Home /News /money /

Gold Price Today: आज सलग तिसऱ्या दिवशी सोने-चांदी दरात वाढ, खरेदीआधी तपासा 10 ग्रॅमचा latest rate

Gold Price Today: आज सलग तिसऱ्या दिवशी सोने-चांदी दरात वाढ, खरेदीआधी तपासा 10 ग्रॅमचा latest rate

Gold Price Today: भारतीय सराफा बाजारात सोने-चांदी दरात पुन्हा एकदा चमक वाढू लागली आहे. आज सलग तिसऱ्या दिवशी सोने दरात (Gold Rate) तेजी पाहायला मिळत आहे.

  नवी दिल्ली, 9 फेब्रुवारी: भारतीय सराफा बाजारात सोने-चांदी दरात पुन्हा एकदा चमक वाढू लागली आहे. आज सलग तिसऱ्या दिवशी सोने दरात (Gold Rate) तेजी पाहायला मिळत आहे. चांदीचा भावही (Silver Rate) आज वधारला आहे. चांदीचा दर आज 0.29 टक्क्यांच्या वाढीसह ट्रेड करत आहे. 2020 मध्ये MCX वर 10 ग्रॅम सोन्याचा भाव 56,200 रुपयांच्या सर्वोच्च स्तरावर होता. आज MCX वर सोन्याचा वायदे भाव 48,290 रुपये प्रति 10 ग्रॅम लेवलवर आहे. सर्वोच्च स्तरावरुन सोनं अद्यापही स्वस्त दरात मिळत आहे. कोरोना काळात सोन्याच्या दागिन्यांची (Gold Demand Hike in India) मागणी वाढली आहे. देशात मागणी वाढल्याने सोन्याची आयात वाढली आहे. चीननंतर भारत हा जगातील दुसऱ्या क्रमांकाचा सोन्याचा ग्राहक आहे. ज्वेलरी उद्योगाची मागणी पूर्ण करण्यासाठी प्रामुख्याने सोने आयात केले जाते. काय आहे आजचा सोन्याचा भाव - मल्टी कमॉडिटी एक्सचेंजवर (MCX) आज एप्रिल डिलीव्हरी सोन्याचा दर 0.02 टक्क्यांच्या वाढीसह 48,438 रुपये प्रति 10 ग्रॅमवर आहे.

  हे वाचा - शेअर बाजारातील अस्थिरतेची कारणे समजून घ्या; गुंतवणूक करणे होईल सोपं

  काय आहे चांदीचा दर - चांदीचा भावही आज वधारला आहे. आज एक किलो चांदीचा भाव 0.29 टक्क्यांच्या तेजीसह 62,549 रुपयांवर पोहोचला आहे. मिस्ड कॉल देऊन जाणून घ्या सोन्याचा दर सोन्याचे दर तुम्ही घरबसल्या सहज शोधू शकता. यासाठी तुम्हाला 8955664433 या क्रमांकावर मिस कॉल द्यावा लागेल आणि तुमच्या फोनवर एक मेसेज येईल, ज्यामध्ये तुम्ही सोन्याचे नवे दर पाहू शकता.

  हे वाचा - प्रसिद्ध 'Sharks' पैकी या पुण्याच्या उद्योजिका सांभाळतात 6000 कोटींची कंपनी

  कशी तपासाल सोन्याची शुद्धता तुम्हाला सोन्याची शुद्धता तपासायची असेल तर त्यासाठी सरकारने एक अॅप बनवलं आहे. 'BIS Care App' द्वारे ग्राहक सोन्याची शुद्धता तपासू शकतात. या अॅपद्वारे तुम्ही केवळ सोन्याची शुद्धताच नाही तर त्यासंबंधी कोणतीही तक्रारही करू शकता. या अॅपमध्ये परवाना, नोंदणी आणि हॉलमार्क क्रमांक चुकीचा आढळून आल्यास ग्राहक त्याबाबत तत्काळ तक्रार करू शकतात. या अॅपच्या माध्यमातून ग्राहकाला तक्रार नोंदवण्याबाबत तत्काळ माहितीही मिळणार आहे.
  Published by:Karishma
  First published:

  Tags: Finance, Gold and silver, Gold and silver prices today, Gold price, Gold prices today, Investment, Money, Multi exchange commodity

  पुढील बातम्या