मुंबई, 21 ऑगस्ट : ऑगस्ट महिना संपायला अवघे काही दिवस उरले आहेत. मात्र हा महिना संपण्याआधी काही कामं तुम्हाला करावी लागणार आहेत. या महिनाअखेर ही कामं केली नाही तर तुमचं आर्थिक नुकसान होऊ शकतं. यातील अनेक कामे तुम्ही घरी बसूनही करू शकता, यासाठी तुम्हाला कुठेही जाण्याची गरज नाही. सरकारने प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजनेच्या लाभार्थ्यांसाठी KYC अनिवार्य केले आहे. केवायसी करण्याची शेवटची तारीख 31 ऑगस्ट आहे. त्याचप्रमाणे, पंजाब नॅशनल बँकेच्या ग्राहकांसाठी केवायसी प्रक्रिया पूर्ण करण्याची अंतिम तारीख देखील या महिन्याची शेवटची तारीख आहे. ज्यांनी आयटीआर भरला आहे, त्यांनी त्याची पडताळणी करणे बंधनकारक आहे. ITR पडताळणीची अंतिम तारीख 31 ऑगस्ट नसली तरी, तुम्ही हे काम लवकरच केल्यास, तुमचा रिफंड तुमच्या खात्यात लवकरच जमा होईल.
Income Tax: करदाते अजूनही दंड न भरता ITR फाईल करु शकतात; ‘या’ गोष्टी लक्षात ठेवा
किसान सन्मान निधी KYC पीएम किसान योजनेचा लाभ घेणाऱ्या शेतकऱ्यांनी 31 ऑगस्टपर्यंत eKYC करून घेणे आवश्यक आहे. या तारखेपर्यंत जे शेतकरी EKYC करणार नाहीत त्यांना पुढील हप्त्याचे पैसे मिळणार नाहीत. शेतकरी त्यांच्या जवळच्या कॉमन सर्व्हिस सेंटरला (CSC) भेट देऊन आणि PM किसानच्या अधिकृत वेबसाइटद्वारे ऑनलाइन घरी बसून eKYC पूर्ण करू शकतात. यासाठी लाभार्थ्यांना मोबाईल क्रमांक आधारकार्डशी लिंक करावा लागेल. PNB ग्राहकांना KYC करणे आवश्यक पंजाब नॅशनल बँकेकडून (PNB) खातेदारांसाठी KYC करण्याची अंतिम तारीख 31 ऑगस्ट आहे. बँकेच्या म्हणण्यानुसार, केवायसी न केल्यास बँक खाते बंद केले जाऊ शकते. बँकेने म्हटले आहे की ज्यांनी 31 मार्च 2022 पर्यंत त्यांचे केवायसी केले आहे त्यांना कोणत्याही समस्येचा सामना करावा लागणार नाही. PM Vaya Vandana Yojana: विवाहित जोडप्यांनो, या सरकारी योजनेत करा गुंतवणूक, दरमहा मिळतील 18500 रुपये ITR व्हेरिफाय करा 2021-22 या आर्थिक वर्षासाठी प्राप्तिकर रिटर्न (ITR) भरण्याची अंतिम तारीख 31 जुलै निघून गेली आहे. आयटीआरची पडताळणी करणे आवश्यक आहे. जर तुम्ही 31 जुलैपर्यंत आयटीआर भरला असेल, तर तुम्ही लवकरच आयटीआरची पडताळणी करावी. मात्र 31 जुलैपर्यंत आयटीआर दाखल करणाऱ्यांना त्याची पडताळणी करण्यासाठी 120 दिवस मिळतील. परंतु तुम्ही लवकरच आयटीआर व्हेरिफाय केल्यास, आयकर विभाग तुम्हाला रिफंड देण्याची प्रक्रिया लवकरच सुरू करेल. ज्यांनी 1 ऑगस्ट किंवा त्यानंतर आयटीआर दाखल केला आहे, त्यांना या वेळी ते पडताळण्यासाठी फक्त 30 दिवस मिळतील. आयटीआर दाखल करण्याच्या तारखेपासून दिवस मोजले जातील. त्यामुळे जर तुम्ही 1 ऑगस्ट नंतर आयटीआर भरला असेल तर लवकरच त्याची पडताळणी करा. तुम्ही ITR ऑनलाइन पाच प्रकारे व्हेरिफाय करू शकता. याशिवाय तुम्ही हे काम ऑफलाइनही करू शकता.