केंद्रातल्या मोदी सरकारने आपल्या व्यवसायासाठी एमएसएमई कर्जासह काही नवीन सुविधा सुरू केल्या आहेत. या अंतर्गत, 1 कोटी रुपयांपर्यंतचं कर्ज 59 मिनिटात उपलब्ध होणार आहे. पण यासाठीची सगळी कागदपत्र तुम्हाला ऑनलाईन भरावी लागणार आहेत. चला तर मग जाणून घेऊयात याची संपूर्ण प्रक्रिया...
असा करू शकता अर्ज: अर्थ सचिवांनी ट्विटरवरून दिलेल्या माहितीनुसार, https://www.psbloansin59minutes.com/signup या लिंकवर जाऊन तुम्हाला कर्जासाठी अर्ज करावा लागेल.
यात अर्जदाराने नाव, ईमेल आयडी, फोन नंबर भरून ओटीपी सबमिट केला पाहिजे. ओटीपी टाकल्यानंतर पुढील प्रक्रिया सुरू होईल.
या सुविधेसाठी कोण करू शकेल अप्लाय?: सरकारची ही सुविधा सध्यातरी चालू व्यवसायिकांसाठी उपलब्ध आहे. पण ती लवकरत नवा व्ववसाय सुरू करण्यासाठीही उपलब्ध करून देण्यात येणार आहे. कर्जासाठी अर्ज भरल्यानंतर 8 दिवसात कर्ज तुमच्या खात्यात येईल.
चालू अकाऊंट: नेटबँकिंगमध्ये वापरण्यात येणारं यूजरनेम आणि पासवर्ड किंवा सहा महिन्यांचं बँक स्टेटमेंट
डायरेक्टर/पार्टनर/प्रोप्रायटर डिटेल्स: बेसिक, पर्सनल, KYC, एजुकेशनल डिटेल्स आणि फर्मची ओनरशिप डिटेल
असं मिळेल कर्ज: कागदपत्र अपलोड केल्यानंतर बँक, मंत्रालय, आयकर विभाग त्याची तपासणी करेल. जर सगळी कागदपत्र योग्य असतील तर कर्जाची रक्कम तुमच्या खात्यात येईल.
या बँका देतील कर्ज: एमएसएमई क्षेत्राला कर्ज देण्यासाठी सरकारी बँका एकत्र आल्या आहेत. अशी ही पहिलीच वेळ आहे. यात SIDBI आणि स्टेट बँक ऑफ इंडिया, बँक ऑफ बडोदा, पंजाब नॅशनल बँक, इंडियन बँक आणि विजया बँक यांचा समावेश आहे.
कर्जाशिवाय या सुविधाही मिळतील: छोट्या व्यवसायिकांसाठी मार्केट उपलब्ध करणे, त्यांना ईज ऑफ डुईंग व्यवसायासाठी संधी देणं आणि जीएसटी संबंधीत अडचणी सोडवणे.