खूशखबर! सोनं झालं स्वस्त, 'हे' आहेत सोमवारचे दर

खूशखबर! सोनं झालं स्वस्त, 'हे' आहेत सोमवारचे दर

Gold, Silver - सणासुदीला सोनं-चांदी खरेदी करण्याआधी जाणून घ्या दर

  • Share this:

मुंबई, 02 सप्टेंबर : आजपासून गणेशोत्सव सुरू झाला. सोनं खरेदी करणाऱ्यांसाठी चांगली बातमी आहे. सोन्याच्या किमतीत 40 रुपयांची घसरण झालीय. ऑल इंडिया सराफा असोसिएशनअनुसार सोन्याचा दर 39,600 रुपये प्रति 10 ग्रॅम झालाय. घरगुती ज्वेलर्सद्वारा लिलावी कमी झाल्यामुळे ही घसरण झालीय. चांदी आज 48,800 रुपयांवर स्थिर आहे.

आंतरराष्ट्रीय बाजारात न्यूयाॅर्कमध्ये सोनं 1,523.70 डाॅलर प्रति औंस आणि चांदी 18.41 डाॅलर प्रति औंसवर आहे.

सोन्याचे दर

आज दिल्लीत 99.9 टक्के शुद्ध सोनं 40 रुपयांची घसरण होऊन 39,600 रुपये प्रति 10 ग्रॅम आणि 99.5 टक्के शुद्ध सोनं 39,430 रुपये प्रति 10 ग्रॅम झालंय. गिन्नी सोन्याची किंमत 1000 रुपयांनी कमी झालीय. तिचा दर 29,100 रुपये प्रति 8 ग्रॅम झालाय.

आधार अपडेट करायचंय? 'अशी' आहे सोपी पद्धत

चांदीचे दर

चांदीच्या किमतीत काही बदल झालेला नाही. ती 48,800 रुपये प्रति किलोग्रॅम आहे. साप्ताहिक डिलिवरीवाली चांदीची किंमत 46,742 रुपये प्रति किलोग्रॅमवर स्थिर राहिलीय. चांदीच्या किमतीत काही बदल नाही. चांदीच्या सिक्क्यांची लिलावी किंमत 1,00,000 रुपये प्रति शेकडा आणि बिकवाली 1,01,000 रुपये प्रति शेकड्यावर स्थिर राहिलीय.

'या' मुस्लीम देशाच्या नोटेवर विराजमान आहेत गणराया

आंतरराष्ट्रीय बाजारात जून महिन्यामध्ये सोन्याच्या भावाने 5 वर्षांतला उच्चांक गाठला होता. गुंतवणूकदारांनी सोन्यामधल्या गुंतवणुकीला पसंती दिल्यामुळे ही स्थिती होती. आता मात्र घटलेल्या दरांमुळे दिलासा मिळाला आहे.

भारतात दरवर्षी सुमारे 500 ते 600 टन इतक्या सोन्याची आयात होते. सोन्याचे भाव सर्वसामान्यांच्या आवाक्याबाहेर गेले तर खरेदीतही घट होते. पण आता सोन्याबरोबरच चांदीचेही भाव घटल्यामुळे विक्रीमध्ये तेजी येईल, असं तज्ज्ञांचं म्हणणं आहे. त्याचबरोबर सोन्याचे दर आणखी खाली येऊ शकतात, असाही त्यांचा अंदाज आहे.

LIC नं लाँच केली नवी पाॅलिसी, 'हे' आहेत फायदे

मात्र असंही बोललं जातंय की, पुढील काही महिन्यात म्हणजेच दिवाळीपर्यंत आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत सोन्याचा दर 1 हजार 500 डॉलरवर पोहोचण्याची शक्यता आहे. त्याचा थेट परिणाम भारतीय बाजारपेठेतील दरांवर होऊ शकतो. त्यामुळे देशातील सोन्याचा दर दिवाळीपर्यंत 36 हजारच्या पुढे जाण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. तर चांदीचे दर 42 हजारपर्यंत जाण्याची शक्यता आहे. आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत सोन्याच्या दरावर फेडरल रिझर्व्ह बँकेचे व्याज दर, अमेरिका आणि इराणमध्ये सुरू असलेला तणाव या सर्व गोष्टींचा परिणाम होऊ शकतो असं जाणकारांचं मत आहे.

कोल्हापूरच्या राज घराण्यातील गणेश; न्यू पॅलेसमध्ये बाप्पा विराजमान!

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

Tags: gold
First Published: Sep 2, 2019 06:17 PM IST

ताज्या बातम्या