Home /News /money /

पर्सनल लोनवर SBI देतंय खास सूट, केवळ 4 स्टेप्समध्ये खात्यात जमा होतील पैसे

स्टेट बँक ऑफ इंडियाने त्यांच्या ग्राहकांना वैयक्तिक कर्जावर खास ऑफर (SBI Personal Loan Offer) देऊ केली आहे. तुम्ही या ऑफरसाठी कधीही अप्लाय करू शकता.

    स्टेट बँक ऑफ इंडिया (SBI) ने आपल्या ग्राहकांसाठी वैयक्तिक कर्जावर (SBI Offer on Personal Loan) विशेष सवलत दिली आहे. स्टेट बँक ऑफ इंडियाने म्हटले आहे की ग्राहकांना झिरो प्रोसेसिंग फीवर कर्ज देईल. 31 जानेवारी 2022 पूर्वी घेतलेल्या वैयक्तिक कर्जांवर झिरो प्रोसेसिंग फी लागू होईल.

     तुम्ही एसबीआयच्या वैयक्तिक कर्जासाठी कधीही अप्लाय करू शकता. अगदी रात्री उशिरा देखील घरबसल्या या कर्जासाठी तुम्हाला अर्ज करता येईल. योनो अॅपवर अवघ्या काही स्टेप्स फॉलो करून तुम्ही कर्ज मिळवू शकता.

    दरम्यान सर्वांनाच हे लोन मिळणार आहे. स्टेट बँक ऑफ इंडियाकडून कर्ज (SBI Personal Loan) मिळवण्याच्या पात्रतेत बसणाऱ्यांनाच हे कर्ज मिळेल. याबाबत अधिक माहिती मिळवण्यासाठी तुम्ही बँकेच्या अधिकृत वेबसाइट-sbi.co.in ला भेट देऊ शकता

    सार्वजनिक क्षेत्रातील सर्वात मोठी कर्जदार असणाऱ्या या बँकेने अलीकडेच या ऑफरबद्दल ट्वीट केले होते. बँकेने आपल्या ट्वीटमध्ये वैयक्तिक कर्जावर दिल्या जाणाऱ्या या ऑफरचे फायदे सांगितले आहेत. बँकेने म्हटले आहे की कमी व्याज दर, शून्य प्रक्रिया शुल्क या सुविधांसह आम्ही तुम्हाला योग्य निवडण्यात मदत करतो. SBI वैयक्तिक कर्जासाठी, ग्राहकांना 9.60 टक्के वार्षिक दराने व्याज द्यावे लागेल. 31 जानेवारी 2022 पूर्वी कर्ज घेतले असेल तरच झिरो प्रोसेसिंग फी लागू होईल.

    कशाप्रकारे मिळवाल लोन?- हे लोन मिळवण्यासाठी तुमच्याकडे YONO app असणे आवश्यक आहे. जर तुमच्याकडे योनो आणि तुम्ही कर्ज मिळवण्यासाठी पात्र आहात तर केवळ चार स्टेप्सच्या माध्यमातून तुम्ही कर्ज मिळवू शकता.

    काय आहेत या चार स्टेप्स- 1. सर्वात आधी तुम्हाला YONO App मध्ये लॉग इन करायचे आहे, 2. यानंतर तुम्हाला ‘Avail Now’ वर क्लिक करायाचे आहे, 3. याठिकाणी कालावधी (टेन्योर) आणि रक्कम (अमाउंट) प्रविष्ट करा, 4. यानंतर तुमच्या मोबाइलवर आलेला ओटीपी प्रविष्ट करा. ओटीपी प्रविष्ट केल्यानंतर कर्जाची रक्कम ग्राहकांच्या खात्यात जमा होईल

    लोन मिळेल की नाही कसे तपासाल? जर तुम्हाला पाहायचे आहे की तुम्हाला लोन मिळेल की नाही तर तुम्ही 567676 या क्रमांकावर SMS करून माहिती मिळवू शकता. तुम्हाला एसएमएसमध्ये <PAPL> <space> <SBI account चे शेवटच चार डिजिट्स> लिहून 567676 या क्रमांकावर पाठवायचे आहेत
    लोन मिळेल की नाही कसे तपासाल? जर तुम्हाला पाहायचे आहे की तुम्हाला लोन मिळेल की नाही तर तुम्ही 567676 या क्रमांकावर SMS करून माहिती मिळवू शकता. तुम्हाला एसएमएसमध्ये लिहून 567676 या क्रमांकावर पाठवायचे आहेत
    Published by:Janhavi Bhatkar
    First published:

    Tags: SBI, Sbi account, State bank of india

    पुढील बातम्या