जाहिरात
मराठी बातम्या / मनी / 1 मार्चपासून होणार हे मोठे बदल, तुमच्या खिशावर होईल थेट परिणाम!

1 मार्चपासून होणार हे मोठे बदल, तुमच्या खिशावर होईल थेट परिणाम!

एक मार्चपासून बदलणार नियम

एक मार्चपासून बदलणार नियम

1 मार्चपासून अनेक सरकारी नियम बदलणार आहेत, ज्यात 2000 रुपयांची नोट, LPG किंमत आणि ट्रेनच्या वेळापत्रकाशी संबंधित नियमांचा समावेश आहे.

  • -MIN READ Mumbai,Maharashtra
  • Last Updated :

मुंबई, 27 फेब्रुवारी: फेब्रुवारी महिना संपायला दोन दिवसांपेक्षा कमी कालावधी शिल्लक आहे. यानंतर मार्च महिना येणार आहे आणि प्रत्येक महिन्याच्या सुरुवातीला सरकारकडून काही नियम बदलले जातात, त्याचा थेट परिणाम आपल्या खिशावर होतो. यावेळी देखील 2000 रुपयांची नोट, एलपीजीची किंमत आणि ट्रेनच्या वेळापत्रकात महत्त्वाचे बदल होणार आहेत. आज आपण याच बदलांविषयी सविस्तर जाणून घेणार आहोत.

2000 रुपयांची नोट

1 मार्चपासून ग्राहकांना इंडियन बँकेच्या एटीएममधून 2,000रुपयांच्या नोटा मिळणार नाहीत. यासाठी ग्राहकांना बँकेच्या शाखेत जावे लागेल. या निर्णयामागील कारण स्पष्ट करताना बँकेने सांगितले की, एटीएममधून 2000 रुपयांची नोट काढल्यानंतर ग्राहक शाखेत येतात आणि त्याचे सुट्टे घेतात. हे थांबवण्यासाठी हा निर्णय घेण्यात आला आहे.

आता FD वरही करता येणार जबदरस्त कमाई! ‘या’ बँका देताय 9.50% व्याज

एलपीजी किंमत

एलपीजीच्या किंमतीमध्ये महिन्याच्या सुरुवातीला तेल वितरण कंपन्या बदल करतात. मात्र, गेल्या वेळी यामध्ये कोणताही बदल झालेला नाही. सध्या, 14.2 किलोच्या घरगुती एलपीजी सिलेंडरची किंमत दिल्लीत 1053 रुपये, कोलकात्यात 1079 रुपये, मुंबईत 1052.50 रुपये आणि चेन्नईमध्ये 1068.50 रुपये आहे. मात्र यंदा या किंमती बदलू शकतात असा अंदाज आहे.

इमरजन्सीमध्ये PPF मधून पैसे कसे काढायचे? काय आहेत नियम? घ्या जाणून

अनेक विशेष गाड्या सुरू

मार्चमध्ये होळीचा सण उत्साहात साजरा केला जाणार आहे. हे लक्षात घेऊन भारतीय रेल्वेने 1 मार्चपासून अनेक विशेष गाड्या सुरू करण्याची घोषणा केली आहे. त्यामुळे महानगरांमध्ये काम करणाऱ्या लोकांना त्यांच्या घरी जाण्याची खूप सोय होणार आहे. रेल्वेने विविध मार्गांवर विशेष गाड्या चालवण्याचा निर्णय घेतला आहे. या गाड्या दिल्ली, मध्य प्रदेश, मुंबईसह अनेक मार्गांदरम्यान धावतील. यामध्ये काही गाड्या सुरू झाल्या आहेत. त्याच वेळी, काही गाड्या 1 मार्च 2023 पासून सुरू होतील.

Bank Holiday in March: मार्च महिन्यात एवढे दिवस बँका राहणार बंद, पाहा सुट्ट्यांची यादी!

बँक हॉलिडे

होळी, नवरात्री असे अनेक मोठे सण मार्च महिन्यात येतात. त्यामुळे मार्चमध्ये 12 दिवस बँका बंद राहतील. अशा परिस्थितीत, जर तुम्ही बँकेशी संबंधित कोणतेही काम बऱ्याच काळापासून पुढे ढकलत असाल तर ते त्वरित पूर्ण करुन घ्या.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: railway , Rules
  • First Published :
जाहिरात
जाहिरात