मुंबई, 25 सप्टेंबर : ऑक्टोबरपासून बरेच बदल होतायत. त्यात महत्त्वाचं म्हणजे मोठी सरकारी बँक SBI नं आपल्या अनेक नियमांमध्ये बदल केलेत. तसं पत्रक प्रसिद्ध केलंय. नव्या नियमानुसार SBI नं चेक बुकची पानं कमी केलीयत. चेक बाउन्स झाला तर त्यावरचा दंड वाढवलाय. नवे नियम 1 ऑक्टोबरपासून पूर्ण देशात लागू होतील.
बँकेनं सर्विस चार्जला घेऊन नवे नियम सादर केलेत. आता बचत खात्यात एक आर्थिक वर्षात 25च्या जागी 10 चेक मोफत मिळतील. त्यानंतरच्या 10 चेक्सवर 40 रुपये द्यावे लागतील. याआधी चेकबुकनंतर 10 चेक्स घेतल्यानंतर 30 रुपये द्यावे लागायचे. त्यात GST वेगळा द्यावा लागेल. तुम्ही तुमच्या खात्यात कमीत कमी बॅलन्स ठेवला नाही तर पडणाऱ्या चार्जवर 80 टक्के कमीचा फायदा होईल. याशिवाय NEFT आणि RTGS द्वारे ट्रॅन्झॅक्शन स्वस्त होईल.
प्लॅस्टिक बंदीनंतर 1 लाख रुपये गुंतवा आणि सुरू करा 'हा' व्यवसाय, होईल भरपूर कमाई
1 ऑक्टोबरपासून होणार हे बदल
1. बँक खात्यात पैसे जमा करण्याचे नियम - आता 1 ऑक्टोबरपासून तुम्ही 1 महिन्यात तुमच्या खात्यात फक्त 3 वेळा पैसे जमा करू शकता. तुम्ही त्यापेक्षा जास्त वेळा पैसे जमा केलेत तर 50 रुपये जास्त चार्ज लागेल.
खूशखबर! 8 दिवसांनी ग्राहकांना पेट्रोल-डिझेलच्या किमतीत मिळाला दिलासा
2. शहरांमध्ये कमीत कमी बॅलन्स 5 हजार रुपयांऐवजी 3 हजार रुपये केला जाणार आहे. नव्या नियमांच्या बदलाप्रमाणे ग्राहक आपल्या खात्यात कमीत कमी 3 हजार रुपये बॅलन्स ठेवू शकत नसेल आणि त्याची रक्कम 1500 रुपये झाली, तर त्यावर 10 रुपयांचा चार्ज आणि जीएसटी वसूल केला जाईल.
3. सेमी अर्बन ब्रँचमध्ये एसबीआय ग्राहकांना आपल्या खात्यात महिन्याला कमीत कमी 2 हजार रुपये ठेवावे लागतील. ग्रामीण शाखेत 1 हजार रुपये कमीत कमी ठेवावे लागतील.
आता हेल्थ इन्शुरन्स घेणं झालं सोपं, झालेत 'हे' मोठे बदल
4. झीरो बॅलन्स खातं - अशा प्रकारच्या खात्याला BSBD अकाउंट म्हटलं जातं. SBI चं BSBD अकाउंट इतर खात्याप्रमाणे सहज उघडता येतं. तुम्हाला KYC चे नियम पूर्ण करावे लागतील. हे अकाउंट सिंगल किंवा जाॅइंट उघडता येतं. देशभरातल्या स्टेट बँकेच्या सर्व शाखांमध्ये तुम्ही हे अकाउंट सुरू करू शकता.
5. SBIनं सांगितलंय की, झीरो बॅलन्स खात्यात अनेक सुविधा फ्री आहेत. म्हणजे ATM कार्ड, इंटरनेट बँकिंग सर्विस, ATMमधून महिन्यातून 4 वेळा मोफत पैसे काढण्याची सोय अशा सेवा मिळणार आहेत.
पुण्यात पावसाचा कहर; कोंढवा येवलेवाडी परिसरात पाणीच पाणी