स्वत:चा व्यवसाय सुरू करण्याआधी 05 गोष्टी नक्की वाचा

स्वत:चा व्यवसाय सुरू करण्याआधी 05 गोष्टी नक्की वाचा

व्यवसाय करताना तो जर आधी व्यवस्थित आराखडा आखून नीट व्यवस्थापन करून केला तर कमी वेळात जास्त नफा मिळवणं सहज शक्य होतं.

  • Share this:

मुंबई, 16 जानेवारी: कोणताही व्यवसाय सुरू करायचा म्हटलं की नुसतं तुमच्याकडे साधन सामुग्री तयार असून चालत नाही. तुमचा व्यवसाय किंवा तुमचं उत्पादन अधिक चांगल्या पद्धतीनं करायचा असेल तर काही गोष्टींचा काटेकोरपणे अभ्यास केला तर व्यवसाय कमी वेळात अधिक नफा कमवून देणार होऊ शकतो. त्यासाठी काही सोप्या पण हजरजबाबीपणानं गोष्टी करायला हव्यात त्या पुढील प्रमाणे.

कोणताही व्यवसाय सुरु कऱण्यासाठी एक छान आयडिय़ा हवी असते. आधी तुम्हाला सुचलेली कल्पना कागदावर लिहून काढा लिहिलेल्या गोष्टी आपल्या अधिक जास्त स्मरणात राहतात आणि हव्या तेव्हा मिळतातही. त्यानंतर तुम्हाला जो व्यवसाय करायचा आहे त्याची थोडी माहिती काढा. बाजारात तशा पद्धतीचा व्यवसाय आधी किती लोकांनी केला कशा पद्धतीनं केला याचा अभ्यास करणं महत्त्वाचं आहे.

1.मार्केट Analysis

बाजारात सध्या काय ट्रेण्ड आहे याचा अभ्यास करायला हवा. आपण जो व्यवसाय करणार आहोत तोच आधी कोणी करत आहे का? त्यापेक्षा आणखी वेगळ्या पद्धतीनं आपण आपलं प्रोडक्ट बाजारात आणू शकतो का? याचा अभ्यास करून आराखडा तयार करायला हवा.

2.जागा आणि बजेट

व्यवसाय किती मोठ्या प्रमाणात सुरू करायचा यावर त्याची जागा आणि खर्च दोन्ही गोष्टी अवलंबून असतात कोणत्याही व्यवसायात सर्वात महत्त्वाचं असतं ते आर्थिक गणित. ते कोलमडलं तर व्यवसायात मोठा तोटा होतो. त्यामुळे आधीच जागेपासून एकूण विक्रीपर्यंत खर्च काढणं महत्त्वाचं आहे. त्यासाठी आवश्यक त्या पद्धतीची तडजोड करणं आणि वेळप्रसंगी काही पैसे ज्यादा बाजूला ठेवणंही महत्त्वाचं आहे. त्याचा वापर तुटीच्या काळात होऊ शकतो.

हेही वाचा-

3.पॅकेजिंग आणि मार्केटिंग

तुमचं उत्पादन खाद्यपदार्थ अथवा वस्तू रुपात असेल तर त्याचं पॅकेजिंग फार महत्त्वाचं असतं. ती सेवा असेल तर ग्राहकांपर्यंत पोहोचून त्याचा रिव्ह्यू घेणं आवश्यक आहे. ती सेवा अथवा उत्पादन ग्राहकांपर्यंत पोहोचलं तर ग्राहक पुन्हा पुन्हा येतील. तुमच्याकडे पैसे असतील तर तुम्ही वृत्तपत्र आणि पँपलेट छापू शकता. फेसबुकवरही तुमचं पेज प्रमोट करू शकता. याशिवाय वॉट्सअॅपसह इतर सोशल मीडिया अॅपवरही तुम्ही जाहिरात देऊ शकता.

4. ग्राहकांची विश्वासहर्ता

ग्राहकांचा विश्वास हा सगळ्यात मोठा मुद्दा आहे. त्यामुळे त्याला धक्का लागेल असं कोणतंही वर्तन अथवा आपल्याकडून शक्यतो कोणतीही चूक होणार नाही याची काळजी घेणं महत्त्वाचं आहे.

5. उत्पादनाला बाजारात आणल्यानंतर त्याच्या किमतीपासून पॅकेजिंगपर्यंत ग्राहकाला ते उत्पादन चांगल का आहे आणि ते फायद्याचं कसं हे पटवून देता आलं पाहिजे. तिथे आपल्या हुशारीचा आणि हजरजबाबीपणाचा कसं लागतो.

हेही वाचा-

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

Tags: business
First Published: Jan 17, 2020 10:40 AM IST

ताज्या बातम्या