जाहिरात
मराठी बातम्या / मनी / Income Tax: करदाते अजूनही दंड न भरता ITR फाईल करु शकतात; 'या' गोष्टी लक्षात ठेवा

Income Tax: करदाते अजूनही दंड न भरता ITR फाईल करु शकतात; 'या' गोष्टी लक्षात ठेवा

Income Tax: करदाते अजूनही दंड न भरता ITR फाईल करु शकतात; 'या' गोष्टी लक्षात ठेवा

Income Tax Return: आयकर कायद्याच्या कलम 234-एफ अंतर्गत, ITR उशीरा सबमिट केल्याबद्दल 5,000 रुपये दंड आकारला जातो. दुसरीकडे, जर करपात्र उत्पन्न 5 लाख रुपयांपेक्षा कमी असेल, तर दंडाची रक्कम 1,000 रुपये आहे.

  • -MIN READ
  • Last Updated :

मुंबई, 21 ऑगस्ट : आयकर भरण्यासाठीची तारीख उलटून गेली आहे आहे. आयकर रिटर्न भरण्याचा शेवटचा दिवस म्हणजे 31 जुलै होता. मात्र मूल्यांकन वर्ष 2022-23 साठी, 31 डिसेंबर 2022 पर्यंत उशीरा रिटर्न भरता येईल. असे काही करदाते आहेत जे अजूनही दंड न भरता रिटर्न भरू शकतात. आयकर विभागाच्या वेबसाइटनुसार, ज्या लोकांच्या खात्यांचे अद्याप ऑडिट व्हायचे आहे ते 31 ऑक्टोबर 2022 पर्यंत रिटर्न भरू शकतात. जर कोणत्याही कॉर्पोरेट किंवा नॉन-कॉर्पोरेट खात्यांचे ऑडिट केले जाणार आहे, त्यांनी 2021-22 या आर्थिक वर्षात कोणतेही आंतरराष्ट्रीय किंवा विशिष्ट देशांतर्गत व्यवहार केले नाहीत, तर ते 31 ऑक्टोबर 2022 पर्यंत आरटीआर दाखल करू शकतात. PM Vaya Vandana Yojana: विवाहित जोडप्यांनो, या सरकारी योजनेत करा गुंतवणूक, दरमहा मिळतील 18500 रुपये फर्मच्या भागीदाराला सूट ज्‍या फर्मच्‍या भागीदारांच्‍या खात्‍याचे ऑडिट करायचे आहे किंवा अशा भागीदारांसाठी ज्‍यासाठी कलम 5A च्‍या तरतुदी लागू आहेत, रिटर्न भरण्‍याची अंतिम तारीख 31 ऑक्‍टोबर 2022 आहे. आयकर विभागाच्या म्हणण्यानुसार, पोर्तुगाल सिव्हिल कोड अंतर्गत येणाऱ्या अशा व्यक्तींना कलम 5-ए लागू आहे आणि हा कोड फक्त गोवा, दमण आणि दीव आणि दादरा आणि नगर हवेलीमध्ये लागू आहे. UPI च्या नियमात बदल होण्याची शक्यता; काय आहे RBIचं प्लॅनिंग? वाचा सविस्तर आयकर कायद्याच्या कलम 234-एफ अंतर्गत, ITR उशीरा सबमिट केल्याबद्दल 5,000 रुपये दंड आकारला जातो. दुसरीकडे, जर करपात्र उत्पन्न 5 लाख रुपयांपेक्षा कमी असेल, तर दंडाची रक्कम 1,000 रुपये आहे. या गोष्टींची काळजी घ्या » रिफंडमध्ये कोणतीही अडचण नको याची खात्री करण्यासाठी, योग्य बँक खात्याचे तपशील भरा आणि ते प्री-वॅलिडेट असले पाहिजे. » फॉर्म 25AS, AIC/TIS एकत्र करणे सुनिश्चित करा. » कोणत्याही कॅरी फॉरवर्ड तोट्यासाठी मागील वर्षाचा आयटीआर फॉर्म तपासा. » जुन्या आणि नवीन कर प्रणालीमध्ये तुमच्या बाबतीत काय चांगले आहे याची तुलना करा. » ITR दाखल केल्यानंतर, ते 120 दिवसांच्या आत ई-व्हेरिफाय करणे आवश्यक आहे, अन्यथा फाइलिंग वैध राहणार नाही. » तुमच्या उत्पन्नानुसार योग्य ITR फॉर्म निवडा जेणेकरून तुम्हाला चुकीच्या रिटर्नची सूचना मिळणार नाही.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
  • First Published :
जाहिरात
जाहिरात