मराठी बातम्या /बातम्या /मनी /

OMG! 'या' शेअरने 24 वर्षांमध्ये दिला तब्बल 3681 पट परतावा

OMG! 'या' शेअरने 24 वर्षांमध्ये दिला तब्बल 3681 पट परतावा

शेअरमध्ये गुंतवणूक करून त्यातून नफा कमावणं केवळ धैर्यशील व्यक्तींनाच जमू शकतं. कारण पैसा कमावण्याचा हा खेळ, शेअर खरेदी करणं आणि विकणं यावर नाही तर तुम्ही किती वाट पाहता यावर अवलंबून असतो.

  • Trending Desk
  • Last Updated :
  • Mumbai, India

नवी दिल्ली, 26 सप्टेंबर : शेअर बाजारातल्या गुंतवणुकीत अनिश्चितता असते. त्यातल्या नफ्या-तोट्याची ठोस गणितं बांधता येत नाहीत. बाजाराचं ज्ञान व ठोकताळे यांचा अंदाज बरोबर आला, तर चांगली कमाई होऊ शकते. शेअरमध्ये गुंतवणूक करून त्यातून नफा कमावणं केवळ धैर्यशील व्यक्तींनाच जमू शकतं. कारण पैसा कमावण्याचा हा खेळ, शेअर खरेदी करणं आणि विकणं यावर नाही तर तुम्ही किती वाट पाहता यावर अवलंबून असतो. बजाज फायनान्सच्या शेअरनं हे सिद्ध केलं आहे. बजाज फायनान्सचे शेअर घेतलेल्या दीर्घ काळ गुंतवणूकदारांना मोठा फायदा मिळाला आहे. 24 वर्षांत बजाज फायनान्सच्या शेअरने गुंतवणूकदारांना 3681 पट परतावा दिला आहे.

बजाज फायनान्स ही बजाज फिनसर्व्हशी संलग्न असलेली कंपनी आहे. तिचं नाव अगोदर बजाज ऑटो फायनान्स असं होतं. 2010मध्ये ते बजाज फायनान्स असं करण्यात आलं. दुचाकी आणि तिचाकी वाहनांसाठी कर्ज देण्याच्या उद्देशानं याची सुरुवात झाली होती. आरबीएल बँक आणि डीबीएल बँकेसोबत मिळून बजाज फायनान्स कंपनी को-ब्रँडेड क्रेडिट कार्डही देते. बजाज फायनान्सचा एकत्रित नफा जून 2022च्या तिमाहीत वार्षिक आधारावर 159 टक्के वाढून 2596 कोटी रुपये झाला. या काळात कंपनीचं निव्वळ व्याज 4489 कोटी रुपयांवरून 48टक्के वाढून 6638 कोटी रुपये झालं आहे. कंपनीकडून कर्ज घेणाऱ्यांच्या प्रमाणात 60 टक्के वाढ झाली आहे.

Share Market : नवरात्रीच्या शुभ मुहूर्तावर 'या' स्टॉकमध्ये पैसे गुंतवून मिळवू शकता मोठा फायदा

भरपूर परतावा

बजाज फायनान्सच्या शेअरचा भाव 18 एप्रिल 1996 ला 5.78 रुपये होता. दोन वर्षांनी 21 ऑगस्ट 1998 ला हा दर घसरून 2.04 रुपये झाला. तब्बल 22 वर्षांनी म्हणजे 23 सप्टेंबर 2022 ला बजाज फायनान्सचा दर मुंबई शेअर बाजारात 7509 रुपये इतका झाला. एखाद्या गुंतवणूकदाराने त्या वेळी या शेअरमध्ये 1 लाखांची गुंतवणूक केली असेल, तर त्याचं आजचं मूल्य 37 कोटी रुपये इतकं झालं असेल. गेल्या 5 वर्षांत या शेअरमध्ये 303 टक्क्यांची वाढ झाली आहे, तर एका वर्षात या शेअरमध्ये 6 टक्क्यांची घसरणही झाली होती. गेल्या एका महिन्यात या शेअरनं 3 टक्के इतका परतावा दिला आहे. सहा महिन्यांत या शेअरमध्ये 4.65 टक्के घसरण झाली आहे. यंदाच्या 2022 या वर्षात हा शेअर 1.41 टक्के वधारला आहे. बजाज फायनान्समध्ये दीर्घ काळ गुंतवणूक केलेल्यांसाठी ही आनंदाची वार्ता ठरली आहे.

First published:

Tags: Bajaj, Share market, Stock Markets