मुंबई, 24 सप्टेंबर : देशाची सर्वात मोठी बँक SBI आपल्या डेबिट कार्ड होल्डर्ससाठी ATM मधून पैसे काढण्याची मर्यादा ठरवत असते. गेल्या वर्षी नोव्हेंबर महिन्यात या बँकेनं क्लासिक आणि मॅस्ट्रो कार्ड होल्डर्ससाठी या लिमिटला अर्ध केलं होतं. SBI आपल्या ग्राहकांसाठी एका महिन्यात 8 ते 10 वेळा फ्री ट्रॅ्झॅक्शन करण्याची संधी देतात. यापेक्षा जास्त ट्रॅन्झॅक्शन झालं तर ग्राहकाला बँकेला चार्जेस द्यावे लागतात. बँकेनं माहिती दिलीय की 1 ऑक्टोबरपासून कमी बॅलन्समुळे ट्रॅन्झॅक्शन फेल झालं तर बँक ग्राहकांकडून पैसे वसूल करेल. महिन्याला एटीएम ट्रॅन्झॅक्शनच्या या आहेत मर्यादा आता SBI च्या खातेधारकांना मेट्रो शहरात 8 फ्री एटीएम ट्रॅन्झॅक्शनची सुविधा दर महिन्याला मिळते. यात 5 ट्रॅन्झॅक्शन एसबीआय एटीएम आणि 3 ट्रॅन्झॅक्शन एसबीआय एटीएम आणि 3 ट्रॅन्झॅक्शन दुसऱ्या बँकांच्या एटीएममधून करू शकता. मेट्रो नसलेल्या शहरात ही मर्यादा दर महिन्याला 10 ट्रॅन्झॅक्शन आहे. यापुढे जाऊन ट्रॅन्झॅक्शन केलं तर 5 रुपयांपासून 20 रुपयांपर्यंत चार्ज द्यावा लागतो. सोनं-चांदी झालं महाग, ‘हे’ आहेत मंगळवारचे दर 10 फ्री ट्रॅन्झॅक्शन्स 25 हजार रुपये बॅलन्स असणाऱ्या SBI खातेधारकांना दर महिन्याला 10 फ्री ट्रॅन्झॅक्शन्स सुविधा मिळतात. दोन दिवसांनी मारुती सुझुकी कार होणार ‘इतक्या’ स्वस्त SBI क्लासिक आणि मॅस्ट्रो डेबिट कार्ड SBI च्या कार्डसमध्ये ही सर्वात लोकप्रिय कार्डस आहेत. या कार्डातून कमीत कमी 100 रुपये आणि जास्तीत जास्त 20 हजार रुपये ATM मधून काढता येतात. तुमच्या PF अकाउंटमध्ये लवकरच येणार जास्त पैसे, ‘असं’ तपासा तुमचं खातं सरकारी बँक SBI आपल्या ग्राहकांना जास्तीत जास्त सुविधा मिळतील, याची काळजी घेत असते. बँक तुम्हाला झीरो बॅलन्स खातं उघडण्याची सुविधाही देते. आता या खात्यात ग्राहकांना अनेक सुविधा मोफत मिळणार आहेत. RBI नं झीरो बॅलन्स खात्यांच्या नियमात अनेक बदल केलेत. VIDEO : पवारांबाबत बोलताना उदयनराजेंना कोसळलं रडू, केली ‘ही’ घोषणा
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.