी, 337 जागांवर होणार भरती तसंच सरकारी नोकरीतही संधी आहे.भारतीय लेखापरीक्षा आणि लेखा विभागात 182 जागांवर भरती केली जाईल. या जागा खेळाडूंसाठी ठेवल्यात. यात क्रिकेट (पुरुष), फुटबॉल (पुरुष), हॉकी (पुरुष), बॅडमिंटन (पुरुष आणि महिला) आणि टेबल टेनिस (पुरुष आणि महिला) हे क्रीडा प्रकार आहेत. लेखा परीक्षक आणि लेखापाल म्हणजेच ऑडिटर या पदासाठी पदवीधर हवं. आंतरराष्ट्रीय स्पर्धा किंवा आंतरविद्यापीठ स्पर्धेत प्रतिनिधित्व करणारे खेळाडू हवेत. अकाउंटंट आणि क्लार्क पदासाठी 12 वी उत्तीर्ण हवं. आंतरराज्य, आंतरविद्यापीठ, आंतरराष्ट्रीय स्तरावरच्या स्पर्धेत खेळाडू म्हणून प्रतिनिधित्व हवं. VIDEO : युगांडामध्ये गणेशोत्सवाची धूम, तरुणांचं बहारदार नृत्य पाहाच!
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.