मुंबई, 25 सप्टेंबर : आंतरराष्ट्रीय बाजारात आलेल्या तेजीमुळे सोन्या-चांदीचे भाव वाढलेत. दिल्लीच्या सराफा बाजारात 10 ग्रॅम सोन्याची किंमत 162 रुपयांनी वाढलीय. तर 1 किलोग्रॅम चांदीची किंमत 95 रुपयांनी जास्त झालीय.तज्ज्ञांच्या मते आंतरराष्ट्रीय बाजारात सोन्याच्या किमतीत वाढ झाल्यानं घरगुती बाजारावर याचा परिणाम झालाय. तरीही तज्ज्ञांच्या अंदाजाप्रमाणे येत्या काही दिवसांत सोनं पुन्हा स्वस्त होईल. सोन्याचा नवा भाव आज (25 सप्टेंबर) दिल्ली सराफा बाजारात सोन्याची किंमत 162 रुपयांनी वाढलीय. ती 39,182 रुपये प्रति 10 ग्रॅम झालीय. मंगळवारी दिल्ली सराफा बाजारात सोन्याची किंमत 330 रुपयांनी वाढून 39,020 प्रति 10 ग्रॅम झाली होती. 1 ऑक्टोबरपासून SBI च्या खात्यात पैसे जमा करण्याचे आणि काढण्याचे बदलले नियम चांदीची नवी किंमत सोन्याप्रमाणे चांदीच्या किमतीतही वाढ झालीय. दिल्लीत 1 किलोग्रॅम चांदीचा दर 48,720 रुपयावरून 48,815 रुपये झालाय. याआधी चांदीची किंमत 730 रुपयांनी वाढली होती. ती 48,720 रुपये प्रति किलोग्रॅम झाली होती. प्लॅस्टिक बंदीनंतर 1 लाख रुपये गुंतवा आणि सुरू करा ‘हा’ व्यवसाय, होईल भरपूर कमाई कसं ओळखायचं अस्सल सोनं? दातांची टेस्ट - तुम्ही दातांमध्ये सोनं दाबून ठेवलंत तर ते खरं असेल तर दातांवर निशाणी दिसेल. सोन्याचे दागिनेही 24 कॅरेटचे तयार करत नाहीत. त्यात इतर धातू मिसळावे लागतात. पाण्याची टेस्ट - आणखी एक सोपी पद्धत म्हणजे पाण्याची टेस्ट. त्यासाठी एका खोल भांड्यात 2 ग्लास पाणी टाका आणि त्यात सोन्याचे दागिने बुडवा. सोनं तरंगलं तर ते खरं नाही. ते खाली गेलं तर खरं आहे, समजावं. SBI डेबिट कार्डानं तुम्ही ‘इतक्या’ वेळाच काढू शकता पैसे, नाही तर पडेल भुर्दंड सिरॅमिक थाळी - बाजारातून पांढऱ्या रंगाची ही थाळी आणा. सोनं त्या थाळीवर घासा. थाळी काळी पडली तर समजा सोनं खोटं आहे आणि चांगले रंग थाळीवर चढले तर ते सोनं असली आहे. चुंबक टेस्ट - तज्ज्ञांच्या मते दुकानातून चुंबक घ्या आणि सोन्याच्या दागिन्यांवर लावा. सोनं त्यावर चिकटलं तर ते असली नाही. चिकटलं नाही तर ते अस्सल सोनं आहे. ईडीच्या कार्यालयावर राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांची धडक, पोलिसांनी केला लाठीचार्ज
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.

)







