मराठी बातम्या /बातम्या /मनी /

जुन्या नोटांच्या बदल्यात लाखो रुपये कमवण्याची इच्छा असेल तर सावधान व्हा!

जुन्या नोटांच्या बदल्यात लाखो रुपये कमवण्याची इच्छा असेल तर सावधान व्हा!

जुन्या नोटा घेऊन त्या बदल्यात भरपूर पैसे देण्याचं आमिष दाखवण्याचा प्रकार सध्या सुरू आहे.

जुन्या नोटा घेऊन त्या बदल्यात भरपूर पैसे देण्याचं आमिष दाखवण्याचा प्रकार सध्या सुरू आहे.

जुन्या नोटा घेऊन त्या बदल्यात भरपूर पैसे देण्याचं आमिष दाखवण्याचा प्रकार सध्या सुरू आहे.

नवी दिल्ली, 15 जुलै : जुन्या नोटा (Old Notes Exchange) घेऊन त्या बदल्यात लाखो रुपये देण्याचं आमिष दाखवण्याचा एक प्रकार सध्या फेसबुक आणि काही सोशल मीडियावर सुरू आहे. फेक कॉल किंवा मेसेजेसना बळी न पडण्याचं आवाहन बँका, पोलिस यांच्याकडून नागरिकांना वेळोवेळी केलं जातं; मात्र तरीही असे प्रकार अजून घडत आहेत. फेसबुकवर सध्या 5, 10, 50 रुपयांच्या जुन्या नोटा बदलून देण्याच्या बदल्यात लाखो, कोटी रुपये देणारी टोळी काम करत आहे. यातील खरे-खोटेपणा नागरिकांनी तपासून पाहिला पाहिजे. 'पंजाब केसरी'ने याविषयीचं वृत्त दिलं आहे.

जुन्या नोटा घेऊन त्या बदल्यात भरपूर पैसे देण्याचं आमिष दाखवण्याचा प्रकार सध्या सुरू आहे. अनेक वेबसाइट्स तशा प्रकारचा दावा करतात. अशाच एका वेबसाइटवर जुन्या नोटा देऊन भरपूर पैसे मिळवण्याबाबत आवाहन करण्यात आलंय. या वेबसाइटवर असंही म्हटलंय, की कोणत्याही आवाहनाला बळी पडून खातं उघडू नका, तर तिथे दिलेल्या नंबरवर संपर्क साधा. जेव्हा त्या नंबरवर फोन केला जातो, तेव्हा व्हॉट्सअ‍ॅप कॉल करायला सांगितलं जातं. चलन बदलण्यासाठी आधी रजिस्ट्रेशन करण्याची अट सांगितली जाते. मग त्यांच्याकडून बँक खात्याची माहिती घेतली जाते. आयएफएससी कोड, खाते क्रमांक घेतला जातो. काही वेबसाइटवर रजिस्ट्रेशन करण्यासाठी आधी दहा हजार रुपये जमा करायला सांगितलं जात आहे.

एखाद्यानं रजिस्ट्रेशन करायला नकार दिला, तर रजिस्ट्रेशन (Registration On Fake Websites) केल्याशिवाय नोटा बदलून मिळणार नाहीत, असंही सांगितलं जातं. अशा प्रकारे अनेक वेबसाइट नागरिकांना फसवून नोटा बदलून देण्याच्या बहाण्यानं लाखो रुपयांचा गंडा घालत आहेत. काही वेबसाइटवर 5 रुपयांच्या ट्रॅक्टर असलेल्या जुन्या नोटेसाठी 35 लाख रुपये देण्याचं आमिष दाखवलं आहे. याचप्रमाणे 10 रुपये, 50 रुपयांची जुनी नोट किंवा 786 क्रमांक असलेली नोट देण्याच्या बदल्यात 5 कोटी रुपये देण्याचं आमिषही काही वेबसाइट्सनी दाखवलं आहे.

पंजाब केसरीच्या टीमने फेसबुकवरच्या वेगवेगळ्या नंबर्सवर संपर्क साधण्याचा प्रयत्न केला, तेव्हा व्हॉट्सअ‍ॅप नंबरवरूनच सगळी माहिती मिळेल असं सांगण्यात आलं. फोनवर बोलणाऱ्यानं आधी बँकखात्याची माहिती मागितली. त्यानंतर एका वेबसाइटनं 3 हजार, तर दुसऱ्या वेबसाइटनं 10 हजार रुपये मागितले. हे पैसे ट्रान्सफर केले, की लगेचच सदस्यत्व मिळेल असंही सांगण्यात आलं. हा सदस्यत्व क्रमांक सांगून मगच नोट बदलून मिळेल व त्याचे पैसे तुमच्या खात्यात जमा होतील, असं सांगितलं. अशा पद्धतीनं जुनं चलन का खरेदी करतात, त्याचं काय केलं जातं अशी विचारणा केली असता, 'तो तुमचा विषय नाही. सदस्यत्व हवं असेल, तर पैसे भरा, नाही तर फोन ठेवा' असं समोरून सुनावण्यात आलं. कुठून बोलताय असं विचारल्यावर एकानं मुंबई, दुसऱ्यानं अलाहाबाद आणि तिसऱ्यानं कानपूर सांगितलं.

दहाऐवजी वीस हजार देऊन प्रत्यक्ष भेटून सदस्यत्व घेण्याबाबत, तसंच जुन्या नोटा बदलण्याबाबत सांगितलं असता, समोरच्यानं फोनच ठेवून दिला. नंतर पुन्हा फोन केल्यावर संपर्क होऊ शकत नाही असा मेसेज मिळाला. एका नंबरवर तर इनकमिंग फोनची सुविधा उपलब्ध नसल्याची टेप संध्याकाळपर्यंत वाजत होती. अशा पद्धतीनं लाखोंचा गंडा घालणारे निरनिराळ्या मार्गांचा वापर करतात. त्यामुळे कोणालाही बँक खात्याची माहिती किंवा खासगी माहिती सांगू नये. कोणत्याही अनोळखी वेबसाइटवर रजिस्ट्रेशन करू नये. आपली व्यक्तिगत महिती भरू नये. त्यामुळे तुमचे कष्टाचे पैसे चोरीला जाऊ शकतात.

First published:

Tags: Digital currency, Website