तुम्ही प्रवासाला चाललात? मग ट्रॅव्हल इन्शुरन्स हवाच, 'हे' आहेत फायदे

तुम्ही प्रवासाला चाललात? मग ट्रॅव्हल इन्शुरन्स हवाच, 'हे' आहेत फायदे

Travel Insurance - तुम्ही प्रवासाला निघाला असाल तर या महत्त्वाच्या गोष्टी लक्षात ठेवा

  • Share this:

मुंबई, 10 सप्टेंबर : तुम्हाला प्रवासाची आवड आहे? तुम्ही सारखे प्रवास करत असता, तर मग ट्रॅव्हल इन्शुरन्स काढलाच पाहिजे. याचे अनेक फायदे आहेत. प्रवासात तुमचा अपघात झाला, सामान चोरी झाली तर हा इन्शुरन्स उपयोगी आहे. यात तुमचा हाॅस्पिटलचा खर्चही असतो. परदेशी प्रवास करणाऱ्यांसाठी तर हा ट्रॅव्हल इन्शुरन्स गरजेचा आहे.

ट्रॅव्हल इन्शुरन्सचा काय फायदा?

ट्रॅव्हल इन्शुरन्सची मागणी वाढतेय. याचे अनेक फायदे आहेत. तुम्ही तणावमुक्त प्रवास करू शकता.

एवढ्यात नोकरी सोडण्याचा विचार अजिबात करू नका, कारण...

काय काय होतं कव्हर?

ट्रॅव्हल इन्शुरन्समध्ये अपघात, सामानाची चोरी, पासपोर्टची चोरी, उशिरा येणारं फ्लाइट, तिकीट रद्द होणं, हायजॅकिंग, आजाराचा खर्च कव्हर होतो.

रिकाम्या पाण्याच्या बाटल्यांतून तुम्ही 'असे' कमवाल पैसे

कसा खरेदी करायचा इन्शुरन्स?

बुकिंगच्या वेळी एअरलाइन्स किंवा ट्रॅव्हल कंपन्या हा पर्याय देतात. तुमच्याकडे वार्षिक ट्रॅव्हल पाॅलिसी असेल तर ट्रॅव्हल इन्शुरन्स खरेदी करण्याची गरज नाही. डेस्टिनेशन, प्रवासाचा दिवस यावर प्रीमियमची रक्कम अवलंबून असते.

मुंबईच्या नेव्हल डाॅकयार्डमध्ये 933 व्हेकन्सी, 'असा' करा अर्ज

फॅमिली ट्रॅव्हल इन्शुरन्स

60 वर्षापर्यंतच्या 2 जणांना कव्हर मिळतं. 21 वर्षाच्या 2 मुलांना कव्हर मिळतं. फॅमिली ट्रॅव्हल इन्शुरन्स फ्लोटर बेनिफिट प्लॅनचा हिस्सा आहे.

स्टुडंट ट्रॅव्हल इन्शुरन्स

परदेशात शिक्षणासाठीही इन्शुरन्स असतो. तिथे शिक्षणासाठी 16-40 वर्षापर्यंत लोकांना कव्हर मिळतं.

ज्येष्ठ नागरिकांसाठी

85 वर्षापर्यंत ज्येष्ठ नागरिकांना कव्हर मिळतं. त्यासाठी वैद्यकीय तपासणीची गरज नाही.

VIDEO : 'राणादा'च्या घरचा गणपती, केलं ईको फ्रेंडली गणेशोत्सवाचं आवाहन

First published: September 10, 2019, 7:49 PM IST
Tags:

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading