जाहिरात
मराठी बातम्या / मनी / ICICI बँक ग्राहकांना धक्का, आता 'यासाठी' द्यावे लागतील जास्त पैसे

ICICI बँक ग्राहकांना धक्का, आता 'यासाठी' द्यावे लागतील जास्त पैसे

ICICI बँक ग्राहकांना धक्का, आता 'यासाठी' द्यावे लागतील जास्त पैसे

Icici Bank - आयसीआयसीआय बँकेच्या ग्राहकांसाठी महत्त्वाची बातमी आहे

  • -MIN READ
  • Last Updated :

मुंबई, 16 सप्टेंबर : आयसीआयसीआय (ICICI)नं आपल्या ग्राहकांना मोठा धक्का दिलाय. बँकेनं सांगितलंय की, ज्या ग्राहकांचं झीरो बॅलन्स खातं आहे त्या ग्राहकांनी बँकेच्या खात्यातून पैसे काढले तर 100 रुपयांपासून 125 रुपयांपर्यंत शुल्क द्यावं लागेल. तसंच, खातेधारक बँक ब्रँचमध्ये मशीनद्वारे पैसे जमा करत असतील तर त्यांनाही त्याचं शुल्क द्यावं लागेल. 16 ऑक्टोबरपासून हा चार्ज सुरू होईल. ICICI बँकेनं शुक्रवारी रात्री आपल्या खातेधारकांसाठी एक नोटीस काढलीय. त्यात म्हटलंय की, आम्ही आमच्या ग्राहकांनी बँकिंग ट्रॅन्झॅक्शन डिजिटल मोडमध्ये करावं म्हणून प्रोत्साहन देतोय. यामुळे डिजिटल इंडिया या उपक्रमाला चालना मिळेल. पेट्रोल-डिझेल महागच, ‘हे’ आहेत आजचे दर बँकेनं मोबाइल बँकिंग, इंटरनेट बँकिंगद्वारे होणाऱ्या एनईएफटी, आरटीजीएस तसंच युपीआय ट्रॅन्झॅक्शनवर लागणारं शुल्क बंद केलंय. NEFT आणि RTGS वरचा दर ICICI बँकेच्या ब्रँचमधून 10 हजार रुपयांपासून 10 लाख रुपयापर्यंतच्या मंजुरीवर ग्राहकांना 2.25 रुपयांपासून 24.75 रुपयांचा चार्ज द्यावा लागतो. ICICI बँकेच्या कुठल्याही बँकेतून 2 लाख रुपये ते 10 लाख रुपयांपर्यंत केलं जाणाऱ्या RTGS ट्रॅन्झॅक्शनसाठी 20 रुपयांपासून 45 रुपयांपर्यंत चार्ज द्यावा लागतो. तसंच GST द्यावा लागतो. ग्रॅज्युएट्सना बँकेत नोकरीची मोठी संधी, ‘या’ पदांसाठी करा अर्ज बँकेनं आपल्या झीरो बँक बॅलन्स अकाउंट असलेल्यांना सांगितलंय की तुमचं खातं बेसिक अकाउंटमध्ये ट्रान्सफर करा. नाही तर ते बंद केलं जाईल. जर तुम्ही ICICI बँकेचे ATM कार्ड वापरत असाल तर या बँकेच्या iMobile अॅपच्या मदतीने ATM कार्ड स्विच ऑन अथवा ऑफ करू शकता. हे अॅप android आणि ios या दोन्ही ठिकाणी उपलब्ध आहे. यासाठी खालील टप्पे फॉलो करा… हिंदुस्तान पेट्रोलियममध्ये 9 पदांसाठी 164 व्हेकन्सी, ‘असा’ करा अर्ज - सर्वात आधी गुगल प्ले स्टोअरमधून iMobile अॅप डाऊनलोड करून घ्या. त्यानंतर अॅपमधील Manage कार्ड या पर्यायावर क्लिक करा. - Manage कार्डमध्ये तुम्हाला पैसे काढणे, सर्व व्यवहार आणि इंटरनॅशनल व्यवहार हे पर्याय दिसतील. या अॅपच्या मदतीने तुम्ही कार्ड तात्पुरत्या काळासाठी ब्लॉक करू शकता. यासाठी तुम्हाला Temp Blockया पर्यायावर क्लिक करावा लागेल. VIDEO: भाजपची फसलेली ऑफर! पृथ्वीराज चव्हाणांनी सांगितला किस्सा

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
  • First Published :
जाहिरात
जाहिरात