मुंबई, 17 सप्टेंबर : आज सोन्याच्या किमतीत दिलासा मिळालाय. दिल्ली सराफा बाजारात मंगळवारी (17 सप्टेंबर ) सोन्याचा भाव 150 रुपये कमी होऊन 38,905 रुपये प्रति 10 ग्रॅम झालाय. एचडीएफसी सिक्युरिटीजच्या माहितीप्रमाणे सोन्याच्या मागणीत घट झाल्यानं सोन्याच्या दरात घसरण झालीय. सोन्याबरोबर चांदीचे दरही कमी झालेत. चांदीचा भाव 290 रुपये कमी होऊन तो 48,028 रुपये प्रति किलोग्रॅम झालाय.
आंतरराष्ट्रीय स्तरावर न्यूयाॅर्कमध्ये सोन्याची घसरण होऊन सोनं 1,497 डाॅलर प्रति औंस झालंय. तर चांदीतही घट होऊन चांदी 17.81 डाॅलर प्रति औंस आहे.
... म्हणून सलग 4 दिवस आहेत बँका बंद
मध्यंतरी सोनं आणि चांदी दोन्ही महाग झालेलं. पण आता अमेरिका आणि चीनमधल्या व्यापार युद्धात थोडा बदल आणि अमेरिकी एफओएमसी रेट निर्णयामुळे सोन्याच्या किमतीत फरक पडलाय.
कसं ओळखायचं अस्सल सोनं?
दातांची टेस्ट - तुम्ही दातांमध्ये सोनं दाबून ठेवलंत तर ते खरं असेल तर दातांवर निशाणी दिसेल. सोन्याचे दागिनेही 24 कॅरेटचे तयार करत नाहीत. त्यात इतर धातू मिसळावे लागतात.
LIC मध्ये नोकरीची मोठी संधी, 8500 जागांवर होणार भरती
पाण्याची टेस्ट - आणखी एक सोपी पद्धत म्हणजे पाण्याची टेस्ट. त्यासाठी एका खोल भांड्यात 2 ग्लास पाणी टाका आणि त्यात सोन्याचे दागिने बुडवा. सोनं तरंगलं तर ते खरं नाही. ते खाली गेलं तर खरं आहे, समजावं.
GST काउन्सिलच्या बैठकीत रोजच्या जीवनातल्या 'या' गोष्टी होणार स्वस्त
सिरॅमिक थाळी - बाजारातून पांढऱ्या रंगाची ही थाळी आणा. सोनं त्या थाळीवर घासा. थाळी काळी पडली तर समजा सोनं खोटं आहे आणि चांगले रंग थाळीवर चढले तर ते सोनं असली आहे.
चुंबक टेस्ट - तज्ज्ञांच्या मते दुकानातून चुंबक घ्या आणि सोन्याच्या दागिन्यांवर लावा. सोनं त्यावर चिकटलं तर ते असली नाही. चिकटलं नाही तर ते अस्सल सोनं आहे.
VIDEO : शरद पवारांची सोलापुरात तुफान फटकेबाजी
बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा