Airtel ने घेतला मोठा निर्णय, कॉलिंग महागल्याचं ग्राहकांचं म्हणणं कंपनीने ऐकलं

Airtel ने घेतला मोठा निर्णय, कॉलिंग महागल्याचं ग्राहकांचं म्हणणं कंपनीने ऐकलं

टेलिकॉम कंपन्यांनी त्यांच्या टेरिफ प्लॅनमध्ये वाढ केल्यानं रिचार्ज महागले होते. रिलायन्स जिओनं 40 टक्के तर व्होडाफोन आयडिया, एअरटेल या कंपन्यांनी 50 टक्क्यांची वाढ केली होती.

  • Share this:

मुंबई,07 डिसेंबर : टेलिकॉम कंपन्यांनी त्यांच्या टेरिफ प्लॅनमध्ये वाढ केल्यानं रिचार्ज महागले होते. रिलायन्स जिओनं 40 टक्के तर व्होडाफोन आयडिया, एअरटेल या कंपन्यांनी 50 टक्क्यांची वाढ केली होती. यामुळे 100 रुपयांचा रिचार्ज 140 ते 150 रुपये इतका झाला. यातही फक्त आपल्याच नेटवर्कवर अनलिमिटेड कॉल आणि इतर नेटवर्कसाठी एक्स्ट्रा चार्जेस आकरण्याचा निर्णयही कंपन्यांनी घेतला होता. यामुळे ग्राहकांनी काळजी व्यक्त केली होती.

आता एअरटेलनं ग्राहकांच्या तक्रारी आणि नाराजी समजून घेतली असून फेअर युसेज पॉलिसी बंद करण्याचा निर्णय़ घेतला आहे. कंपनीने इतर नेटवर्कवरसलुद्धा अनलिमिटेड कॉल देणार असल्याचं जाहीर केलं आहे.

कंपनीने ट्विटरवरून याची माहिती दिली आहे. यात एअरटेलनं म्हटलं की, आम्ही तुमचं म्हणणं ऐकलं आणि आता बदल करतोय. उद्यापासून इतर नेटवर्कवर अनलिमीटेड प्लॅन पुन्हा पुर्ववत सुरू होतील. अनलिमिटेड कॉल्सचा आनंद घ्या. यासाठी कोणत्याही अटी नाहीत असंही एअरटेलनं नमूद केलं आहे.

टेलिकॉम कंपन्यांनी टेरिफ चार्जमध्ये 50 टक्के वाढ करण्याचे जाहीर केलं आहे. यात व्होडाफोन आयडिया आणि एअरटेल या कंपन्यांचा समावेश आहे. एअरटेलनं प्रतिदिन 50 पैसे ते 2.85 रुपये इतकी दरवाढ केली आहे. यामध्ये आता त्यांनी डेटा आणि कॉलिंगच्या सुविधा देण्यात येतील असं म्हटलं होतं. तसेच मर्यादित कॉल संपल्यानंतर प्रत्येक मिनिटाला 6 पैसे अधिक मोजावे लागतील असंही कंपनीकडून सांगण्यात आलं होतं. त्यानंतर ग्राहकांनी नाराजी व्यक्त केली होती.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Dec 7, 2019 11:34 AM IST

ताज्या बातम्या