मुंबई, 10 नोव्हेंबर : जगातील सर्वात श्रीमंत व्यक्ती (World Richest Person) आणि अमेरिकन इलेक्ट्रिक कार कंपनी टेस्लाचे (Tesla) सीईओ इलॉन मस्क यांच्या संपत्तीत काही दिवसात विक्रमी वाढ झाली आहे. मात्र इलॉन मस्क यांच्या संपत्तीत या आठवड्यात आतापर्यंत 50 अब्ज डॉलर्सनी घसरण झाली आहे. सलग दुसऱ्या दिवशी टेस्ला इंकच्या (Tesla Inc) शेअर्सच्या घसरणीमुळे हे घडले आहे.
ब्लूमबर्ग अब्जाधीश इंडेक्सच्या इतिहासातील दोन दिवसांतील ही सर्वात मोठी घसरण आहे. मॅकेन्झी स्कॉटपासून (MacKenzie Scott) 2019 मध्ये घटस्फोटानंतर जेफ बेझोस यांची संपत्ती 36 अब्ज डॉलरने घट झाली होती. त्यानंतर ही सर्वात मोठी घसरण आहे.
ब्लूमबर्गच्या अहवालानुसार, इलॉन मस्क यांनी ट्विटरवर त्यांच्या फॉलोअर्सना कंपनीतील त्यांचे 10 टक्के हिस्सेदारी विकण्यास सांगितले तेव्हापासून हे सुरू झालं आहे. त्यानंतर त्यांचा भाऊ किंबल याने शेअर्स विकल्याची बातमी आली होती.
खूशखबर! RBI देत आहे 40 लाख रुपये जिंकण्याची संधी, वाचा काय करावं लागेल काम
इलॉन मस्क आणि जेफ बेझोस यांच्या संपत्तीतील फरक कमी
इलॉन मस्क यांच्या संपत्तीत घट झाल्यामुळे अॅमेझॉनचे संस्थापक जेफ बेझोस यांच्या संपत्तीतील फरक 83 अब्ज डॉलरवर आला आहे. जानेवारीमध्ये, इलॉन मस्क यांनी जगातील सर्वात श्रीमंत व्यक्तींच्या यादीत प्रथमच जेफ बेझोस यांना मागे टाकले होते. दोन अब्जाधीशांमधील अंतर काही दिवसांपूर्वी 143 अब्ज इतके वाढले होते. जे जगातील चौथ्या क्रमांकाचे श्रीमंत व्यक्ती बिल गेट्स यांच्या संपत्तीपेक्षा जास्त होते.
यावर्षी मस्क यांच्या संपत्तीत मोठी वाढ
टेस्लाच्या नफ्यामुळे मस्क यांची संपत्ती यावर्षी 70 टक्क्यांनी वाढली आहे. ऑटो कंपनीच्या महसुलात जोरदार वाढ दिसून आली आहे. यासोबतच SpaceX चे वॅल्युएशन वाढले आहे. टेस्लाचे मार्केट कॅपिटलायझेशन एक ट्रिलियन डॉलर्सपेक्षा जास्त जास्त झाले आहे.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.