मराठी बातम्या /बातम्या /मनी /स्टेशन, मॉल किंवा एअरपोर्टवर फोन चार्ज करताना सावधान! एका महिलेचे दीड लाख गायब

स्टेशन, मॉल किंवा एअरपोर्टवर फोन चार्ज करताना सावधान! एका महिलेचे दीड लाख गायब

प्रवासात असताना अनोळखी ठिकाणी फोन चार्जिंगला लावू नका.

प्रवासात असताना अनोळखी ठिकाणी फोन चार्जिंगला लावू नका.

प्रवासात असताना अनोळखी ठिकाणी फोन चार्जिंगला लावू नका.

  • News18 Lokmat
  • Last Updated :
  • Mumbai, India

मुंबई, 28 सप्टेंबर : प्रवासात म्हणा किंवा अन्य कारणाने आपण बऱ्याचवेळा अनोळखी ठिकाणी मोबाईल, लॅपटॉप सारखे गॅजेट चार्जिंगला लावतो. जर तुम्ही देखील असच करत असाल तर ही बातमी तुमची झोप उडवणारी आहे. कारण, युएसबी मार्फत तुमचा डेटा हॅक केल्याची प्रकरणे समोर आली आहेत. हैदराबादमधील एका कंपनीच्या सीईओच्या बँक खात्यातून तब्बल 16 लाख उडवण्यात आले आहे. सार्वजनिक ठिकाणी यूएसबी पोर्टद्वारे मोबाईल चार्ज केला होता. त्यानंतर त्याच्या खात्यातून 16 लाख रुपये काढून घेतल्याचं आढळून आलं.

या महिन्यात ओडिशा पोलिसांनी एक ट्विट देखील केले होते, ते म्हणाले, मोबाइल चार्जिंग स्टेशन किंवा यूएसबी पॉवर स्टेशनसारख्या सार्वजनिक ठिकाणी तुमचा मोबाइल चार्ज करू नका. सायबर फसवणूक करणारे मोबाईलवरून तुमची वैयक्तिक माहिती चोरून मालवेअर इन्स्टॉल करण्याचा प्रयत्न करत आहेत.

वाचा - आधार लिंक्ड पेमेंट सिस्टीम आता आणखी सुरक्षित, नव्या फीचरमुळं फसवणूकीला बसेल आळा

एक साधी दिसणारी चार्जिंग केबल तुमच्यासाठी धोकादायक असू शकते. अशा हॅकर्सना टाळणे खूप कठीण झाले आहे. जर तुमच्या फोनची बॅटरी डिस्चार्ज झाली असेल तर घाईघाईत कोणताही USB चार्जर वापरू नका. यूएसबी चार्जरमध्ये चार केबल्स असतात. यामध्ये हॅकर्स डेटा चोरीसाठी एकच वापरतात. परंतु, सामान्य चार्जरमध्ये कोणताही धोका नाही. त्याला दोन केबल्स जोडलेल्या आहेत.

कशी होते हॅकींग?

ज्यूस जॅकिंगचा सापळा पसरत आहे. हा एक प्रकारचा सायबर/व्हायरस हल्ला आहे. सार्वजनिक ठिकाणांहून USB चार्जिंगद्वारे हॅकिंग होते. विमानतळ, रेल्वे स्टेशन, मॉलमध्ये आपलं गॅजेट चार्जिंग करताना काळजी घ्या. या केबलद्वारे तुमच्या डिव्हाइसमध्ये मालवेअर इन्स्टॉल केला जातो. ज्यूस जॅकिंगद्वारे वैयक्तिक डेटाची चोरी होते. मग वॉलेट, बँक अॅपमधून पैसे उडवले जातात. हैदराबादमध्ये एका कंपनीच्या सीईओला 16 लाखांचे नुकसान झाले आहे. त्याचवेळी दिल्लीतील महिलेच्या खात्यातून 1.20 लाखांची चोरी झाली. दोघांनी पब्लिक यूएसबी पोर्टवरून मोबाईल चार्जिंग केला होता.

First published:
top videos

    Tags: Cyber crime, Hacking