मराठी बातम्या /बातम्या /मनी /

आज पॅन-आधार लिंक न केल्यास भरावी लागणार दंडाची मोठी रक्कम, जाणून घ्या सविस्तर

आज पॅन-आधार लिंक न केल्यास भरावी लागणार दंडाची मोठी रक्कम, जाणून घ्या सविस्तर

तुम्ही दिलेल्या मुदतीत कार्ड लिंक केलं नाहीत, तर तुम्हाला दंड भरावा लागेल. याशिवाय आधारशी पॅन लिंक न केल्यास, पॅनकार्ड कोणत्याही कामाचं राहणार नाही.

तुम्ही दिलेल्या मुदतीत कार्ड लिंक केलं नाहीत, तर तुम्हाला दंड भरावा लागेल. याशिवाय आधारशी पॅन लिंक न केल्यास, पॅनकार्ड कोणत्याही कामाचं राहणार नाही.

तुम्ही दिलेल्या मुदतीत कार्ड लिंक केलं नाहीत, तर तुम्हाला दंड भरावा लागेल. याशिवाय आधारशी पॅन लिंक न केल्यास, पॅनकार्ड कोणत्याही कामाचं राहणार नाही.

मुंबई, 30 जून : तुम्ही तुमचं आधार कार्ड पॅनकार्डसोबत लिंक (Aadhar-Pan link) केलंय की नाही? जर अजूनही नसेल केलं तर ते तुम्हाला लवकरात लवकर करावं लागणार आहे. खरं तर पॅन आणि आधार कार्ड लिंक करण्याची शेवटची तारीख 31 मार्च 22 होती. परंतु, त्यानंतर ही डेडलाईन 30 जूनपर्यंत वाढवण्यात आली होती. 31 मार्चनंतर आधार-पॅन लिंक करणाऱ्यांना 500 रुपये लेट फी (Late Fee) भरावी लागत आहे. आता 30 जूनआधी तुम्हाला हे दोन्ही कार्डं एकमेकांसोबत लिंक करणं अनिवार्य असेल. दिलेल्या मुदतीत जर एखाद्या पॅनकार्ड धारकाने (PAN Card holder) त्याचा आधार क्रमांक त्याच्या पॅन कार्डसोबत लिंक केला नाही तर त्याला पॅन आधार लिंकिंगसाठी उशीर केल्याचा दंड म्हणजेच लेट फी म्हणून 1,000 रुपये भरावे लागतील. इन्कम टॅक्स अॅक्टमध्ये (Income Tax Act) नव्याने समाविष्ट केलेल्या कलम 234H नुसार 31 मार्च 2023 पर्यंत आधारशी पॅन लिंक न केल्यास 1,000 पर्यंत दंड आकारला जाईल. तसंच लिंक न केलेलं पॅन कार्ड आणखी एक वर्ष ITR भरण्यासाठी, रिटर्नचा दावा (Return Claim) करण्यासाठी आणि इतर IT प्रक्रियांसाठी कार्यरत राहतील. हा कालावधी मार्च 2023 म्हणजेच 2022-23 या आर्थिक वर्षापर्यंत असेल. या संदर्भात लाईव्ह मिंटने वृत्त दिलंय. दंडाची रक्कम किती? सेंट्रल बोर्ड ऑफ डायरेक्ट टॅक्सेसच्या (CBDT) परिपत्रकानुसार, 31 मार्च 2022 नंतर पण 30 जून 2022 पूर्वी जे त्यांचं पॅन कार्ड आधार कार्डशी लिंक करतील त्यांना 500 रुपये लेट फी भरावी लागेल. तर 30 जूननंतर जे त्यांचं पॅन आणि आधार कार्ड लिंक करतील त्यांना 1,000 लेट फी भरावी लागेल. हा दंड भरल्यास तुम्हाला पॅन आणि आधार लिंक करता येईल. इन्कम टॅक्स विभागाच्या अधिकृत ट्विटर हँडलवरील ट्वीटमध्ये म्हटलं आहे की, Challan No ITNS 280 with Major head 0021 (Income Tax Other than Companies) & Minor head 500 (Fee) या पद्धतीने चलान भरण्यात यावं. दिलेल्या मुदतीत पॅन आधारशी लिंक न केल्यास काय होणार? तुम्ही दिलेल्या मुदतीत कार्ड लिंक केलं नाहीत, तर तुम्हाला दंड भरावा लागेल. याशिवाय आधारशी पॅन लिंक न केल्यास, पॅनकार्ड कोणत्याही कामाचं राहणार नाही. परिणामी, तुम्ही अनेक प्रकारचे आर्थिक व्यवहार (Financial transaction) करू शकणार नाही. तुम्ही बँक खातं (Bank Account) उघडू शकणार नाही आणि शेअर्स (shares) तसेच म्युच्युअल फंडांमध्ये (mutual fund) गुंतवणूकही करू शकणार नाही. तुम्ही तुमच्या निष्क्रिय पॅन कार्डचा कुठेही उल्लेख केला तर तुमच्याकडे पॅन क्रमांक नाही, असं गृहीत धरलं जाईल. त्यासाठी तुम्हाला आयकर कायदा, 1961 अंतर्गत दंडही भरावा लागू शकतो. कलम 272B अंतर्गत पॅन न उघडल्यास किंवा न दिल्यास 10,000 रुपये दंड आकारण्याची तरतूद आहे. त्यामुळे तुम्हाला पॅन आधारशी लिंक करावाच लागेल. 30 जूननंतरही तुम्ही तुमचे पॅन आधारशी लिंक करू शकता, मात्र यासाठी तुम्हाला दंड भरावा लागेल. दंड भरल्यानंतर आणि लिंकिंग प्रक्रिया पूर्ण केल्यानंतर तुमचे पॅन कार्ड पुन्हा अ‍ॅक्टिव्ह होईल आणि तुम्ही त्याचा वापर करू शकाल. पॅन आणि आधार लिंक करण्याची प्रोसेस >> सर्वांत आधी आयकर ई-फायलिंग पोर्टल www.incometax.gov.in वर जा. >>  क्विक लिंक्स (Quick Links) सेक्शन अंतर्गत लिंक आधार (Link Aadhar) पर्याय निवडा. त्यानंतर तुम्हाला नवीन विंडोवर रिडायरेक्ट केलं जाईल. >> त्या ठिकाणी तुमचे पॅन डिटेल्स (PAN Details), आधार कार्ड डिटेल्स (Aadhar Card Details), नाव (Name) आणि मोबाईल नंबर (Mobile Number) टाका. >> नंतर 'I validate my Aadhaar details' हे ऑप्शन सिलेक्ट करा आणि 'Continue' ऑप्शन निवडा. >> तुमच्या रजिस्टर्ड मोबाईल नंबरवर (Registered Mobile Number), तुम्हाला वन-टाइम पासवर्ड (OTP) प्राप्त होईल. तो पासवर्ड स्क्रीनवरील पासवर्डच्या रिकाम्या जागेत भरा, नंतर 'Validate' ऑप्शनवर क्लिक करा. >> त्यानंतर तुम्ही दंड (penalty) भरल्यानंतर तुमचा पॅन आणि आधार लिंक केला जाईल. तर, अशाप्रकारे तुम्ही तुमचे पॅन आधारशी लिंक करू शकता. मात्र, लक्षात ठेवा की 30 जूनपर्यंत जर तुम्ही आधार पॅन लिंक केले नाहीत, तर तुम्हाला भराव्या लागणाऱ्या दंडाची रक्कम वाढू शकते.
First published:

Tags: Aadhar card, Income tax, Pan card

पुढील बातम्या