मुंबई, 13 जुलै : अडचणी कधीच सांगून येत नाहीत. त्यामुळे कुणालाही अचानक पैशांची गरज भासू शकते. गेल्या दोन वर्षांमध्ये कोरोना व्हायरमुळे निर्माण झालेल्या परिस्थितीमध्ये जवळपास जगभरातल्या सर्वांनाच याची जाणीव झाली आहे. अशा वेळी लक्षात येतं, की केवळ गुंतवणूक करणंच महत्त्वाचं नाही, तर वेळप्रसंगी तो पैसा वापरता येणंदेखील महत्त्वाचं आहे. कित्येक वेळा ठरावीक कालावधीसाठी गुंतवलेला पैसा त्यापूर्वी काढता येत नाही किंवा तो काढण्यासाठी बऱ्याच अडचणी आणि प्रसंगी दंडाला सामोरं जावं लागतं. पीएफ खातं (PF Account) असणाऱ्यांना या गोष्टींची चिंता करण्याची गरज नाही. सरकारनं आता मेडिकल इमर्जन्सीसाठी (PF Medical emergency amount) पीएफ खात्यातून दुप्पट रक्कम काढण्याची सुविधा उपलब्ध करून दिली आहे. ‘TV9 हिंदी’ने याबाबतचं वृत्त प्रसिद्ध केलं आहे. ऑअशी मिळेल दुप्पट रक्कम नॉन रिफंडेबल अॅडव्हान्सच्या (Non-Refundable Advance) स्वरूपात तुम्हाला तुमच्या पीएफ खात्यातून काही रक्कम काढता येते. यापूर्वी ही सुविधा एकदाच वापरता येत होती. कोरोना महामारीच्या काळात सरकारने ही सुविधा दोन वेळा वापरण्यास (PF withdrawal) परवानगी दिली. कोरोना काळात कित्येक कुटुंबांवर आर्थिक अडचणींचा डोंगर कोसळला होता. पीएफ खात्यात पैसे असूनही, ऐन वेळी ते वापरता येत नसल्यामुळे बरेच जण तक्रार करत होते. त्यामुळे सरकारने ही सुविधा दोन वेळा वापरण्याची सूट दिली. पैसे काढण्याची प्रक्रिया यासाठी कर्मचाऱ्याला https://unifiedportal-mem.epfindia.gov.in/memberinterface/ या वेबसाइटवर जावं लागेल. त्यानंतर आपला यूएएन नंबर, पासवर्ड, कॅप्चा कोड इत्यादी क्रेडेन्शिअल्स टाकून लॉग-इन करा. यानंतर उपलब्ध पर्यायांमधून तुमच्या क्लेमसाठी योग्य फॉर्म निवडा. यामध्ये फॉर्म 31, 19, 10सी आणि 10डी असे पर्याय असतील. यानंतर तुम्ही दुसऱ्या एका वेबपेजवर जाल. तिथे विचारलेली सर्व माहिती भरावी लागेल. यानंतर बँक खात्याची माहिती भरून व्हेरिफाय करा. यानंतर तुमचं सर्टिफिकेट आणि अंडरटेकिंग याची मागणी केली जाईल. पुढे ड्रॉपडाउन मेनूमधून पीएफ अॅडव्हान्स फॉर्म 31ची निवड करा. आणखी एका ड्रॉपडाउन मेनूमधून कोरोना महामारीमुळे पैसे काढण्याचा पर्याय निवडा. तुम्हाला हवी असलेली रक्कम टाइप करा, तपासलेली कॉपी अपलोड करा आणि तुमचा पत्ता टाइप करा. यानंतर तुमच्या आधार कार्डशी रजिस्टर असलेल्या मोबाइल नंबरवर ओटीपी येईल. ओटीपी एंटर केल्यानंतर सबमिट पर्यायावर क्लिक करा. तुमचा अर्ज दाखल होईल. यानंतर ईपीएफओ तुमची माहिती तपासून अर्ज मंजूर करेल. त्यानंतर तुमच्या खात्यात रक्कम जमा होईल. तुमच्या मुलांचं भविष्य उज्ज्वल करेल ‘ही’ योजना, छोट्या गुंतवणुकीवर मिळतील 8.5 लाख रुपये किती पैसे काढता येतात? नियमांनुसार, एखादी व्यक्ती आपल्या पीएफ खात्यातून 3 महिन्यांची बेसिक सॅलरी किंवा खात्यातल्या एकूण रकमेच्या 75 टक्के भाग, यांपैकी जी रक्कम कमी असेल तेवढे पैसे काढू शकते. पैसे काढण्यासाठीची प्रक्रिया ऑनलाइन करता येते आणि तुमच्या बँक खात्यात आरामात पैसे जमा होतात. त्यामुळे, खातेधारकाला कुठेही खेटे मारावे लागत नाहीत.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.