जाहिरात
मराठी बातम्या / मनी / Bank Holiday in March: मार्च महिन्यात एवढे दिवस बँका राहणार बंद, पाहा सुट्ट्यांची यादी!

Bank Holiday in March: मार्च महिन्यात एवढे दिवस बँका राहणार बंद, पाहा सुट्ट्यांची यादी!

मार्च बँक हॉलिडे लिस्ट

मार्च बँक हॉलिडे लिस्ट

मार्च महिन्यात बँका 12 दिवस बंद राहणार आहेत. मार्च महिन्यात होळी, रामनवमी असे मोठे सण येत आहेत.

  • -MIN READ Mumbai,Maharashtra
  • Last Updated :

मुंबई, 25 फेब्रुवारी: मार्च महिना अगदी जवळ आला आहे. आरबीआयने मार्चमध्ये येणाऱ्या बँक सुट्ट्यांची संपूर्ण यादी जाहीर केली आहे. त्यानुसार मार्च महिन्यात एकूण 12 दिवस बँका बंद राहणार आहेत. मार्च महिन्यात होळी, नवरात्री, रामनवमी असे मोठे सण येत आहेत. याशिवाय काही राज्यांमध्ये वेगवेगळ्या दिवशी सुट्ट्या असतात. मात्र, त्याचा प्रभाव संपूर्ण देशात राहत नाही. तर या 12 सुट्ट्यांमधील सहा सुट्ट्या या दुसरा आणि चौथा शनिवार तसंच रविवारच्या आहेत. जर तुम्ही मार्चमध्ये बँकांमध्ये काही महत्त्वाचे काम करणार असाल तर येथे सुट्ट्यांची यादी पहा.

मार्च महिन्यात किती दिवस बँका राहणार बंद

3 मार्च, 2023 : चापचर कुट 5 मार्च, 2023 : रविवार 7 मार्च, 2023 : होळी / होळी (दुसरा दिवस) / होलिका दहन / धुलंडी / डोल जत्रा 8 मार्च, 2023 : धुलेती / डोलजात्रा / धुलिवंदन / याओसांग दुसरा दिवस 9 मार्च, 2023 : होळी 11 मार्च, 2023 : महिन्याचा दुसरा शनिवार 12 मार्च, 2023 : रविवार 19 मार्च, 2023 : रविवार 22 मार्च, 2023 : गुढी पाडवा 25 मार्च, 2023 : शनिवार 26 मार्च, 2023 : रविवार 30 मार्च, 2023 : श्री राम नवमी

News18लोकमत
News18लोकमत
नवं घर घेण्याचा विचार करताय? जाणून घ्या कुठे मिळतंय सर्वात स्वस्त Home Loan

राज्यांनुसार वेगवेगळ्या असतात बँकांच्या सुट्ट्या

बँकांच्या सुट्ट्यांची यादी सर्व राज्यांमध्ये वेगवेगळी असते. रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया (RBI) नुसार, सर्व राज्यांच्या सुट्ट्यांची यादी वेगळी आहे. या सुट्ट्यांची संपूर्ण यादी आरबीआयच्या अधिकृत वेबसाइटवर दिली आहे, ज्यामध्ये राज्यांनुसार विविध सण आणि सुट्ट्यांची संपूर्ण माहिती दिली आहे. दरम्यान बँकांच्या सुट्ट्यांच्या दिवशी तुम्ही ऑनलाइन पद्धतीने तुमचं बँकांसंदर्भातील कामं करु शकतात. मात्र जर तुम्हाला बँकेत काही महत्त्वाचं काम असेल तर आताच या सुट्टयांनुसार तुमच्या कामाचं नियोजन करणं गरजेचं आहे.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
  • First Published :
जाहिरात
जाहिरात