Union
Budget 2023

Highlights

मराठी बातम्या /बातम्या /मनी /

आरोग्य क्षेत्रासाठी मोदी सरकार देणार 50000 कोटी, वाचा काय आहे पूर्ण योजना

आरोग्य क्षेत्रासाठी मोदी सरकार देणार 50000 कोटी, वाचा काय आहे पूर्ण योजना

कोरोना व्हायरसच्या दुसऱ्या लाटेमध्ये (Second Wave of Coronavirus) देशाची अर्थव्यवस्था मोठ्या प्रमाणात प्रभावित झाली आहे.

कोरोना व्हायरसच्या दुसऱ्या लाटेमध्ये (Second Wave of Coronavirus) देशाची अर्थव्यवस्था मोठ्या प्रमाणात प्रभावित झाली आहे.

कोरोना व्हायरसच्या दुसऱ्या लाटेमध्ये (Second Wave of Coronavirus) देशाची अर्थव्यवस्था मोठ्या प्रमाणात प्रभावित झाली आहे.

  • Published by:  Janhavi Bhatkar

नवी दिल्ली, 16 जून: कोरोना व्हायरसच्या दुसऱ्या लाटेमध्ये (Second Wave of Coronavirus) देशाची अर्थव्यवस्था (Indian Economy) मोठ्या प्रमाणात प्रभावित झाली आहे. या दरम्यान सरकारी सूत्रांच्या हवाल्याने अशी माहिती समोर आली आहे केंद्र सरकार महामारीमुळे (Modi Government) त्रस्त असलेल्या आरोग्य सेवांच्या पायाभूत सुविधांना चालना देण्यासाठी 6.8 बिलियन डॉलरचं (जवळपास 50,000 कोटी रुपये) कर्ज प्रोत्साहन देण्याच्या विचारात आहे.

RBI ने केली होती 50000 कोटींचे कर्ज देण्याची घोषणा

लाइव्ह मिंटने सूत्रांच्या हवाल्याने अशी माहिती दिली आहे की, ही प्रोत्साहन रक्कम कंपन्यांना हॉस्पिटलची क्षमता किंवा वैद्यकीय पुरवठा वाढविण्यात मदत करेल. यात सरकार एक गॅरंटर म्हणून काम करेल.  छोट्या शहरांमधील कोविड-19 संबंधितआरोग्याच्या पायाभूत सुविधांच्या बळकटीकरणावर लक्ष केंद्रित केले जाण्याची शक्यता असल्याचे सूत्रांनी सांगितले. सध्या वित्त मंत्रालयाच्या प्रवक्त्याने याबद्दल काहीही बोलण्यास नकार दिला आहे. अलीकडील आरबीआय गव्हर्नर यांनी घोषणा केली होती की, कोरोना संकटाची गरज लक्षात घेता आपत्कालीन आरोग्य सेवांसाठी 50000 कोटींचे कर्ज जाहीर केले जात आहे.

हे वाचा-या 5 कारणांमुळेही नाकारला जाऊ शकतो तुमचा Health Insurance Claim, अशी घ्या काळजी

41 बिलियन डॉलरच्या आपात्कालीन कर्जाची घोषणा

सरकारने गेल्या महिन्यात एक वेगळी घोषणा केली होती, ज्यामध्ये एअरलाइन्स आणि हॉस्पिटल्सना पँडेमिकच्या प्रभावापासून वाचण्यासाठी 41 बिलियन डॉलरच्या आपात्कालीन कर्जाच्या कार्यक्रमात समाविष्ट केलं जात आहे. रुग्णालयं आणि क्लिनिक्समध्ये ऑनसाइट ऑक्सिजन उत्पादन सयंत्र स्थापित करण्यासाठी 20 मिलियन रुपयांच्या कर्जाची गॅरंटी या कार्यक्रमात देण्यात आली आहे, ज्याचा व्याजदर 7.5 टक्के आहे.

First published:

Tags: Coronavirus, Modi government, Money