

इंटरनेट वापरणाऱ्यांपैकी फेसबुक माहिती नाही असे दुर्मीळच. जग जोडणाऱ्या या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला 4 फेब्रुवारीला 16 वर्षे पूर्ण होत आहेत. आजच्याच दिवशी झुकेरबर्गने 2004 मध्ये फेसबुकची सुरुवात केली होती.


फेसबुकचा रंग निळा असणं हे तर मार्क झुकेरबर्गच्या दृष्टीदोषामुळे आहे. त्याला लाल आणि हिरवा रंग ओळखता येत नाही. फक्त निळा रंगच तो नीट ओळखू शकतो.


फेसबुकच्या लाइक बटनचे सुरुवातीचे नाव ‘AWESOME’असं ठेवण्यात आलं होतं. कोणत्याही फेसबुक युजरचा मृत्यू होतो तेव्हा त्याचे मित्र, कुटुंबीय किंवा ओळखीची व्यक्ती फेसबुकला रिपोर्ट करून त्याला ‘Memorialized account’ च्या रुपात बदलता येतं.


फेसबुक फोटो, स्टेटस आणि स्टोरी याशिवाय इतरही अनेक सेवा देते. यामध्ये साउंट इफेक्ट आणि म्यूझिक ऑफर केले जाते. ही सेवा पूर्ण फ्री आहे.


मार्क झुकेरबर्गच्या पेजवर जाण्यासाठी त्याचे नाव टाइप करावे लागत नाही. त्यासाठी फक्त facebook.com/4. इतकंच टाइप केलं की होऊन जातं.