Home /News /money /

ऑनलाइन फसवणुकीपासून फक्त 3 रुपयांत वाचू शकता, जाणून घ्या काय करायचं

ऑनलाइन फसवणुकीपासून फक्त 3 रुपयांत वाचू शकता, जाणून घ्या काय करायचं

टेक्नोलॉजित सातत्यानं होणाऱ्या बदलांमुळे सायबर क्राइमचं प्रमाण झपाट्यानं वाढत आहे.

    मुंबई, 07 डिसेंबर: टेक्नोलॉजीत सातत्यानं होत असलेल्या बदलांमुळे सायबर क्राइमचा धोका दिवसेंदिवस वाढताना दिसत आहे. वेगवेगळ्या पद्धतीनं ग्राहकांची फसवणूक केली जात असून त्यांच्या बँकेतील खात्यावर अथवा ऑनलाइन अॅपद्वारे खात्यातून पैसे उकळले जातात. त्यामुळे सायबर सिक्युरिटी ही आताच्या काळात ग्राहकांसाठी महत्त्वाची गरज होत आहे. तुम्ही तुमच्या खात्यावरचे पैसे इन्शुरन्सच्या सहाय्यानं सिक्युअर करू शकता. ही पॉलिसी नेमकी काय आहे? याचे नियम काय असणार आहेत? याचा फायदा ग्राहकांना कसा होणार जाणून घेऊया सविस्तर. ह्या पॉलिसीमध्ये तीन रुपये खर्च करून तुम्ही 50 हजारांचा विमा काढू शकता. या रिस्कपासून सुरक्षा करेल इन्शुरन्स पॉलिसी ही पॉलिसी वेगवेगळ्या सायबर क्राइमपासून तुमचं संरक्षण करते. खोटे होणारे ऑनलाइन गैरव्यवहार, फिशिंग, ईमेल स्पूफिंग, ई-एक्सटॉर्शनमार्फत केली जाणारी चोरी आणि सायबर बुलिंग याचा समावेश आहे. HDFC ERGO या कंपनीकडून खास पॉलिसी देण्यात येत आहे. सर्वसामान्य नागरिकांची सायबर फ्रॉड आणि डिजिटल धमकी किंवा सायबर अॅटॅकपासून संरक्षण करण्यासाठी आणि ग्राहकांची होणारी फसवणूक रोखण्यासाठी ही पॉलिसी मदत करणार आहे. ग्राहकांचं झालेलं नुकसान या पॉलिसीद्वारे भरून निघणार असल्याची माहिती कंपनीकडून देण्यात आली आहे. HDFC ERGO कंपनीच्या एमडीच्या म्हणण्यानुसार ऑनलाइन आर्थिक व्यवहारांमध्ये जगात भारताचा दुसरा क्रमांक लागतो. त्यामुळे सहाजिकच सायबर क्राइमचं प्रमाणही वाढणारं आहे. यापासून वाचण्यासाठी अथवा फसगत झाल्यास त्यातून तुमचं नुकसान भरुन काढण्यासाठी ही पॉलिसी आगामी काळात अत्यंत फायदेशीर ठरणार आहे. HDFC ERGO कंपनीची पॉलिसी काढवी लागणार आहे. यासाठी तुम्हाला दररोज तीन रुपये भरावे लागणार आहेत. वाचा-Airtel ने घेतला मोठा निर्णय, कॉलिंग महागल्याचं ग्राहकांचं म्हणणं कंपनीने ऐकलं HDFC ERGO सायबर इश्युरन्समध्ये ऑनलाइन फसवणूक आणि विविध ऑनलाइन फसवणुकींची यामध्ये समावेश करण्यात आला आहे. संपूर्ण कुटुंबीयांसाठीसुद्धा तुम्ही ही सायबर पॉलिसी काढू शकता. तसं पाहायला गेलं तर ही पॉलिसी पती-पत्नी आणि त्यांची मुलं एवढ्यासाठी कवर आहे. यामध्ये सर्व डिवाइस आणि लोकेशनचा समावेश करण्यात आला आहे. HDFC ERGO सायबर इन्शुरन्स पॉलिसीहीमध्ये कायदेशीर सल्लाही दिला जातो. याबाबत अधिक माहिती मिळवण्यासाठी तुम्ही HDFC ERGOच्या बेवसाइटला भेट देऊ शकता किंवा तज्ज्ञांचा सल्ला घेऊ शकता. नॅशनल क्राइम रेकॉर्ड ब्युरोने दिलेल्या अहवालानुसार 2016 रोजी देशात सायबर क्राइमच्या घटनांमध्ये 6.03 टक्क्यांनी वाढ झाली आहे. 2015 रोजी देशात सायबर क्राइमविरोधात 11,592 तक्रारी दाखल करण्यात आल्या बोत्या तर 2016 रोजी त्यामध्ये मोठी वाढ झाली असून संख्या 12, 317वर गेली असल्यानं चिंता व्यक्त केली आहे. वाचा-Airtel ने घेतला मोठा निर्णय, कॉलिंग महागल्याचं ग्राहकांचं म्हणणं कंपनीने ऐकलं
    Published by:Kranti Kanetkar
    First published:

    Tags: Cyber crime, HDFC, Insurance scheme, Money, Techonology

    पुढील बातम्या