मुंबई, 10 सप्टेंबर : सध्या सगळीकडे मंदीचं वातावरण आहे. येणाऱ्या तिमाहीत ( ऑक्टोबर-डिसेंबर ) 19 टक्के कंपन्याच नव्या लोकांना नोकऱ्या देऊ शकतील. 52 टक्के कंपनीत नव्या नियुक्त्या होणार नाहीत. मॅनपाॅवर ग्रुप एम्पलाॅयमेंट आउटलूकनं सर्वे केलाय. या सर्वेत देशभरातल्या 5,131 मालकांशी चर्चा केली. तेव्हा हा सर्वे समोर आला. 19 टक्के कंपन्या वाढवणार कर्मचाऱ्यांची संख्या 19 टक्क्यांनी सांगितलं, आम्ही नवे कर्मचारी नियुक्त करू तर 52 टक्क्यांनी सांगितलं की, कर्मचारी वाढवण्याचा काही विचार नाही. शिवाय 28 टक्क्यांनी सांगितलं की कर्मचाऱ्यांची संख्या वाढवण्याचा काही विचार नाही. मुंबईच्या नेव्हल डाॅकयार्डमध्ये 933 व्हेकन्सी, ‘असा’ करा अर्ज नव्या नोकऱ्यांबाबत भारत चौथ्या स्थानावर पुढच्या तीन महिन्यांचा विचार करता नव्या नोकऱ्यासंदर्भात भारत चौथ्या नंबरवर आहे. या सर्वेत जपान पहिल्या नंबरवर, तैवान दुसऱ्या आणि अमेरिका तिसऱ्या नंबरवर आहे. जपानमध्ये 26 टक्के मालकांनी नव्या नोकऱ्या देण्याबद्दल सांगितलं. तैवानमध्ये 21 टक्के तर अमेरिकेत 20 टक्केच मालक नव्या नोकऱ्या देणार आहेत. MMRDA Recruitment 2019 : इंजिनीयर्ससाठी मेट्रोमध्ये बंपर व्हेकन्सी 44 देशांमध्ये 59 हजार मालकांबरोबर केली चर्चा मॅनपाॅवरनं जगभरातल्या 44 देशांमध्ये 59,000 मालकांशी बातचीत केली. या सर्वेत समोर आलं की 43-44 देशांमधल्या कंपन्या कर्मचाऱ्यांची संख्या वाढवण्याची आशा आहे. गेल्या तिमाहीबद्दल पाहिलं तर 44 देश आणि प्रदेशांत 15 देशांमधल्या मालकांनी नव्या नोकरीबद्दल खुलासा केलाय. महाराष्ट्र पोलीस दलात मोठी व्हेकन्सी, मुंबईत जास्त जागा, ‘अशी’ होईल निवड चीनच्या उद्योगपतींनी फक्त 4 टक्के रोजगार वाढवण्याबद्दल सांगितलं. गेली दोन वर्ष चीन याबाबत खूपच कमजोर आहे. मॅनपाॅवर समूहाचे अध्यक्ष जोनास प्रायसिंग म्हणाले, जगभरातल्या देशांतून नोकरीबद्दल वेगवेगळी मतं कळली. काहींची अर्थव्यवस्था चांगली असूनही तिथेही नव्या नोकरीची संधी कमीच जाणवली. VIDEO :…तेव्हा जेटलींच्या घराचा आसरा होता, शरद पवारांनी दिला आठवणींना उजाळा
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.