मराठी बातम्या /बातम्या /मनी /

दिवाळी स्पेशल ऑफर! दिवाळीत ‘या’ सरकारी बँकेत Home Loan 6.40 टक्क्यांवर

दिवाळी स्पेशल ऑफर! दिवाळीत ‘या’ सरकारी बँकेत Home Loan 6.40 टक्क्यांवर

सरकारी बँकेत ( Bank Offer On Home Loan) 27 ऑक्टोबरपासून नवीन दर लागू झाले.

सरकारी बँकेत ( Bank Offer On Home Loan) 27 ऑक्टोबरपासून नवीन दर लागू झाले.

सरकारी बँकेत ( Bank Offer On Home Loan) 27 ऑक्टोबरपासून नवीन दर लागू झाले.

  • Published by:  Trending Desk

मुंबई, 29 ऑक्टोबर : बँक आपल्याला आपल्या वैयक्तिक गरजांसाठी लोन मिळवून देते. पर्सनल लोन, शैक्षणिक लोन, होम लोन, गोल्ड लोन या प्रकारचे सर्व लोन आपल्याला बँकेच्या मार्फत मिळतात. इतकेच नाही तर सणासुदीच्या काळात ग्राहकांना बरीच बँकिंग सुविधा प्रदान केल्या जातात. बऱ्याचदा लोन ऑफर बँक आपल्या सोयीसाठी दिल्या जातात. त्यातच आता दिवाळी अवघ्या काही दिवसांवर आली आहे.  अशातच या दिवाळीत या सरकारी बँकेत गृहकर्जावर भारी प्रमाणात सूट देण्यात येणार आहे. आणि बँकेचा हा आतापर्यंतचा सर्वात कमी गृहकर्ज दर आहे

अलीकडेच युनियन बँक ऑफ इंडियाने (Union Bank of India) बँकेने ग्राहकांची दिवाळी अधिक सुखसोयीची जावो, यासाठी एक आनंदाच्या बातमीची भर घातलीय हे. युनियन बँक ऑफ इंडिया या सरकारी बँकेनं घर खरेदीदारांना दिवाळीत एक बंपर ऑफर आणली आहे. युनियन बँक ऑफ इंडियाने गृहकर्जाच्या व्याजदरात 0.40  टक्क्यांनी घट केली आहे. बँकेने आपल्या गृहकर्जावरील व्याजदर 6.40 % टक्क्यांपर्यंत इतके कमी केले आहेत. यापूर्वी या बँकेचा गुरहकर्जांवरील व्याजदर 6.80 टक्के होता. मात्र 27 ऑक्टोबरपासून या बँकेत हा नवीन दर लागू होईल.

Paytm Postpaid: फेस्टिव्ह सीझनमध्ये शॉपिंगचं टेन्शनच राहणार नाही! एका महिन्याने करा पेमेंट

याशिवाय याचा फायदा काही जुन्या बँक खातेधारकांनाच असणार असे नाही आहे. नवीन आणि जुन्या ग्राहकांना या कमी व्याजदराचा फायदा होईल. ( Union Bank of India Home Loan Offer ) युनियन बँक ऑफ इंडिया बँकेने असे म्हंटले आहे, की आता त्यांच्या गृहकर्जावरील व्याज दर आता 6.40 टक्क्यांपासून सुरू होईल. आणि गृहकर्जासाठीचा बँकेतील आतापर्यंतचा सर्वात कमी गृहकर्ज दर आहे. युनियन बँक ऑफ इंडिया वगळता आतापर्यंत बँक ऑफ बडोदा आणि बँक ऑफ इंडियाने सणासुदीच्या काळात 6.50 टक्के व्याजदरासह गृहकर्जाच्या ऑफर दिल्या आहेत. यातच आता सर्वात कमी व्याज दर देणाऱ्या बँकेत Union Bank of India चा सहभाग झाला आहे.

Gold Rate Today: धनत्रयोदशीआधी उतरले सोन्याचे दर, जवळपास 4000 रुपयांनी स्वस्त आहे सोनं

यासोबतच दिवाळी स्पेशल होम लोन ऑफर मध्ये या काही सरकारी बँकांचा सहभाग आहे. ग्राहकांना घर खरेदी करणे अधिक सोप्पे जावे यासाठी, बऱ्याचदा सणासुदीच्या काळात बँका ऑफर अंत असतात. यापैकी या सरकारी बँका आहेत, स्टेट बँक (SBI Bank ), ( ICICI Bank ) बँक, पंजाब नॅशनल बँक ( PNB Bank ), कोटक महिंद्रा बँक ( Kotak Mahindra Bank ), (HSBC Bank एचएसबीसी बॅंक), बँक ऑफ बडोदा( Bank of Baroda), कॅनरा बँक ( Canara Bank ), येस बँक ( Yes Bank ) या काही बँक गृहकर्जावर आकर्षक ऑफर देत आहेत.

First published:

Tags: Home Loan, Money, Pay the loan, बँक