Home /News /money /

बंपर रिटर्न! 10 रुपयांचा शेअर पोहोचला 338 रुपयांवर, अवघ्या सहा महिन्यात 1 लाखाचे झाले 32 लाख

बंपर रिटर्न! 10 रुपयांचा शेअर पोहोचला 338 रुपयांवर, अवघ्या सहा महिन्यात 1 लाखाचे झाले 32 लाख

शेअर बाजारात अलीकडेच्या आलेल्या तेजीनंतर रिअल इस्टेट शेअर्समध्येही तेजी पाहायला मिळाली. या दरम्यान राधे डेव्हलपर्सचा (Radhe Developers Share) शेअर मल्टीबॅगर ठरला. या स्टॉकने गेल्या 6 महिन्यांत चांगली कामगिरी केली आहे.

    नवी दिल्ली, 10 डिसेंबर: शेअर बाजारातील गुंतवणूक (Investment in Share Market) सामान्यांना तशी जोखमीची (Share Market Risks) वाटते, मात्र यामध्ये अभ्यास करून गुंतवणूक केल्यास तुम्हाला चांगला रिटर्न (Return in Share Market) मिळू शकतो. जर तुम्ही शेअर बाजारामध्ये गुंतवणूक करू इच्छित असाल तर तुम्ही मल्टीबॅगर स्टॉक्सचा (Investment in Multibagger Stock) विचार करू शकता. आजकाल अनेक मल्टीबॅगर शेअर्सनी गुंतवणूकदारांना उत्कृष्ट परतावा दिला आहे. शेअर बाजारात अलीकडेच आलेल्या तेजीनंतर रिअल इस्टेट शेअर्समध्येही तेजी पाहायला मिळाली. या दरम्यान राधे डेव्हलपर्सचा (Radhe Developers Share) शेअर मल्टीबॅगर ठरला. या स्टॉकने गेल्या 6 महिन्यांत चांगली कामगिरी केली आहे. 1 आठवड्यात 9 टक्के वाढ गेल्या एका आठवड्यात राधे डेव्हलपर्सच्या शेअरची किंमत (Radhe Developers Share Price) 309.60 रुपयांवरून 338 रुपयांपर्यंत वाढली आहे. या कालावधीत कंपनीच्या शेअर्समध्ये 9 टक्क्यांनी वाढ झाली आहे. गेल्या एका महिन्यात हा मल्टीबॅगर स्टॉक 190 रुपयांवरून 338 रुपयांपर्यंत वाढला आहे. गेल्या 6 महिन्यांत, हा मल्टीबॅगर पेनी स्टॉक 10.40 वरून 338 रुपयांपर्यंत वाढला आहे. या कालावधीत सुमारे 3,150 टक्क्यांनी वाढ नोंदवण्यात आली. हे वाचा-Petrol-Diesel: आज इंधनाच्या दरात बदल झालाय का? जाणून घ्या 1 लीटर पेट्रोलचा भाव एका लाखाचे झाले 32 लाख राधे डेव्हलपर्सचा शेअर प्राइस हिस्ट्रीनुसार, जर एखाद्या गुंतवणूकदाराने एका आठवड्यापूर्वी या मल्टीबॅगर स्टॉकमध्ये 1 लाख रुपयांची गुंतवणूक केली असती तर आज त्याचे 1 लाख रुपये 1.09 लाख झाले असते. त्याचप्रमाणे एखाद्या गुंतवणूकदाराने महिन्याभरापूर्वी या शेअरमध्ये 1 लाख रुपये गुंतवले असते, तर आज त्याचे 1 लाख रुपये 1.77 लाख रुपये झाले असते. हे वाचा-EPFO ची खास सुविधा, नोकरी बदलल्यानंतर स्वत: अपडेट करा 'Date of Exit' त्याचप्रमाणे एखाद्या गुंतवणूकदाराने 6 महिन्यांपूर्वी या मल्टीबॅगर पेनी स्टॉकमध्ये 1 लाख रुपये गुंतवले असते, तर आज त्याचे 1 लाख रुपये 32.50 लाख झाले असते.
    Published by:Janhavi Bhatkar
    First published:

    Tags: Investment, Money, Share market

    पुढील बातम्या