नवी दिल्ली, 8 फेब्रुवारी : तुम्हाला जर काही दिवसांनी फारसं काम न करता पैसे कमवायचे असतील तर तुम्ही म्युच्युअल फंडाच्या(Mutual Funds)एका खास योजनेत पैसे गुंतवू शकता. यासाठी तुम्हाला 15 वर्षांचा एक सिस्टिमॅटिक इनव्हेस्टमेंट प्लॅन म्हणजे SIP मध्ये गुंतवणूक करावी लागेल. तज्ज्ञांच्या मते, म्युच्युअल फंडच्या SIP मध्ये दर महिन्याला 10 हजार रुपयांची गुंतवणूक करावी लागेल. त्यानंतर दरवर्षी SIP मध्ये 2 हजार रुपये वाढवावे लागतील. यावर वर्षाला 12 टक्के रिटर्न्स मिळाले तर 15 वर्षांत तुमच्या पैशांची किंमत 95 लाख रुपये होईल. हे पैसे तुम्ही सिस्टिमॅटिक विथड्रॉअल प्लॅन (SWP ) मध्ये गुंतवू शकता. या योजनेत 9 टक्के रिटर्न्सच्या हिशोबाने दरमहिन्याला एक ठरलेली रक्कम तुमच्या खात्यात येत राहील. तुम्ही जर 95 लाख रुपयांची गुंतवणूक केली तर 9 टक्के रिटर्न्सच्या हिशोबाने तुम्हाला दर महिन्याला 80 ते 85 हजार रुपये मिळत राहतील. SWP म्हणजे काय ? SWP म्हणजे सिस्टिमॅटिक विड्रॉल प्लॅन SIP सारखाच असतो. यामधून तुम्ही एका ठराविक पद्धतीने पैसे काढू शकता. SWP तून दर महिन्याला तुम्ही पैसे काढू शकता. SWP मधून तुम्हाला मासिक, तिमाही, सहामाही आणि वार्षिक स्तरावर पैसे मिळतील. हे पैसे तुमच्या खात्यात येतील आणि ठराविक काळानंतर तुम्ही पैसे काढू शकाल.
(हेही वाचा : सावधान ! कॅशमध्ये मोठे व्यवहार केलेत तर येणार इनकम टॅक्स विभागाची नोटीस)
निवृत्तीनंतरची चांगली योजना निवृत्तीनंतर डेट फंड्सचा पोर्टफोलिओ चांगला असतो. महिन्याच्या खर्चासाठी तुम्ही अल्ट्रा शॉर्ट टर्म फंडमध्ये गुंतवणूक करू शकता. SWP च्या माध्यमातून मासिक रक्कम घेता येते. त्यामुळे ही योजना ज्येष्ठ नागरिकांसाठी चांगली आहे. ===========================================================================================

)







